1. भारत आणि कझाकस्तान यांच्या लष्करांनी हिमाचल प्रदेश राज्याच्या बाकलो येथे २ नोव्हेंबर २०१७ पासून १४ दिवसांच्या 'प्रबल दोस्तक २०१७' या संयुक्त लष्करी प्रशिक्षण सरावाला सुरुवात केली आहे.
 2. दोनही देशांच्या लष्करी संबंधांना प्रोत्साहन देणे आणि त्यांची आंतरिक क्षमता बळकट करण्याचा या सरावाचा उद्देश्य आहे.
 3. भारतीय तुकडीत ११ व्या गोरखा राइफल्स दलाचे सैनिक या सरावात सहभागी आहेत.


 1. अजय बिसारिया यांची पाकिस्तानमधील भारताचे उच्चायुक्त म्हणून नेमण्यात आले आहे.ही नेमणूक गौतम बंबावले यांच्या जागी करण्यात आली. या नियुक्तीपूर्वी बिसारिया पोलंडमध्ये भारतीय उच्चायुक्त पदावर होते.
 2. गौतम बंबावले यांना नियुक्ती चीनमधील भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्त केले गेले.
 3. बिसारीया १९८७ सालचे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत. त्यांनी वर्ष १९९९-२००४ दरम्यान पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे खाजगी सचिव म्हणून कार्य केलेले आहे.


 1. कुपोषित बालकांच्या संख्येत भारत संपूर्ण जगात पहिल्या क्रमांकावर आहे असल्याचे ASSOCHEM आणि EY यांनी केलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे. जगभरातील एकूण कुपोषित बालकांपैकी५०% तर भारतातच आहे, असे अहवालातून स्पष्ट झाले आहे.
 2. १-५ वर्षे वयोगटातील कमी वजन असलेल्या बालकांच्या सर्वाधिक प्रमाणात झारखंड (४२%) प्रथम स्थानी आणि त्यानंतर बिहार (३७%), मध्यप्रदेश (३६%) आणि उत्तरप्रदेश (३४.१%) या राज्यांचा क्रमांक लागतो. तर सर्वाधिक कमी प्रमाण मणिपूर (१४.१%) राज्यात होते.
 3. वयोमानाने कमी उंचीच्या बालकांच्या सर्वाधिक प्रमाणात उत्तरप्रदेश (५०.४%) प्रथम स्थानी तर सर्वाधिक कमी प्रमाण केरळ (१९.४%) राज्यात आहे.
 4. उंचीप्रमाणे कमी वजन असणार्‍या बालकांच्या सर्वाधिक प्रमाणात अरुणाचल प्रदेश (१९%) प्रथम स्थानी तर सर्वाधिक कमी प्रमाण सिक्कीम (५%) राज्यात आहे.


 1. जागतिक आर्थिक मंच (WEF) ने प्रसिद्ध केलेल्या 'ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स २०१७' मध्ये भारताची २१ स्थानांनी घसरण झालेली आहे आणि आता भारत यादीत १०८ व्या स्थानी आहे.
 2. आरोग्य, शिक्षण, काम करण्याची जागा आणि राजकीय प्रतिनिधित्व या चार प्रमुख घटकांवर यावर्षीचा अहवाल तयार करण्यात आला आहे.
 3. यादीत स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीत आईसलँड (समानतेचे प्रमाण८८%) अव्वल स्थानी आहे. त्यानंतर नॉर्वे आणि फिनलँड या देशांचा शीर्ष तीन देशांमध्ये क्रमांक लागतो. शीर्ष १० देशांमध्ये रवांडा, स्वीडन, निकारागुआ, स्लोवेनिया, आयरलँड, न्यूजीलँड, आणि फिलीपीन्स या अन्य देशांचा समावेश आहे.
 4. २००६ सालापासून WEF स्त्री-पुरुष समानतेमधील अंतराविषयी अभ्यास करीत आहे. यात असे आढळून आले आहे की, या दशकात हे अंतर धीमे पण स्थिरपणे प्रगतीपथावर होते, परंतू ही प्रगती वर्ष २०१७ मध्ये थांबली आणि प्रथमच स्त्री-पुरुष समानतेमधील अंतर वाढले.
 5. दक्षिण आशियात, चीन (१००) आणि बांग्लादेश (४७) हे देश आघाडीवर आहेत.


Top

Whoops, looks like something went wrong.