हरियाणाची मानुषी छिल्लर: मिस इंडिया 2017

 1. 54 व्या फेमिना मिस इंडिया वर्ल्ड 2017 चा खिताब हरियाणाच्या मानुषी छिल्लर हिने जिंकला आहे.
 2. स्पर्धा मुंबईतल्या यशराज स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आला होता
नाव  खिताब
सना दुआ फर्स्ट रनर-अप
प्रियंका कुमारी सेकंड रनर-अप
वनिला भटनागर मिस अॅक्टिव मुकुट
वामिका निधी 'बॉडी ब्युटीफुल'
 1. मानुषी छिल्लर :-
 2. मानुषी छिल्लर ही खनपुर मेडिकल कॉलेजमध्ये MBBS चे शिक्षण घेत आहे.
 3. तिने मिस हरियाणा  हाही खिताब जिंकलेला आहे.


अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितांच्या सहाय्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस 26 जून साजरा

6 जून 2017 रोजी दरवर्षीप्रमाणे जागतिक पातळीवर “अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितांच्या सहाय्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस” साजरा करण्यात आला आहे.

या दिवसाच्या निमित्ताने, 26 जून 2017 रोजी लंडनच्या किंग्ज कॉलेज येथे दरवर्षीप्रमाणे उच्च-स्तरीय चर्चासभेचे आयोजन करण्यात आले.

सभेचे आयोजन इंटरनॅशनल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मानवाधिकार यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचे उच्चायुक्ताचे कार्यालय (OHCHR) कडून करण्यात आले

या दिवसाची  गरज:- 

 1. अत्याचार करून पीडित व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व नष्ट करण्याचा प्रयत्न करते आणि मानवाच्या स्वाभिमानाला दुखावते.
 2. आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत अत्याचारावर पूर्ण प्रतिबंध असूनही, जगातल्या प्रत्येक क्षेत्रात राष्ट्रीय सुरक्षितता आणि सीमा संरक्षणाबाबतच्या चिंता लक्षात घेता अत्याचार, क्रूरतेचे इतर प्रकार, अपमानजनक आणि अमानुष वागणुक दिली जाते.
 3. जेव्हा या गोष्टी पिढ्यानपिढ्या चालू असतात, परिणामस्वरूप हिंसाचाराच्या चक्राला आमंत्रण मिळू शकते.

पार्श्वभूमी:-

 1. 12 डिसेंबर 1997 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने ठराव 52/149 मंजूर करून दरवर्षी 26 जून ही तारीख “अत्याचाराला बळी पडलेल्या पीडितांच्या सहाय्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस” याची स्थापना केली.
 2. या दिवशी जागतिक स्तरावर अत्याचारासंबंधी मुद्द्यांवर एकूणच निर्मूलन करण्याच्या उद्देशाने कार्यांना प्रोत्साहन दिले जाते.
 3. जिनेव्हा स्थित संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार कार्यालयाद्वारे व्यवस्थापित यूएन वॉलंटरी फंड फॉर व्हिक्टम ऑफ टॉर्चर ही पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य पुरविण्यासाठी एक माध्यम असलेली अद्वितीय आंतरराष्ट्रीय यंत्रणा आहे.


26 जून: अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस साजरा

26 जून 2017 रोजी जगभरात ‘अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस’ साजरा करण्यात येत आहे.

वर्ष 2017 मध्ये हा दिवस "लिसन फर्स्ट – लिसनिंग टु चिल्ड्रेन अँड यूथ इज द फर्स्ट स्टेप टु हेल्प देम ग्रो हेल्दी अँड सेफ." या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला आहे

या समस्येसाठी उपाययोजना:-

 1. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने एप्रिल 2016 मध्ये अमली पदार्थाच्या बाबतीत विशेष सत्र (UNGASS) आयोजित केले होते.
 2. या सत्रात 2009 साली निश्चित केलेले धोरण दस्तऐवजाला अनुसरून “जागतिक अमली पदार्थाच्या समस्येला हाताळण्यासाठी एकात्मिक आणि संतुलित धोरणाच्या दिशेने आंतरराष्ट्रीय सहकारासाठी राजकीय घोषणापत्र आणि कार्य योजना” मंजूर करण्यात आले.
 3. या दस्तऐवजात वर्ष 2019 पर्यंत उद्दीष्टे साध्य करण्यासाठी आणि सदस्य राज्यांकडून ही उद्दीष्टे साध्य करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.

पार्श्वभूमी:-

 1. 7 डिसेंबर 1987 संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत ठराव 42/112 मंजूर करून अमली पदार्थाच्या सेवनापासून मुक्त असा समाज करण्याच्या उद्देशाने 26 जून या तारखेला ‘अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
 2. या दिवशी अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणार्या विघातक परिणामांविषयी जनजागृती केली जाते.
 3. अमली पदार्थ आणि गुन्हे यावरील संयुक्त राष्ट्रसंघाचे कार्यालय (UNODC) आणि आयोग यादृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करीत आहे


अनिश शोने याला कनिष्ठ नेमबाजी विश्व विजेतेपद स्पर्धेत सुवर्णपदक

 1. पिस्तूल नेमबाज अनिश शोने याने सुहल (जर्मनी) मध्ये आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (ISSF) कनिष्ठ विश्व विजेतेपद 2017 स्पर्धेच्या रायफल/पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले.
 2. अनिशने विश्वविक्रमी 579 गुणांसह कनिष्ठ पुरुष 25 मीटर स्टँडर्ड पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
 3. सांघिक प्रकारात अनिश, अनहद जवांन्दा आणि संभाजी झांझन पाटील या गटाने रौप्यपदक जिंकले.


Top