G7 countries take an oath to invest $ 3 billion for girls' education

 1. ला माल्बे (कॅनडा) येथे 9 जून 2018 रोजी पार पडलेल्या वार्षिक जी-7 शिखर परिषदेत सदस्य देशांनी निर्वासितांसोबतच असुरक्षित महिला आणि मुलींना मदत आणि शिक्षण देण्याकरिता जवळपास $ 3 अब्जची वित्तीय गुंतवणूक करण्याची वचनबद्धता दर्शवलेली आहे.
 2. संकटग्रस्त व युद्धात सापडलेल्या स्त्रिया व मुलींच्या शिक्षणात एकाच वेळी एवढी मोठी गुंतवणूक पहिल्यांदाच होणार आहे. यात कॅनडा एकूण $ 300 दशलक्षची मदत प्रदान करेल.
 3. हा निधी 3-5 वर्षांमध्ये खर्च केला जाईल.
 4. हा निधी शिक्षकांना प्रशिक्षण देणे आणि अभ्यासक्रमात सुधारणा करणे, शैक्षणिक माहितीचा मागोवा घेणे, अभिनव शिक्षण पद्धतींचे समर्थन करणे आणि विकसनशील देशांमधील महिला व मुलींचा पदवी प्राप्त दर वाढविण्यासाठी वापरला जाईल.
 5. जी-7 समूह - 1975 साली प्रथम फ्रान्स, जर्मनी, जपान, ब्रिटन, इटली आणि अमेरिका या सहा देशांनी जी-6 समूहाची स्थापना केली.
 6. पुढे 1976 साली कॅनडा यात सामील झाले आणि समूहाचे नाव जी-7 समूह पडले.
 7. पुढे यात यूरोपियन यूनियन सामील झाले.
 8. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मार्गदर्शक तत्वानुसार, या समूहाच्या सदस्यत्वासाठी उच्च निव्वळ राष्ट्रीय संपत्ती आणि उच्च मानव विकास निर्देशांक असणे आवश्यक आहे.


 Jandhan Yojana and Financial Inclusion

 1. प्रधानमंत्री जन-धन योजना (PMJDY) राष्ट्रीय वित्तीय समावेशी अभियान आहे, जे वित्तीय सेवा नागरिक, बँकिंग/बचत व जमा खाते, विप्रेषण, कर्ज, विमा, निवृत्तीवेतन मिळविण्यासाठी उपलब्धता सुनिश्चित करते.
  1. शून्य शिल्लक रकमेसह जन धन खाता कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा व्यवसाय प्रतिनिधी (बँक मित्र) आउटलेटमध्ये उघडले जाऊ शकते.
  2. जमा रकमेवर व्याज दिला जातो. किमान शिल्लक रकमेची कोणतीही अट नाही.
  3. एक लक्ष रूपयांपर्यंत अपघात विमा दिला जातो. याच्या माध्यमातून निवृत्तीवेतन, विमा उत्पांदने घेतले जाऊ शकते.
  4. योजनेंतर्गत 30,000 रूपयांचा जीवन विमा लाभार्थीला त्याच्या मृत्यूनंतर सामान्य अटींवर दिला जातो.
  5. सहा महिन्यांपर्यंत खात्यात संतोषजनक व्यवहार चालू असल्यास (कुटुंबाच्या स्त्रीसाठी केवळ एका खात्यात 5,000 रुपयांपर्यंत) ओवरड्राफ्टची सुविधा दिली जाते.
 2. आतापर्यंत 31.73 कोटी लाभार्थ्यांनी बँकांमध्ये रक्कम जमा केली आहे. लाभार्थ्यांच्या खात्यात एकूण 80,717.12 कोटी रुपयांची रक्कम जमा आहे. उप सेवा क्षेत्रांमध्ये 1.26 लक्ष ‘बँक मित्र’ शाखा रहित बँकिंग सेवा देत आहेत.
 3. भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी जन धन योजनेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. या योजनेमुळे देशात आर्थिक समायोजनेला मदत मिळाली आहे.
 4. योजनेमुळे भारतामधील गरीब कुटुंबांना बँक खाते उघडण्यास मदत झाली. शिवाय सरकार अनेक योजना बँक खात्यामधून चालवत आहे, ज्यामुळे व्यवहारामध्ये पारदर्शकता निर्माण झाली आणि भ्रष्टाचाराला आळा बसला.
 5. पूर्वी पुरूषांच्या अधिकारात व्यवहार चालत होते, मात्र अनुदानित योजनेच्या माध्यमातून स्त्रियांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळाले.


At the end of the SCO summit announces the 'Qingdao Manifesto'

 1. 8-9 जून 2018 रोजी चीनच्या किंगदाओ शहरात शांघाय सहकार संघटना (SCO) याची वार्षिक शिखर परिषद संपन्न झाली.
 2. परिषदेच्या समारोपी भाषणात ‘किंगदाओ घोषणापत्र’ जाहीर करण्यात आले आहे.
 3. SCO च्या सदस्य देशांनी दहशतवाद, भेदभाव आणि अतिरेकी यांच्याशी लढा देण्यासाठी तीन वर्षांच्या योजनेची अंमलबजावणी करण्याच्या गरज असल्याचे आवाहन केले आहे.
 4. दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध, सहकार्य, आर्थिक मदत, सुरक्षा, क्षेत्रीय शांतता हे मुद्दे हाताळण्यासाठी एकूण 22 दस्तऐवजांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या आहेत.
 5. शिवाय सन 2019 ते सन 2020 या कालावधीसाठी SCO कृती योजनेवर स्वाक्षरी करण्यात आली आहे.
 6. शांघाय सहकार संघटना (Shanghai Cooperation Organisation -SCO) याची स्थापना 2001 साली करण्यात आली.
 7. याचे मुख्यालय बीजिंग, चीनमध्ये आहे.
 8. SCO मध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे. 
 9. चीन हा SCO चा संस्थापक आहे.
 10. भारत 2017 साली SCO चा पूर्ण सदस्य बनला.


Sharad Kumar: Commissioner of Vigilance Commission

 1. शरद कुमार यांची केंद्रीय दक्षता आयोगामध्ये (CBI) दक्षता आयुक्त पदी नेमणूक करण्यात आली आहे.
 2. ही नियुक्ती चार वर्षे किंवा त्यांची वय वर्ष 65 पूर्ण होईपर्यंत करण्यात आली आहे.
 3. हरियाणा संवर्गातले 1979 सालचे IPS अधिकारी शरद कुमार सप्टेंबर 2017 मध्ये राष्ट्रीय अन्वेषण विभागाच्या (NIA) प्रमुख पदावरून निवृत्त झाले होते.
 4. भारताचे केंद्रीय दक्षता आयोग (CVC) भारत सरकारच्या विभिन्न विभागांच्या अधिकारी/कर्मचारी यांच्या संबंधित भ्रष्टाचार नियंत्रणाची सर्वोच्च संस्था आहे.
 5. याची स्थापना सन 1964 मध्ये केली गेली.
 6. ही कोणत्याही कार्यकारी अधिकारांच्या नियंत्रणापासून मुक्त आहे आणि केंद्र सरकाराच्या अंतर्गत सर्व दक्षता कृतींवर देखरेख ठेवते.
 7. आयोगात एक केंद्रीय दक्षता आयुक्त (CVC) आणि दोन दक्षता आयुक्त नियुक्त केले जातात.
 8. सध्या के. व्ही. चौधरी हे CVC आहेत आणि टी. एम. भसीन हे दुसरे दक्षता आयुक्त आहेत. 


New Zealand Women's highest run-score in ODIs

 1. न्यूझिलंडच्या महिला क्रिकेट संघाने एकदिवसीय सामन्यात आयर्लंड विरुद्ध खेळताना ५० षटकांमध्ये ४ गडी गमावून सर्वाधिक ४९० धावांचा विक्रम केला.
 2. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात ही सर्वाधिक धावसंख्या ठरली.
 3. न्यूझिलंडच्या महिला क्रिकेट संघाने त्यांच्याच संघाचा ४५५ धावांचा यापूर्वीचा विक्रमही या खेळीमुळे मोडला.
 4. यापूर्वी १९९७मध्ये पाकिस्तान विरुद्ध न्युझिलंडच्या महिला संघाने ५ गडी गमावून ४५५ धावा केल्या होत्या.
 5. कप्तान सुझी बॅट्स (९४ चेंडूंत १५१ धावा), फलंदाज मॅडी ग्रीन (७७ चेंडूत १२१ धावा), जेस वॅटकिन (५९ चेंडूंत ६२ धावा), अमेला केर (४५ चेंडूंत ८१ धावा) यांच्या खेळीमुळे न्यूझिलंड संघ ही कामगिरी करू शकला.
 6. इंग्लंडच्या पुरुषांच्या संघाने २०१६मध्ये पाकिस्तानविरोधात ४४४ धावा केल्या होत्या तो विक्रमही या महिलांनी मोडून काढला.


Top