
1034 12-Jul-2017, Wed
- बीसीसी आयने ११ जुलै रोजी रात्री रवी शास्त्री यांच्याकडे टीम इंडियाच्या मुख्य कोचपदाची जबाबदारी सोपविली.
- माजी वेगवान गोलंदाज झहीर खान हे संघाचे गोलंदाजी कोच असतील. याशिवाय राहुल द्रविड यांच्याकडे विशिष्ट परदेश दौऱ्यासाठी फलंदाजी सल्लागाराची नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
- राहुल द्रविड हे भारतीय 'अ' आणि १९ वर्षांखालील मुलांच्या संघाचेसुद्धा मुख्य मार्गदर्शक आहेत.
- बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी.के. खन्ना यांनी या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करताना सांगितले, की क्रिकेट सल्लागार समितीच्या ( सीएसी ) शिफारशींवर आम्ही शास्त्री यांना मुख्य कोच नेमण्याचा निर्णय घेतला. झहीर खान हे पुढील दोन वर्षांसाठी गोलंदाजी कोच असतील.
- तसेच भारताकडून २०१४ मध्ये अखेरचा सामना खेळणारा झहीर खान हा भारताचा सर्वोत्कृष्ट स्विंग गोलंदाज मानला जातो.