
1032 07-Aug-2017, Mon
- इंग्लंडमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या बीआरडीसी या ब्रिटिश फॉर्म्युला थ्री स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या कृष्णराज महाडिकने विजेतेपद पटकावले आहे. १९ वर्षांनंतर एखाद्या भारतीय रेसरने ही स्पर्धा जिंकली आहे. १९ वर्षांपूर्वी भारताचा प्रसिद्ध रेसर नरेन कार्तिकेयनने अशी कामगिरी केली होती.
- कृष्णराज कोल्हापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र असून, गेली ८ वर्षे तो कार्टिंग स्पर्धांमध्ये सहभागी होत चमकदार कामगिरी करत आहे.गो कार्टिंगमध्ये यशस्वी ठसा उमटवल्यानंतर, गेल्या ४ वर्षापासून कृष्णराज फॉर्म्युला कार रेसिंगमध्ये सहभागी होत आहे.
- ५ आणि ६ ऑगस्ट रोजी ब्रिटिश फॉर्म्युला थ्री रेसिंगच्या फेरीतील दुसऱ्या रेसमध्ये कृष्णराजने प्रथम क्रमांक अर्थात पोल पोझिशन पटकावली.