1. 14 सप्टेंबर 2017 रोजी गांधीनगर, गुजरात येथे 12 वी भारत-जपान वार्षिक परिषद आयोजित करण्यात आली आहे.
 2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून  जापानचे पंतप्रधान शिंजो अबे 13-14 सप्टेंबर 2017 रोजी भारत दौर्‍यावर येणार आहेत. मोदी आणि अबे यांच्या दरम्यान होणारी ही चौथी वार्षिक शिखर संवाद परिषद असणार आहे.
 3. बैठकीमध्ये दोन्ही नेते ‘’ विशेष धोरणात्मक व वैश्विक भागीदारी’’ च्या कार्यमर्यादे अंतर्गत भारत आणि जापान यांच्यामधील भागीदारीमधील सहकार्याचा आढावा घेणार. याशिवाय  अहमदाबाद-मुंबई दरम्यान सुरू होणार्‍या भारताच्या प्रथम उच्च-गती रेल प्रकल्पाच्या शुभारंभाला चिन्हांकित करण्यासाठी आयोजित समारंभात दोन्ही नेते भाग घेतील.


 1. इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल यूनियन (IAU) ने पर्वतारोही भारतीय-नेपाळी  तेनझिंग नोर्गे (1914-1986) आणि न्यूझीलंडचा पर्वतारोही एडमंड हिलरी (1919-2008) यांच्या नावावरून प्लूटोवरील दोन पर्वतरांगांचे नामकरण केले आहे.
 2. त्या पर्वतरांगांना ‘ ते नझिंग मॉन्ट्स’ आणि ‘ हिलरी मॉन्ट्स’ असे नाव देण्यात आले आहे. तेनझिंग नोर्गे आणि एडमंड हिलरी या दोघांनीही सर्वात प्रथम माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर पोहोचले होते आणि सुरक्षितपणे परतले होते.
 3. IAU चे वर्किंग ग्रुप फॉर प्लॅनेटरी सिस्टम नॉमेंक्लेचर हे अंतराळामधील बाबींच्या आणि त्याच्या पृष्टभागावर असलेल्या वैशिष्ट्यांचे नामकरण करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त प्राधिकरण आहे. यावेळी प्रथमच IAU च्या वर्किंग ग्रुप फॉर प्लॅनेटरी सिस्टम नॉमेंक्लेचर मंडळाकडून प्लूटो ग्रहावरील  14 वैशिष्ट्यांचे नामकरण मंजूर केले गेले आहे.
 4. प्लूटोच्या वैशिष्ट्यांना देण्यात आलेल्या इतर नावांमध्ये पुढील नावांचा समावेश आहे -
  1. बर्नी क्रेटर – क्लाइड टॉमबग यांनी शोधलेल्या नव्या ग्रहासाठी 11 वर्षीय व्हेनेशिया बर्नी (1918-2009) या मुलीने ‘प्लूटो’ हे नाव सुचवले होते.
  2. स्पुतनिक प्लॅनिटीया - 1957 साली सोव्हिएत युनियनद्वारा प्रक्षेपित केला गेलेला सर्वात पहिला ‘स्पुतनिक-1’ उपग्रह.
  3. जंगवुल फोसा - ऑस्ट्रेलियाच्या पौराणिक कथांमधील तीन पूर्वज जंगवुल (Djanggawul), ज्यांनी आइसलँड ऑफ डेड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान प्रवास केला होता.
  4.  स्लीपनीर फोसा – नॉर्स पौराणिक कथांनुसार पाताळात ओडिन देवाला वाहून नेणारे शक्तीशाली, आठ पायांचा घोडा.
  5.  व्हिर्जिल फोसा - महान रोमन कवी व्हिर्जिल.
  6. हायाबुसा टेरा (एक मोठा भूभाग) - लघुग्रहावरील सर्वात पहिला नमुना परत आणणारे जपानी अंतराळयान आणि मोहीम (2003-2010).
  7. व्हॉयेजर टेरा - 1977 सालची NASA ने पाठवलेली अंतराळयानांचा जोडी, ज्यांनी सर्व चार विशाल ग्रहांचा पहिला "भव्य दौरा" आयोजित केला.
  8.  टार्टारस डोर्सा - ग्रीक पौराणिक कथांमधील पाताळातले सर्वांत खोलवरचे ‘टार्टारस’ क्षेत्र.
 5. न्यू होरीझोन्स मोहीम ही प्लूटो ग्रह आणि त्याचा सर्वात मोठा चंद्र चेरॉन यांच्या पृष्टभागावर जवळून दृष्टिक्षेप टाकण्यासाठी  नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशन (NASA) ने आयोजित केलेली मोहीम आहे. या मोहिमेंतर्गत 2015 साली प्लूटो ग्रहाचा आणि एक किंवा अधिक क्युपर बेल्ट ऑब्जेक्ट (KBO) चा अभ्यास करण्यासाठी न्यू होरीझोन्स हे अंतराळयान पाठवण्यात आले.
 6. 19 जानेवारी 2006 रोजी न्यू होरीझोन्सचे प्रक्षेपण करण्यात आले. ते 6 डिसेंबर 2014 रोजी प्लूटोसाठी ऑनलाइन केले गेले आणि सर्व तपासणीनंतर 15 जानेवारी 2015 रोजी यानाच्या प्लूटोला प्रदक्षिणा घालण्याच्या प्रवासाला सुरूवात झाली. जुलै 2015 मध्ये न्यू होरीझोन्स अंतराळयानाने घेतलेल्या ग्रहाच्या छायाचित्रात पहिल्यांदाच या भौगोलिक वैशिष्ट्यांचा शोध लागला होता.


 1. बाली, इंडोनेशिया आरोग्याला अर्थसंकल्पात प्राधान्याचे स्थान मिळणे जसे आवश्यक आहे, तसेच हे ज्ञान मराठीत येणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांनी येथे केले. 
 2. सातवे विश्व संमेलन इंडोनेशियातील बाली या रम्य बेटावर सुरु झाले. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात  डॉ लहाने यांनी विस्ताराने मांडणी केली. 
 3. संमेलनाचे स्वागताध्यक्ष  निलेश गायकवाड, संमेलनाचे मावळते अध्यक्ष  संजय आवटे,  प्रमोद गायकवाड,  माजी महापालिका आयुक्त  जीवन सोनावणे, ज्येष्ठ अधिकारी  शिवाजी भोसले या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते. 
 4. वैद्यकशास्त्रावर मराठीत अनेक पुस्तके आली असली, तरी अद्यापही तिथे संधी आहेत. त्याचप्रमाणे, अवयवदानासारख्या चळवळीची आज आवश्यकता आहे. आरोग्यावरची आपली तरतूद अनेक छोट्या आणि विकसनशील देशांपेक्षा कमी आहे. ती तरतूद वाढवली पाहिजे. सार्वजनिक  आरोग्य अधिक सशक्त झाले पाहिजे, असेही त्यांनी मांडले.


Top

Whoops, looks like something went wrong.