
1113 22-Sep-2017, Fri
- मुंबई, पुणे, नागपूर येथे पुढील दोन वर्षासाठी महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाची खंडपीठे स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मंजूरी दिली.
- मुंबई खंडपीठांतर्गत मुंबई व नाशिक विभाग, पुणे खंडपीठांतर्गत पुणे, कोल्हापूर व औरंगाबाद विभाग तसेच नागपूर खंडपीठांतर्गत नागपूर विभागातील जिल्ह्यांचा समावेश असणार.
- राज्यात सध्या माझगाव मुंबई येथील विक्रीकर विभागाच्या मुख्यालयात महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणाची पाच खंडपीठे कार्यरत आहेत. राज्यातील प्रलंबित खटल्यांबरोबरच नव्या खटल्यांवर जलदगतीने कारवाई करण्याच्या उद्देशाने हा निर्णय आहे.