1. राज्यातील शेतकऱ्यांना माफक दरात पुरेसा व शेतकऱ्यांच्या सोयीने वीजपुरवठा उपलब्ध व्हावा, म्हणून सौर कृषी फीडरची योजना सरकारच्या विचाराधीन होती. ज्या ग्रामीण भागात गावठाण व कृषी फीडरचे विलगीकरण झाले, अशा ठिकाणी कृषी फीडरचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याच्या योजनेला मंत्रिमंडळाने मान्यता दिली असून, या योजनेला मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना संबोधण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
  2. राज्याच्या एकूण वीज वापराच्या ३० टक्के ऊर्जा कृषी क्षेत्रासाठी वापरली जाते. त्यातून महाविरतण कंपनीला तोटा सहन करावा लागतो. अशा स्थितीत शेतकऱ्यांना माफक दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाला दरवर्षी महावितरणला मोठ्या प्रमाणात अनुदान द्यावे लागते. 
  3. कृषी फीडरचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण केल्यास पारंपरिक विजेची बचत होऊ शकते. त्यामुळे महावितरण कंपनीचा वीज खरेदीवर होणारा खर्च कमी होईल व औष्णिक विजेची बचत होईल.तसेच या योजनेची अंमलबजावणी महानिर्मिती कंपनीमार्फत  करण्यात येईल. महावितरण व महाऊर्जा यांचाही सहभाग असेल.


  1. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) जाहीर झालेल्या निकालामध्ये कर्नाटकच्या नंदिनी के.आर.  हिने  देशात  अव्वल  स्थान पटकावले.भारतीय प्रशासकीय अधिकारी बनण्याची माझी पहिल्यापासून इच्छा होती, असे नंदिनीने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
  2. अनमोल शेर सिंग बेदी अणि जी. रोनान्की यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळविले. आयएएस (भारतीय प्रशासकीय सेवा), आयएफएस (भारतीय विदेश सेवा), भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) आणि केंद्रीय सेवांच्या नियुक्तीसाठी  एकूण  १०९९  उमेदवारांची निवड  करण्यात आली.
  3. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी ही नागरी सेवा परीक्षा प्राथमिक, मुख्य आणि मुलाखती अशा तीन टप्प्यांत घेतली जाते.


Top