• १.  विद्युत टॉवरच्या उभारणीत शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला देण्यास मंजूरी
 • महाराष्ट्र राज्यातील ६६ के.व्ही. ते १२०० के.व्ही. क्षमतेच्या विद्युत पारेषण वाहिन्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या टॉवरसाठी लागणाऱ्या जागेच्या मोबदल्यात वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार लागणार्या जमिनीच्या मुल्याच्या दुप्पट किंमत देण्यात येणार.शिवाय अशा प्रकारच्या पारेषण वाहिनीच्या तारेखालील जमिनीचा मोबदला देखील दिला जाईल.
 • महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनी लि. तसेच खाजगी परवानाधारक कंपन्यांना हा निर्णय लागू आहे.
 • २. घोडागाडी चालक मालकांच्या पुनर्वसन योजनेस मंजूरी
 • मुंबई शहरात मनोरंजनासाठी चालविण्यात येणाऱ्या घोडागाडी आणि व्हिक्टोरिया बंद करण्यात आल्यानंतर घोडागाडी चालक–मालकांच्या पुनर्वसन योजनेस राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे.
 • संबंधित घोडागाडी चालक व मालक यांना बृहन्मुंबईमध्ये उपलब्ध असलेल्या जागेवर फेरिवाला परवाना देण्याचा निर्णय घेतला आहे.शिवाय फेरिवाला परवाना प्राप्त घोडागाडी चालकांना १ लाख रुपये तर फेरिवाला परवाना न घेतल्यास ३ लाख रुपयांची एकदाच एकरकमी आर्थिक मदत दिली जाईल.
 • ३. मेंढीपाल नास प्रोत्साहन देण्यासाठी राजे यशवंतराव होळकर महामेष योज नेला मंजूरी
 • महाराष्ट्रात मेंढीपालनाच्या व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय योजनेंतर्गत ६ मुख्य घटकांसह ‘राजे यशवंतराव होळकर महामेष’ या नवीन योजनेला राज्यात राबविण्यास मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. योजनेसाठी लागणाऱ्या ४६.२७ लाख रुपयांचा खर्च मंजूर केला गेला आहे.
 • मुंबई व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता उर्वरित ३४ ग्रामीण जिल्ह्यांतील भटक्या जमातीला (भज-क) या योजनेचा लाभ म्हणून ७५% अनुदान मिळणार आहे.
 • २० मेंढ्या व १ मेंढा या प्रमाणात पायाभूत सुविधेसह १००० मेंढीगट वाटप करणे, सुमारे १३ लाख मेंढ्यांसाठी संतुलित खाद्य पुरविण्यासाठी अनुदान असे योजनेचे स्वरूप आहे.


महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचे निर्णय

3 जुलै 2017 रोजी झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खालील निर्णय घेण्यात आले आहेत -महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात सुधारणा करण्यास मंजूरी.

सरपंच थेट नागरिकांमधून

 1. महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड थेट नागरिकांमधून करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958 मध्ये सुधारणा करण्यास मंजूरी मिळाली.
 2. सध्या कायद्यांतर्गत राज्यात निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचाची निवड केली जाते.

श्री साईबाबा संस्थान अधिनियमात सुधारणा करण्यास मंजूरी

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या कार्यकारी अधिकारी या पदाचे पुनर्नामकरण ‘मुख्य कार्यकारी अधिकारी’ असे करण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या अधिनियम, 2004 मध्ये सुधारणा करण्यास मंजूरी मिळाली.

मोटार वाहन करामध्ये 2% वाढ करण्यास मंजूरी

 1. वाहन नोंदणी करताना एकरकमी आकारण्यात येणाऱ्या मोटार वाहन करामध्ये सर्वसाधारणपणे 2% वाढ करण्यासाठी महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम, 1958 मध्ये सुधारणा करण्यास मंजूरी मिळाली.
 2. 1 जुलै 2017 पासून जकात आणि LBT हे कर रद्द झाल्यामुळे होणारी महसुल हानी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.
 3. तसेच, सर्वच वाहनांसाठी उच्चतम कर मर्यादा 20 लाख रुपये इतकी ठेवण्यास मंजूरी मिळाली.

महाराष्ट्र मुद्रांक नियमात सुधारणा करण्यास मंजूरी

 1. मार्गदर्शक सूचना लागू करण्याबाबत सुस्पष्ट उल्लेख असणारी तरतूद महाराष्ट्र मुद्रांक नियम, 1995 मध्ये समाविष्ट करण्यासाठी मंजूरी मिळाली.
 2. वार्षिक मूल्यदर तक्त्यांचा (रेडी रेकनर) अविभाज्य भाग असणाऱ्या मूल्यांकनाच्या सर्वसाधारण मार्गदर्शक सूचना प्रत्येक वर्षी वार्षिक मूल्यदर तक्त्यासोबत प्रसिद्ध केल्या जातात.
 3. मात्र, या तक्त्यासोबत मार्गदर्शक सूचना लागू करण्याबाबत सध्या महाराष्ट्र मुद्रांक नियम, 1995 मध्ये तरतूद नाही.


mpsc current affairs

 • नोटाबंदीनंतर मोदी सरकारने अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, प्राप्तिकर विभागाने बुधवारी देशभरात ४०० बेनामी मालमत्ता उघड झाल्याचे जाहीर केले. यातील २४० हून अधिक प्रकरणांमध्ये ६०० कोटींच्या मालमत्तेचा समावेश असल्याचे विभागाने स्पष्ट केले.
 • त्यामध्ये देशभरातील २४ प्रकरणे उघडकीस आणण्यात आली होती. त्यानंतर चालू असलेल्या कारवाईत २३ मेपर्यंत एकूण ४०० प्रकरणे उघडकीस आणण्यात प्राप्तिकर विभागाला यश आले आहे.å
 • ही कारवाई मुंबई, दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेश येथे करण्यात आली असल्याचे विभागाने स्पष्ट केले. यातील ४० प्रकरणे ही स्थावर मालमत्तेची असून, त्यांची किंमत ५३० कोटी रुपये इतकी आहे. प्राप्तिकर विभागाकडून मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात बेनामी संपत्तीविरोधी कायद्यांतर्गत या कारवाईला सुरुवात झाली होती. अशाप्रकारे बेनामी मालमत्ता असलेल्या व्यक्तीला सात वर्षांचा कारावास आणि दंड भरावा लागणार आहे.
 • यामध्ये मूर्त आणि अमूर्त स्वरुपाच्या संपत्तींचा समावेश करण्यात आला असल्याचे विभागाने जाहीर केले आहे.
 • अनेकदा ही संपत्ती प्रत्यक्ष त्या व्यक्तीच्या नावावर नसते. मात्र त्याचा लाभ त्याच व्यक्तीला होत असतो. आता कारवाई झालेल्या ४०० मालमत्तांमध्ये बॅंक खाती, जमिनी, फ्लॅट आणि दागिने यांचा समावेश आहे.


mpsc current affairs

 1. क्रिकेटच्या मैदानात आणखी एक पराक्रम, ४० षटकांच्या सामन्यात त्रिशतकी खेळीक्रिकेटच्या मैदानात दिवसेंदिवस नवे विक्रम रचले जाताना दिसतात.
 2. एखाद्या विक्रमाची नोंद झाली की तो मोडीस निघणं अशक्य असं सध्या काहीच राहिलेलं नाही. दिग्गज क्रिकेटपटूंकडून विक्रम रचले जातात आणि ते पुढील पिढीच्या खेळाडूंकडून मोडलेही जातात.
 3. पाकिस्तानचा माजी फलंदाज सईद अनवर याच्या नावावर वनडेतील १९४ धावांच्या सर्वाधिक वैयक्तिक खेळीच्या विक्रमाची नोंद होती. १९९७ साली अनवरने भारताविरोधात सर्वाधिक धावांची खेळी साकारली होती.
 4. अनवरचा हा विक्रम तब्बल १४ वर्षांपर्यंत कोणीच मोडू शकलं नाही. पण मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने २०१० साली या विक्रमालाही ठेंगणं पाडलं. सचिनने द.आफ्रिकेविरुद्ध वनडेत द्विशतकी खेळी साकारली.

 5. सचिनने अनवरचा विक्रम मोडीत काढलाच पण तो वनडे विश्वात द्विशतकी कामगिरी करणारा पहिला फलंदाज ठरला. पुढे वीरेंद्र सेहवागनेही द्विशतकी खेळी साकारली. रोहित शर्माने तर त्याही पुढचं पाऊल टाकून वनडेत दोनवेळा द्विशतकी खेळी साकारण्याचा पराक्रम केला.
 6. आता आणखी एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. पण हा विक्रम आंतरराष्ट्रीय सामन्यात केला गेलेला नाहीय. एखादा युवा खेळाडू ४० षटकांच्या सामन्यात त्रिशतकी कामगिरी करू शकतो असा विचार तुम्ही कधी केलाय का? नसेल तर तुम्हाला आता विश्वास ठेवावाच लागेल.
 7. कारण गाझियाबादमध्ये एका क्लब क्रिकेटकडून खेळणाऱ्या युवा फलंदाजाने ४० षटकांच्या सामन्यात त्रिशतकी कामगिरीचा पराक्रम केला आहे.
 8. गाझियाबादच्या अटोर गावाच्या १२ वर्षीय स्वस्तिक चिकाराने ४० षटकांच्या सामन्यातच तब्बल ३५६ धावांची तुफान खेळीची नोंद केली आहे. अर्थात स्वस्तिकने केलेल्या कामगिरीची तुलना आंतरराष्ट्रीय सामन्यात सचिन, सेहवागच्या विक्रमाशी होणं शक्य नाही. पण एखाद्या क्रिकेटपटूला त्रिशतकी कामगिरी करणं हे त्याच्यासाठी खूप मोठं यश आहे.
 9. स्वस्तिकच्या ३५६ धावांच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर आरसीव्ही संघानं आरपी पानीपत संघावर २५२ धावांनी मात केली. स्वस्तिकने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून आपले मनसुबे दाखवून दिले होते. दुसऱ्या बाजूनं विकेट पडत असल्या तरी स्वस्तिकने फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने १३८ चेंडूचा सामना करत तब्बल २२ षटकारांच्या जोरावर ३५६ धावा कुटल्या.
 10. स्वस्तिकच्या स्फोटक खेळीच्या जोरावर संघाने ४५२ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात आरपी पानीपत संघाचा डाव ३७.२ षटकांत २०० धावांतच गारद झाला. इतकचं नाही, तर स्वस्तिक गोलंदाजीतही आपली कमाल दाखवली. प्रतिस्पर्धी संघाच्या दोन फलंदाजांना त्याने मागे धाडलं.


mpsc current affairs

 1.  माजी 'जेम्स बॉंड' स्टार सर रॉजर मूर यांचे कर्करोगाने स्विर्त्झलंड येथे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते,
 2. मूर यांच्या कुटुंबियांनी ट्विटरवरून सर रॉजर मूर यांच्या निधनाची माहिती दिली. सर रॉजर मूर यांचे आज निधन झाले असून, आम्ही उद्धवस्त झालो आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
 3. हॉलिवूडमध्ये जेम्स बाँड मालिकेतील सात चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारली होती. यामुळे जेम्स बाँड म्हणून त्यांची ओळख झाली होती.


Top