1. ओडिशाच्या भुवनेश्वरच्या कलिंगा क्रीडामैदानावर होणार्‍या 'हॉकी पुरूष विश्वचषक २०१८' चे बोधचिन्ह आणि कासवाच्या रूपात असलेले शुभंकर (मस्कट) यांचे अनावरण करण्यात आले आहे.
 2. भारतात खेळल्या जाणार्‍या १४ व्या हॉकी विश्वचषक स्पर्धेत एकूण १७ देश भाग घेणार आहेत. ही स्पर्धा २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर २०१८ या काळात खेळली जाणार आहे.
 3. हॉकी विश्वचषक ही आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाद्वारे (IHF) आयोजित केली जाणारी आंतरराष्ट्रीय फील्ड हॉकी स्पर्धा आहे. १९७१ साली ही स्पर्धा सुरू करण्यात आली. दर चार वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जाते.


 1. भारतामध्ये दिल्लीसारख्या शहरांनी प्रदूषणाची धोक्याची पातळी गाठलेली असताना अमेरिकेसारखा मित्रदेशच भारताला अस्वच्छ इंधनाचा पुरवठा करत आहे.
 2. तेल शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये कच्च्या तेलावर प्रक्रिया केल्यानंतर बॅरलच्या तळाशी उरणाऱ्या डांबरासारख्या पदार्थाचा भारताला पुरवठा केला जात आहे.
 3. हा पदार्थ स्वस्त आणि जाळल्यानंतर कोळशापेक्षा उष्णता निर्माण करत असला तरीही हृदयाला धोकादायक असा अतिप्रमाणात कार्बन आणि फुप्फुसांना हानिकारक अशा सल्फरचे उत्सर्जन करत असल्याने प्रदूषण पातळीत वाढच होत आहे. एपी या वृत्तसंस्थेच्या चौकशीमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
 4. भारत हा नेहमीच इंधनाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. अमेरिकेने काही वर्षांपूर्वीच स्वत:चे तेल उत्पादन सुरू केले आहे, परंतु देशभरात 'पेटकोक' प्रकारातील हा पेट्रोलियम पदार्थ पाठविण्याचे सोडून केवळ भारतालाच हे इंधन पाठविले जाते.
 5. २०१६ मध्ये अमेरिकेने तब्बल आठ दशलक्ष मेट्रिक टन पेटकोकचा भारताला पुरवठा केला आहे. हा पुरवठा २०१० पेक्षा २० पटींनी जास्त आहे.
 6. या इंधनाचा वापर भारतातील लाखोंनी असलेल्या कंपन्या आणि प्रकल्पांमध्ये करण्यात येतो. आणि याच कंपन्यांमधून घातक अशी प्रदूषित हवा वातावरणात सोडण्यात येत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.


 1. भारतीय ऑलंपिक महामंडळ (IOA) ने भारतीय आर्मेचर मुष्टियुद्ध महासंघाला (IABF) देशामधील अधिकृत क्रीडा संघटना म्हणून मान्यता दिली आहे.
 2. यापूर्वी IOA कडे असलेले IABF चे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते, मात्र या निर्णयानंतर आता IABF IOA चे संलग्न मंडळ असणार. IABF ला यापूर्वीच आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघटना आणि क्रीडा मंत्रालयाकडून मान्यता मिळालेली आहे.
 3. भारतीय आर्मेचर मुष्टियुद्ध महासंघ (Indian Amateur Boxing Federation -IABF) ही ऑलंपिक मुष्टियुद्ध क्रीडाप्रकारासाठीची भारताची राष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे आणि इंटरनॅशनल आर्मेचर बॉक्सिंग असोसिएशन (AIBA) चे भारताची सदस्य संघटना आहे.
 4. याचे नवी दिल्ली   येथे मुख्यालय आहे. हिला सध्या AIBA कडून निलंबित केले गेले आहे. २५ फेब्रुवारी १९४९ रोजी IABF ची स्थापना झाली.
 5. भारतीय ऑलंपिक महामंडळ (IOA) ही भारतामधील खेळाडूंना ऑलंपिक, आशियाई खेळ व अन्य आंतरराष्ट्रीय खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी खेळाडूंची निवड करणारी आणि कार्यक्रमांमध्ये भारतीय संघाचे व्यवस्थापन करण्यास जबाबदार संघटना आहे. याची स्थापना १९२७ साली करण्यात आली.


Top