
1199 05-Jul-2017, Wed
- आचार्य अत्रे यांच्या सासवड या जन्मगावी आयोजित केलेल्या विभागीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी प्रवीण दवणे यांची निवड करण्यात आली.
- स्वागताध्यक्षपदी दशरथ ऊर्फ बंडूकाका विठ्ठल जगताप यांची निवड करण्यात आली आहे.
- माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे संमेलनाचे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
- अत्रे विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सासवड शाखाअध्यक्ष रावसाहेब पवार यांनी ही माहिती दिली.
- दर वर्षी अत्रे यांच्या जयंतीनिमित्त सासवड येथे विभागीय साहित्य संमेलन अत्रे प्रतिष्ठान व साहित्य परिषद सासवड शाखेच्या वतीने आयोजित केले जाते.
- तसेच या वर्षी अत्रे यांच्या 119व्या जयंतीनिमित्त 20वे संमेलन 13 व 14 ऑगस्ट रोजी सासवड येथे आयोजित करण्यात आले आहे.