१५ जुलै: महाराष्ट्र कबड्डी दिन

 1. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने शंकरराव उर्फ बुवा साळवी यांचा १५ जुलै हा जन्मदिन संपूर्ण राज्यात ‘कबड्डी दिन’ म्हणून साजरा केला जातो.
 2. अनेकांचा विरोध डावलून, ९ खेळाडूंचा ’हुतुतू’ आणि ७ खेळाडूंचा ’आंतराराष्ट्रीय कबड्डी’ यांचे संमीलन घडवून बुवा साळवी यांनी कबड्डीला आंतरराष्ट्रीय खेळ म्हणून मान्यता मिळवून दिली.
 3. अमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे तहहयात अध्यक्षपद बुवांकडे होते.
 4. बुवा साळवी हे महाराष्ट्राच्या तसेच देशाच्या कबड्डी संघटनेचे आधारस्तंभ होते.
 5. बुवा साळवींनी केलेल्या प्रयत्नांमुळेत कबड्डीचा १९९०च्या आशियाई खेळांमध्ये समावेश झाला
 6. पुढील पाच चतुर्वार्षिक स्पर्धांमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवता आले.
 7. यानंतर भारताच्या बाहेर जपान, पाकिस्तान, आणि बांग्लादेश यांचे संघही कबड्डी खेळू लागले.
 8. कबड्डीतल्या आपल्या कार्यासाठी बुवांना अनेक पुरस्कार मिळाले.
 9. महाराष्ट्र आणि देशभरात बुवा ‘कबड्डी महर्षी’ नावाने ओळखले जायचे.
 10. महाराष्ट्र सरकारनेही त्यांचा मानाचा ‘शिवछत्रपती जीवनगौरव’ पुरस्कार देऊन सत्कार केला होता.
 11. वयाच्या ७५ व्या वर्षी बुवांचे दीर्घ आजाराने निधन झाले.


देशात मलेरियाच्या निर्मूलनासाठी राष्ट्रीय धोरणात्मक योजना (2017-22) जाहीर

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जय प्रकाश नड्डा यांनी मलेरियाच्या निर्मूलनासाठी राष्ट्रीय धोरणात्मक योजना (2017-22) जाहीर केली आहे.

ईशान्य भारतामधील यशस्वी मोहिमेनंतर आता

 1. झारखंड,
 2. ओडिसा,
 3. छत्तीसगढ,
 4. मध्यप्रदेश
 5. आणि महाराष्ट्र या राज्यांवर लक्ष केन्द्रित केले गेले आहे.

योजनेतील महत्वपूर्ण बाबी:-

 1. योजनेमध्ये आगामी 5 वर्षासाठी देशाच्या विभिन्न भागांमध्ये मलेरियाच्या स्थितीनुसार त्याच्या निर्मूलनाचे लक्ष्य निर्धारित केले गेले आहे.
 2. मंत्रालयातर्फे आतापर्यंत 1.4 कोटी मच्छरदानी वितरित केल्या आहेत आणि आणखी 2.25 लाख मच्छरदानी वितरित केल्या जातील.

योजनेअंतर्गत

 1. मलेरियाची निगरानी,
 2. जलद निदान प्रक्रियेची स्थापना
 3. मलेरियाचा फैलाव रोखणे,
 4. मच्छरदानीच्या वापराची जाहिरात,
 5. घरगुती स्प्रेचा वापर
 6. आणि प्रभावी कार्यासाठी मनुष्यबळ व क्षमतेचा प्रभावी वापर

अश्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

मलेरिया बाबत:-

 1. मलेरिया हा प्लॅज्मोडिअम प्रकाराशी संबंधित परजीवी प्रोटोजोआ द्वारे मानवांना आणि इतर प्राण्यांना मच्छरामुळे होणारा एक संक्रामक रोग आहे.
 2. सामान्यतः संसर्गग्रस्त मादी अॅनोफेलस मच्छरामुळे हा रोग पसरतो.
 3. जागतिक स्तरावर भारत हा तिसरा सर्वाधिक प्रमाणात मलेरियाने ग्रसित देश आहे.


वाराणसीत ISARC च्या स्थापनेस मंजूरी

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील राष्ट्रीय बियाणे संशोधन व प्रशिक्षण केंद्र (NSRTC) च्या परिसरात

 1. आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था (IRRI),
 2. दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र (ISARC)

     ची स्थापना करण्यास मान्यता दिली गेली आहे.

 1. यासाठी DAC & FW, IRRI आणि फिलिपीन्स यांच्या दरम्यान करार केला जाईल.
 2. प्रस्तावाअंतर्गत, वाराणसीत सेंटर ऑफ एक्सलन्स इन राइस व्हॅल्यू अॅडीशन (CERVA) स्थापन करण्यात येईल.
 3. या केंद्रांमधून पूर्व भारतात तसेच दक्षिण आशियाई व आफ्रिकन देशांमध्ये अन्नधान्य उत्पादन आणि कौशल्य यामध्ये विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
 4. ISARC हे IRRI संचालक मंडळाच्या संचालनाखाली कार्य करेल आणि यामधील संचालक हा पात्र IRRI कर्मचारी सदस्य असणार.
 5. यासाठीची समन्वय समिती IRRI चे महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली काम करणार.


15 जुलै: जागतिक युवा कौशल्य दिवस साजरा

 1. दरवर्षीप्रमाणे 15 जुलै 2017 रोजी जगभरात “स्किल्स फॉर द फ्यूचर ऑफ वर्क" या संकल्पनेखाली जागतिक युवा कौशल्य दिवस साजरा करण्यात येत आहे.
 2. प्रौढांच्या तुलनेत युवांमध्ये जवळजवळ तीन पटीने अधिक बेरोजगारीचे प्रमाण असण्याची शक्यता असते.
 3. सतत कमी दर्जाचे रोजगार स्वीकारतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात श्रमिक बाजारात असमानता असते.
 4. याव्यतिरिक्त, महिलांमध्ये अधिक बेरोजगारी असण्याची आणि कमी वेतन देण्याची शक्यता असते किंवा कंत्राटी पद्धतीने काम करण्याची पद्धत फोफावते.
 5. म्हणूनच या समस्येच्या निराकरणासाठी शिक्षण आणि प्रशिक्षण हे प्रमुख मार्गदर्शक ठरते.
 6. युवकांसाठी कौशल्य आणि नोकरीची संधी हा प्रामुख्याने शाश्वत विकासाचा उद्देश आहे.
 7. प्रासंगिक कौशल्य असलेल्या युवा आणि प्रौढांच्या संख्येत मोठी वाढ करणे हे एक उद्दिष्ट ठरवले गेले आहे.
 8. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) च्या माहितीनुसार, 2015 साली 73.4 दशलक्ष लोक बेरोजगार असण्याचा अंदाज होता, म्हणजेच युवांमध्ये बेरोजगारीचा दर 13.1% होता आणि ही संख्या 2017 सालात बहुतेक विविध क्षेत्रांमध्ये वाढण्याची अपेक्षा आहे.

पार्श्वभूमी:-

 1. 18 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत ठराव 69/145 मान्य करण्यात आला.
 2. या ठरावानुसार जगभरात दरवर्षी 15 जुलै या तारखेला जागतिक युवा कौशल्य दिवस साजरा केला जाणार आहे.
 3. प्रथम जागतिक युवा कौशल्य दिवस 2015 साली साजरा केला गेला.
 4. युवा कौशल्य विकासामध्ये गुंतवणूकीचे महत्त्व याविषयी जागृती करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.


Top

Whoops, looks like something went wrong.