
1052 13-Jul-2017, Thu
- इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सीरिया (इसिस) या जागतिक दहशतवादी संघटनेविरोधात लढण्यासाठी भारताकडून फिलिपीन्स या देशास सुमारे ५ लाख डॉलर्स म्हणजे ३.२ कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे.
- भारताने एखाद्या देशाला दहशतवादी संघटनेशी लढण्यासाठी आर्थिक मदत करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- फिलिपीन्सची राजधानी असलेल्या मनिला शहराच्या दक्षिणेस असलेल्या मिंदानाओ प्रांतामध्ये इसिसशी फिलिपिनो सैन्य लढत आहे.
- या लढाईमध्ये आत्तापर्यंत फिलिपिनो सैन्यामधील किमान ९० सैनिक व ३८० दहशतवादी ठार झाले आहेत. याशिवाय बऱ्याच नागरिकांनाही जीव गमवावा लागला आहे.
- ही लढाई अद्याप सुरु असून दहशतवाद्यांच्या तावडीत शेकडो नागरिक असल्याचे आढळून आले आहे.
- फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटर्ट यांनी मिंदानाओ प्रांतात गेल्या ६० दिवसांपासून मार्शल कायदा लागू केला आहे.
- केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि फिलिपिन्सचे परराष्ट्र मंत्री अॅलन पीटर सायटानो यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीनंतर भारताकडून ही मदत देण्यात आली आहे.