
2293 24-Jan-2018, Wed
- उत्तराखंडमध्ये निमशहरी क्षेत्रात पाणीपुरवठा सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता जागतिक बँक आणि भारत यांच्यात $120 दशलक्षचा कर्ज करार करण्यात आला आहे.
- या निधीमधून उत्तराखंडमध्ये निमशहरी भागात पाणीपुरवठा आणि स्वच्छता सेवा उपलब्ध करून देण्यासाठी अभिनव पद्धती अंमलात आणली जाणार आहे.
- वर्ष 2001 ते वर्ष 2011 या कालावधीत या राज्याच्या शहरी लोकसंख्येत 42% ची भर पडली आहे, जी राष्ट्रीय सरासरीच्या 32% हून अधिक आहे.
- जागतिक बँक ही भांडवल लागणार्या कार्यक्रमांसाठी विकसनशील देशांना कर्ज देणारी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था आहे.
- यामध्ये आंतरराष्ट्रीय पुनर्रचना आणि विकास बँक (International Bank for Reconstruction and Development- IBRD) आणि आंतरराष्ट्रीय विकास महामंडळ (International Development Association-IDA): अश्या दोन संस्थांचा समावेश आहे.
- आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सह तीन इतर संस्थांसह जागतिक बँकेची स्थापना 1944 साली ब्रेटोन वूड्स परिषदेत करण्यात आली.
- जागतिक बँकेचे मुख्यालय अमेरिकेच्या वॉशिंग्टन डी.सी. येथे आहे.