भारतीय शास्त्रज्ञांनी जलद रोगजनकाला ओळखण्यासाठी DNA संवेदक विकसित

एस. पायोजीन्स या रोगजनकाला ओळखू शकणारे अतिसंवेदनशील DNA संवेदक (DNA sensor) विकसित केले गेले आहे आणि हे संवेदक 30 मिनीटांत ही तपासणी पूर्ण करते.

CSIR-इंस्टीट्यूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव बायोलॉजी (CSIR-IGIB) आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (NCDC) दिल्ली येथील डॉ. अशोक कुमार यांच्या नेतृत्वाखाली स्वाती सिंग आणि इतर शास्त्रज्ञांनी हे संवेदक विकसित केले आहे.

संवेदकाबाबत:-

 1. DNA चिप आधारित संवेदकामध्ये गोल्ड नॅनोपार्टिकल्सचा लेप दिलेले कार्बन इलेक्ट्रोड आहे.
 2. संवेदक 6 मायक्रोलिटरच्या नमुन्यात 60-65 जीवाणूंचा शोध घेवू शकते. DNA च्या अगदी कमी घनतेवर देखील हे रोगजनक ओळखू शकते. 
 3. संवेदक 12 महिन्यांत स्थिर असल्याचे दिसून आले आहे. 4% तापमानावर प्राथमिक करंट पीकमध्ये केवळ 10% नुकसान झाल्याचे आढळून आले आहे.

एस. पायोजीन्स:-

 1. जगभरात दरवर्षी 700 दशलक्ष लोक एस. पायोजीन्सने प्रभावित होतात. संक्रमणाच्या प्रारंभिक अवधी दरम्यान उपचार न झाल्यास, यामुळे हृदय रोग होऊ शकतो.
 2. एस. पायोजीन्स हे अनेक रोगांसाठी कारणीभूत आहे. पारंपरिक पद्धतीमध्ये या तपासणीला 18-24 तास लागतात आणि बेसिक कल्चर तपासणी विशेषत: एस. पायोजीन्सला वेगळेपणाने ओळखण्यास मदत करत नाही.


संसदेत ‘आर्थिक सर्वेक्षण 2016-17 खंड-2’ सादर

मुख्‍य आर्थिक सल्लागार डॉ. अरविंद सुब्रमण्‍यन यांनी संसदेत ‘आर्थिक सर्वेक्षण 2016-17: खंड-2’ सादर केले आहे.

यानुसार, मागील वर्षाच्या 8% तुलनेत वर्ष 2016-17 मध्ये वास्तविक अर्थव्यवस्थेत 7.1% वाढ झाली आहे. शिवाय चलन साठ्यात वाढ झाली आहे आणि विनियमन दराला बळकटी आली आहे.

सर्वेक्षणामधील ठळक बाबी:-

 1. राजकोषीय विकास - वर्ष 2016-17 मध्ये राजकोषीय घट ला GDP च्या 3.5% पर्यंत मर्यादित राखले आहे.
 2. मुद्रा व्यवस्थापन व वित्तीय मध्यस्थता - भारतीय रिजर्व बँकने वर्ष 2016-17 दरम्यान विमा दरात 0.5% (50 basis points) ने घट केली. ऑगस्ट 2017 मध्ये रेपो रेट 6% आणि रिवर्स रेपो रेट 5.75% इतके आहे. वित्त वर्ष 2016-17 दरम्यान उद्योग जगतात मिळालेल्या सरासरी सकल बँक कर्जात 0.2% घट दिसून आली. अनुसूचित वाणिज्यिक बँकांचे सकल थकीत कर्ज (GNPA) प्रमाण मार्च 2017 मध्ये 9.5% वर पोहोचले.
 3. किंमती आणि महागाई - वित्त वर्ष 2017 मध्ये वार्षिक महागाई सरासरीत घट होत ती 4.5% वर स्थिर झाली आहे. कच्च्या टेलच्या किंमतीत घट झाल्याने, महागाई दर जुलै 2016 च्या 6.1% वरून कमी होत जून 2017 मध्ये 1.5% वर आला.
 4. हवामान बदल, शाश्वत विकास आणि ऊर्जा - भारताने 2 ऑक्टोबर 2016 रोजी पॅरिस कराराला स्वीकारले. भारताने वर्ष 2030 पर्यंत उत्सर्जन तीव्रतेत 33-35% ने कमतरता आणणे, गैर-जीवाश्म आधारित विद्युत उत्पादनातून स्थापित विद्युत क्षमता (साठा) 40% इतकी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
 5. बाह्य क्षेत्र - वर्ष 2016-17 मध्ये निर्यातमध्ये 12.3% इतकी वाढ झाली आणि आयातमध्ये 1% इतकी घट दिसून आली. यामुळे भारताची व्यापार तूट वित्त वर्ष 2017 मध्ये GDP च्या 5.0% (USD 112.4 अब्ज) इतकी आहे. कृषि कर्ज माफीमुळे चालू खाता तूट यामध्ये सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) च्या 0.7% इतकी घट झाली आहे.
 6. उद्योग व पायाभूत सुविधा – वर्ष 2016-17 मध्ये औद्योगिक कामगिरी 5.6% वर आली आणि एकूण औद्योगिक विकास 5% होता. स्मार्ट सिटी मोहीम अंतर्गत एप्रिल 2017 पर्यंत 941 कोटी रुपये गुंतवणुकीचे 57 प्रकल्प पूर्ण झाले आहेत.
 7. सेवा क्षेत्र - वर्ष 2016-17 मध्ये सेवा क्षेत्राचा वाटा एकूण मूल्य संवर्धन विकासामध्ये 62% इतका आहे आणि या क्षेत्रात वृद्धी 7.7% होती.

अहवालात सुचविण्यात आलेल्या सुधारणा:-

 1. कृषी व अन्न व्यवस्थापन - किंमतींबाबतच्या समस्येला सोडविण्यासाठी विपणनसंबंधी पायाभूत सुविधा आणि संपूर्ण मूल्य साखळीला बळकटी देणे आवश्यक आहे. पाण्याची बचत करणाऱ्या सिंचन व्यवस्थांसह सिंचन क्षेत्राचा विस्तार करणे. पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी मानके निश्चित करणे. व्यापार आणि देशांतर्गत धोरणातील बदल पेरणी करण्यापूर्वी जाहीर करावेत आणि खरेदी पूर्ण होईपर्यंत कायम रहावेत. दुग्ध उत्पादन प्रकल्पांमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी योग्य यंत्रणेच्या माध्यमातून निधीची तरतूद करावी.
 2. उद्योग व पायाभूत सुविधा - रेल्वे स्थानकांचा विकास, स्थानकातील रिक्त इमारतींचा व्यावसायिक वापर, रेल्वेमार्गालगतची जमीन फुलझाडे लावण्यासाठी भाडेतत्वावर देणे, जाहिराती आणि मालवाहतुकीच्या माध्यमातून रेल्वेचा महसूल वाढवणे. माल वाहतूकीसाठी उपयोगात आणल्या जाणार्‍या अन्य बंदरांचा विकास करुन त्यांची कार्यक्षमता वाढवणे आवश्यक आहे. एअर इंडियाचे खासगीकरण/निर्गुंतवणुकीकरण, हवाई उड्डाण केंद्राची निर्मिती आणि 0/20 नियमाबाबत पुनर्विचार आवश्यक आहे.
 3. सामाजिक पायाभूत विकास, रोजगार आणि मानव विकास - आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात गुंतवणूक करुन सामाजिक पायाभूत विकास अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. कौशल्य प्रशिक्षणावर भर देणे गरजेचे आहे. सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण तयार केले आहे.


धावपटू उसेन बोल्टची निवृत्ती

 1. जमैकाचा जगप्रसिद्ध धावपटू उसेन बोल्ट याने क्रीडाजगतातून आपली निवृत्ती घेतली आहे.
 2. लंडनमधील 2017 विश्व ऍथलेटिक्स स्पर्धेत पुरूषांच्या 4x100 मीटर रिले शर्यतीनंतर बोल्टने आपली निवृत्ती जाहीर केली.
 3. बोल्टने आपल्या कारकिर्दीत 8 वेळा ऑलिम्पिक विजेता आणि 11 वेळा विजेता ठरला.
 4. त्याने एकूण 23 सुवर्ण, 5 रौप्य आणि 1 कांस्य पदकांची कमाई केलेली आहे.
 5. बोल्ट हा 100 मी., 200 मी. आणि 4x100 मी. प्रकारात सलग तीन वेळा ऑलिम्पिक विजेता ठरणारा एकमेव खेळाडू आहे.


Top