1. कोलकातामध्ये मध्ये खेळल्या गेलेल्या FIFA अन्डर-१७ विश्वचषक २०१७ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने स्पेनचा पराभव करत स्पर्धा जिंकली. इंग्लंड संघाने जबरदस्त खेळ करताना पिछाडीवरुन बाजी मारताना स्पेनच्या हातून विश्वचषक हिसकावून घेतला.
 2. दरम्यान, देशातील सहा शहरांमध्ये झालेल्या स्पर्धेतील विविध सामन्यांमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीसह स्पर्धेत नोंदवलेल्या गोलच्या बाबतीतही यजमान म्हणून भारताने विश्वविक्रम नोंदवले.
 3. चौथ्यांदा अंतिम फेरी गाठलेल्या इंग्लं ड संघाने आपल्या स्टार खेळाडूंच्या जोरावर पहिल्यांदाच १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक पटकावण्याची कामगिरी केली.
 4. तसेच या स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्यांदाच युरोपियन देशांमध्ये विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना झाला.

स्पर्धेत दिले गेलेले पुरस्कार :-

 1. गोल्डन बूट - रियान ब्रूस्टर (इंग्लंड)
 2. गोल्डन बॉल - फिल फोडन (इंग्लंड)
 3. गोल्डन ग्लोव्ह - गॅब्रिएल ब्राझाओ (ब्राझील)
 4. FIFA फेयर प्ले अवॉर्ड - ब्राझील

६ ते २८ ऑक्टोबर २०१७ दरम्यान भारतात प्रथमच FIFA अन्डर-१७ विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.


 1. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांचे 'द कोलिशन इयर्स १९९६-२०१२' शीर्षक असलेले पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.
 2. प्रणब मुखर्जी यांनी २५ जुलै २०१२ रोजी भारताचे १३ वे राष्ट्रपती म्हणून जबाबदारी सांभाळली होती आणि ते या पदावर २५ जुलै २०१७ पर्यंत कार्यरत होते.


 1. विशाल अंतिल याने केलेल्या दोन गोलच्या बळावर भारतीय ज्युनिअर पुरुष हॉकी संघाने यजमान मलेशियाचा ४-० असा पराभव करताना सुल्तान जोहोर चषक स्पर्धेत कास्यपदक जिंकले .
 2. तमन दया हॉकी स्टेडियममध्ये झालेल्या या लढतीत भारताकडून अंतिलने १५ व्या आणि २५ व्या  मिनिटाला असे दोन गोल केले.
 3. भारताला विवेक प्रसादने ११ व्या मिनिटाला गोल करीत आघाडी मिळवून दिली, तर शैलानंद लाकडाने २१ व्या मिनिटाला संघाकडून तिसरा गोल केला. अशा प्रकारे भारताने कास्यपदक जिंकताना या स्पर्धेचा समारोप केला


 1. फोर्ब्सने प्रसिद्ध केलेल्या सर्वाधिक ब्रॅंड व्हॅल्यू असलेल्या खेळाडूंच्या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज आणि कर्णधार विराट कोहली याला $१४.५ दशलक्षच्या ब्रॅंड व्हॅल्यूसह ७ वे स्थान प्राप्त झाले आहे.
 2. आयरिश गोल्फर रॉरी मॅकआयरॉय हा ८ व्या आणि फूटबॉलपटू लिओनेल मेसी $१३.५ दशलक्षच्या ब्रॅंड व्हॅल्यूसह ९ व्या स्थानी आहे.
 3. या यादीत स्वीस टेनिसपटू रॉजर फेडरर हा $३७.२ दशलक्षसह प्रथम स्थानी आहे. त्यानंतर बास्केटबॉलपटू लेब्रॉन जेम्स ($३३.४ दशलक्ष) आणि उसेन बोल्ट ($२७ दशलक्ष) यांचा शीर्ष तीनमध्ये समावेश होतो.


Top

Whoops, looks like something went wrong.