
1111 20-Jun-2017, Tue
- बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची अचानक राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा करून भाजपाने सर्वांनाच धक्का दिला. दलित वर्गात मोडणाऱ्या कोळी समाजाच्या नेत्याला राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्याने, काँग्रेस व अन्य विरोधक काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिजू जनता दलाने कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला.
- रालोआचा उमेदवार 23 जून रोजी ठरणार असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले होते. मात्र, भाजपाच्या संसदीय बोर्डाने कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या नावाची घोषण केली. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: कोविंद यांना फोन करून त्यांचे अभिनंदनही केले.