
1106 24-Sep-2017, Sun
- केंद्र सरकारने मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांचा कार्यकाळ 1 वर्षांनी वाढवला आहे. ते ऑक्टोबर 2018 पर्यंत पदावर कायम राहतील, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले.
- ऑक्टोबर 2014 मध्ये पुढील तीन वर्षांसाठी सुब्रह्मण्यम यांची भारताच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली होती.
- अरविंद सुब्रह्मण्यम यांनी पदवीपूर्व शिक्षण हे दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये झाले. तर अहमदाबादमधील इंडियन इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंटमधून त्यांनी एमबीए पूर्ण केले. यानंतरचे एम.फिल. आणि डी. फिलचे शिक्षण त्यांनी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठातून पूर्ण केले आहे.
- 2008 मध्ये 'इंडिया टर्न : अंडरस्टँडिंग द इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन' आणि 2011 मध्ये 'इक्लिप्स : लिव्हिंग इन शॉडो ऑफ चायनाज इकॉनॉमिक डॉमिनन्स' ही दोन पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
- तसेच 2012 मध्ये प्रसिद्ध झालेल्या 'हू नीड्स टू ओपन द कॅपिटल अकाउंट्स' या पुस्तकाचे सह-लेखक आहेत.