1. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री राधा मोहन सिंह यांच्या हस्ते ग्रेटर नोएडा येथे ९ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०१७ या काळात 'ऑर्गनिक वर्ल्ड कॉंग्रेस-२०१७' परिषद भरविण्यात आली आहे.
 2. याचे आयोजन इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गनिक फार्मिंग मूव्हमेंट्स (IFOFM) आणि OFI या संघटनांनी केले. या कार्यक्रमात जगभरातील ११० देशांमधून १४०० प्रतिनिधी आणि २००० भारतीय प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
 3. 'ऑर्गनिक वर्ल्ड कॉंग्रेस' या कृषी परिषदेचे आयोजन दर तीन वर्षात एकदा निवडक देशात केले जाते. याचे आयोजन इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑर्गनिक फार्मिंग मूव्हमेंट्स (IFOFM) संघटना करते.


 1. या वर्षी हैदराबादमध्ये २० वा भारतीय आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ८ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०१७ पर्यंत हा महोत्सव चालणार आहे.
 2. महोत्सवाचे उद्घाटन हैदराबादच्या शिल्प कला वेदिका या ठिकाणी सिनेमॅटोग्राफी मंत्री तलासनी श्रीनिवास यादव यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे आयोजन चिल्ड्रेन फिल्म सोसायटी इंडिया (CFSI), तेलंगणा राज्य शासन आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय यांनी संयुक्तपणे केले.
 3. महोत्सवाचे उद्घाटन 'स्कूल चलेगा' या बालपटाने करण्यात आले आणि या महोत्सवात तेलंगणा आणि हैदराबाद मधील ४० चित्रपटगृहांमध्ये विक्रमी ३१७ चित्रपटांचे प्रदर्शन केले जाणार आहे.
 4. भारतीय आंतरराष्ट्रीय बालचित्रपट महोत्सव (International Children’s Film Festival of India) हा भारतामधील युवा प्रेक्षकांसाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बालपटांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने दर दोन वर्षांनी चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी इंडियाकडून आयोजित होणारा कार्यक्रम आहे. हा महोत्सव 'द गोल्डन एलिफंट' या नावाने प्रसिद्ध आहे.
 5. ११ मे १९५५ रोजी स्थापित चिल्ड्रन्स फिल्म सोसायटी इंडिया ही भारत सरकारची एक प्रमुख संस्था आहे, जी विविध भारतीय भाषांमध्ये बालपटांची निर्मिती आणि विविध दूरदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करते.


 1. जागतिक स्पर्धेत पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मेरी कोमने (Boxer Mary Kom) आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची (Gold Medal) कमाई केली.
 2. अंतिम सामन्यात मेरी कोमने उत्तर कोरियाच्या किम ह्योंगला पराभूत केले. आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत ४८ किलो वजनी गटातील तिचे पहिले सुवर्ण आहे.
 3. यापूर्वी मेरी कोम ५१ किलो वजनी गटातून सहावेळा या स्पर्धेत उतरली होती. यात २००३, २००५, २०१० आणि २०१३ असे चार वेळा तिने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. तर २००८ मध्ये तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले होते.
 4. यावेळी ती पहिल्यांदाच ४८ किलो गटात या स्पर्धेत सहभागी झाली होती. उपांत्य फेरीत जपानच्या सुबोसाविरुद्ध आक्रमक खेळ दाखवत तिने अंतिम फेरी गाठली होती.


Top