Israel-Palestine conflict

 1. आंतरराष्ट्रीय शांततेच्या दृष्टीने नेहमीच चर्चित असलेल्या इस्राएल-पॅलेस्टाईन संघर्ष मुद्द्यावरून अलीकडच्या काळात अनेक महत्त्वाच्या  घडामोडी घडल्या.  
 2. 2 जून 2018 रोजी अमेरिकाने संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या (UNSC) एका ठरावाच्या विरोधात त्याचा व्हीटो कौल (निषेध/अमान्य करणे) दिला.
 3. कुवैतने तयार केलेला हा प्रस्ताव पॅलेस्टीन नागरिकांना संरक्षण देण्याची मागणी करतो आहे आणि हा एकतर्फी प्रस्ताव असल्याचे अमेरिकाचे म्हणणे आहे.
 4. मात्र रशिया, फ्रान्स ब्रिटन, पोलंड, नेदरलँड्स आणि इथिओपिया यांनी ठरावाला मान्य केले.
 5. इस्राएल आणि पॅलेस्टाईन हे मध्य-पूर्व प्रांतातील स्वायत्त देश आहेत.
 6. गाझा पट्टीसह कब्जा केलेल्या पॅलेस्टिनी प्रदेशातील पॅलेस्टीन नागरिकांची सुरक्षितता आणि संरक्षणाची हमी देण्यासाठी उपाययोजना करण्याविषयी हा ठराव होता. यावेळी तिसर्‍यांदा हा ठराव सुधारित करण्यात आला होता.
 7. संघर्षामागील इतिहास:-
  1. ब्रिटनच्या बॅल्फोर घोषणापत्राला या आठवड्यात 100 वर्ष पूर्ण झाली आहेत.
  2. इस्राएलच्या निर्माणासाठी मदत करण्याकरितासंबंधी या घोषणापत्रात वक्तव्य होते.
  3. 2 नोव्हेंबर 1917 रोजी ब्रिटिश मंत्री आर्थर बॅल्फोर यांनी या पत्रात ही घोषणा केली होती, की त्यांचे सरकार मध्य-पूर्व प्रदेशात पॅलेस्टीनी भूमीवर यहूदी (Jewish) लोकांसाठी राष्ट्राची स्थापना करण्याच्या पक्षात आहे.
  4. 1922 सालापासून ते दुसरे महायुद्ध संपेपर्यंत ब्रिटनने पॅलेस्टाईन भूमीवर राज्य केले होते आणि ते ओट्टोमन तुर्की साम्राज्याखाली चालवले होते.
  5. 1947 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने दिलेल्या समर्थनाने इस्रायलने 1948 साली ब्रिटीश अनिवार्य नियमांच्या अंमलाखाली आपले स्वातंत्र्य घोषित केले.
  6. मात्र हा प्रस्ताव पॅलेस्टाईन प्रतिनिधींनी नाकारला. त्यांचे म्हणणे असे होते की, पॅलेस्टाईनला एक अरब राष्ट्रात आणि एक यहुदी राष्ट्रात विभाजीत करण्यासाठी हा प्रस्ताव आहे.
  7. इस्रायल आणि पॅलेस्टीनी भूमीवरून अजूनही चालू असलेल्या वादाची पार्श्वभूमी या घोषणेशी संबंधित आहे.
  8. आजही पॅलेस्टाईन भूमीचा प्रश्न सोडवला गेला नाही आहे. या विषयावर गांभीर्याने विचार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय एकात्मतेच्या आंतरराष्ट्रीय परंपरेमधून आंतरराष्ट्रीय समुदायांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि पॅलेस्टिनी लोकांना अद्याप त्यांचे न मिळालेले अधिकार मिळवून देण्याच्या दिशेने कृती करण्यास वचनबद्धता दर्शविण्यासाठी दरवर्षी 29 नोव्हेंबरला पॅलेस्टिनी लोकांबरोबर आंतरराष्ट्रीय एकता दिन या दिवशी जागृती निर्माण केली जाते.
 8. अलीकडील घडामोडी:-
  1. ऑक्टोबर 2017 मध्ये इजिप्तमध्ये ‘हमास’ आणि ‘फतह’ या पॅलेस्टिनी पक्षांमध्ये मैत्री करार झाला. एक दशकापासून चालत आलेल्या या दोन गटांमधील दुरावा नष्ट करण्यासाठी या कराराची मदत होणार आहे.
  2. हमास आणि इस्राइल यांच्यात आतापर्यंत तीन वेळा युद्ध झाली आहेत.
  3. गाझा पट्टीच्या प्रदेशात सन 2006 मध्ये हमास पक्षाचे सरकार आले.
  4. गाझाच्या सीमेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि स्थिरता आणण्यासाठी हमासने प्रतिस्पर्धी पॅलेस्टीनी प्राधिकरणाला प्रभावीपणे क्षेत्राचा ताबा घेण्यास परवानगी दिलेली आहे. त्यासाठी हा करार झालेला आहे.
  5. नोव्हेंबर 2017 मध्ये हमास आणि फताह या विरोधकांशी कैरोमध्ये चर्चा झाल्यानंतर पॅलेस्टाईनच्या पक्षांनी वर्ष 2018 च्या अखेरीस सर्वसाधारण निवडणूक घेण्यास त्यांची सहमती दिली.
  6. इस्राएल आणि पॅलेस्टीनी भूमीवरून अजूनही चालू असलेल्या वादाच्या परिस्थितीतही अमेरिकेनंतर आता ग्‍वाटेमालाने देखील आपल्या एकतर्फी निर्णयाने इस्राएलची राजधानी मानत जेरूसलेम शहरात आपले दूतावास नुकतेच उघडले आहे.


 World Environment Day: June 5

 1. 5 जून, आज संपूर्ण जगभरात जागतिक पर्यावरण दिन पाळला जात आहे.
 2. पर्यावरणाची सुरक्षा आणि त्याचे संरक्षण याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी हा दिन पाळला जातो.
 3. या वर्षी ‘बीट प्‍लास्टिक पॉल्‍यूशन’ या विषयाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
 4. यावर्षी पर्यावरण दिनाचे यजमानपद भारताला मिळालेले आहे.
 5. प्‍लास्टिक प्रदूषण हा एक गंभीर मुद्दा होऊन बसलेला आहे.
 6. जल, थल आणि वायू सर्व जागी आज प्लास्टिक पोहचलेले आहे. प्लास्टिकच्या अत्याधिक वापराने निर्माण होणार्‍या कचर्‍याचे विघटन लवकर होत नसल्याने आणि त्याचे विघटन योग्य प्रमाणात होत नसल्याने त्यामुळे निर्माण होणारा धोका एका गंभीर पातळीवर पोहचलेला आहे.
 7. प्लास्टिक पोटात गेल्यामुळे अमुक जनावरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
 8. जागतिक परिस्थिती:-
  1. अमेरिकामध्ये वर्षाला सरासरी एका व्यक्ती 109 किलोग्राम प्लास्टिकचा वापर करतो. तर भारतात वर्षाला एका व्यक्ती 11 किलोग्राम प्लास्टिकचा वापर करतो.
  2. विनिर्माण क्षेत्रात प्लास्टिकची गरज पाहता भारतीय प्लास्टिक उद्योग 2022 सालापर्यंत एका व्यक्तीमागे प्लास्टिक उपयोग दुप्पट करण्याच्या प्रयत्नात आहेत.
  3. भारतात 1,10,000 कोटी रुपयांचा प्लास्टिक उद्योग आहे. दरवर्षी 13 दशलक्ष टन प्लास्टिकचा वापर देशात होतो, जेव्हा की 9 दशलक्ष टन प्लास्टिक कचर्‍याच्या रूपात बाहेर पडतो.
  4. संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रमाच्या माहितीनुसार, बहुतेक प्लास्टिकचे सामान एकदाच वापरुन फेकल्यामुळे कचरा निर्माण झालेला आहे.
  5. येत्या 10-15 वर्षांमध्ये प्लास्टिकची मागणी अत्याधिक वाढणार आहे. तर सर्वाधिक कचरा आशियामध्ये निर्माण होतो.
  6. फ्रेडोनिया स्टेट यूनिवर्सिटी ऑफ न्यूयॉर्क येथील संशोधकांनी अलीकडेच केलेल्या एका शोधात असे आढळून आले आहे की, दैनंदिन वापरात आणल्या जाणार्‍या बाटलीबंद पाण्यात प्लास्टिकचे सूक्ष्म कण (मायक्रोप्लास्टिक) आहेत.
  7. आजवरच्या सर्वात मोठ्या अन्वेषणात, नऊ वेगवेगळ्या देशांमधील 250 बाटल्यांचे परीक्षण करण्यात आले.
  8. संशोधनात 1 लिटर पाण्यात प्लास्टिकचे सरासरी 10 कण आढळून आले आहेत.
  9. हा प्रत्येक कण मानवी केसाच्या जाडीपेक्षा मोठा होता. जवळजवळ सर्वच बाटल्यांमधे आणि सर्वच ब्रँडमध्ये प्लास्टिक आढळून आले.
  10. सध्या मायक्रोप्लास्टिक्सबाबत कुठलेही नियम नाहीत तसेच त्यांची तपासणी करण्यासाठी प्रमाणित पद्धती देखील नाहीत.
 9. कायदे व संभाव्य उपाययोजना:-
  1. प्लास्टिकच्या वापराला आळा घालण्यासाठी सध्या देशात कोणताही विशिष्ट कायदा नाही. मात्र विघटन होऊ शकणार्‍या तसेच पुनर्वापरायोग्य 50 मायक्रोनपेक्षा अधिक जाडी असलेल्या प्लास्टीक निर्मिती आणि वापराविषयी राज्यपातळीवर कायदा तयार केला जात आहे.
  2. अनेक राज्यांकडून प्लास्टीकच्या वापरावर बंदी आणली जात आहे. परंतु हे नियम प्लास्टीकच्या वापरास पुरेसे नाहीत.
  3. 4 जून 2018 रोजी भारतीय सरकारने आग्रामध्ये प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी ‘ताज घोषणापत्र’ अंगिकारले आहे.
  4. सरकारने ऐतिहासिक स्मारकाच्या सुमारे 500 मीटर परिसराच्या आत डिस्पोजेबल किंवा एकदाच वापरले जाणारे प्लास्टिक समाप्त करण्याचे वचन दिले आहे.
  5. कृत्रिम पॉलीमरला काही नैसर्गिक पर्याय उपलब्ध आहेत, जसे की – कापूस, रेशीम या सारखा नैसर्गिक पॉलीमर वनस्पती वा झाडांपासून मिळतो, जो सहज नष्ट होतो.
  6. कित्येक अन्न पदार्थांपासून मिळणार्‍या स्टार्चपासून तसेच सेल्युलोजपासून प्लास्टिकसदृश्य मात्र विघटन होणारे पॉलीमर तयार केले जाऊ शकते.
  7. कापड तसेच लाकूड पासून बनणारी उत्पादने, जसे की कापडी पिशव्या, कागदी वाट्या, कागदी वस्तू यांचा वापर होऊ शकतो.
  8. प्लास्टिकच्या वापराला बदलू शकणारे पर्याय तयार करण्यासाठी तसेच प्लास्टिकच्या विघटनासाठी शोधकार्ये चालविणे.


 The first 13 'blue flag' of Asia will be developed in India

 1. पर्यावरण अनुकूल, स्वच्छ आणि पर्यटकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा असलेल्या 13 भारतीय किनारपट्ट्यांना लवकरच ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणन मिळणार आहे. 
 2. भारताच्या ओडिशा, महाराष्ट्र आणि इतर तटीय राज्यांतील किनारपट्ट्या संपूर्ण आशियामध्ये ‘ब्लू फ्लॅग’ प्रमाणन मिळविणारे प्रथम ठरणार आहेत.
 3. ‘ब्ल्यू फ्लॅग’ प्रमाणन मानदंडांनुसार, सागरी किनारपट्टीच्या क्षेत्रांच्या व्यवस्थापनासाठी कार्यरत असलेल्या पर्यावरण मंत्रालयाच्या सोसायटी फॉर इंटिग्रेटेड कोस्टल मॅनेजमेंट (SCOM) या संस्थेनी भारतीय किनारे विकसित केले आहेत.
 4. 1985 साली कोपनहेगन येथील फाऊंडेशन फॉर एन्व्हायरनमेंटल एज्युकेशन (FEE) ने ‘ब्लू फ्लॅग बीच’ मानदंडांची स्थापना केली.
 5. पर्यावरण अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी ‘ब्लू फ्लॅग प्रोग्राम’, ज्यास चार श्रेणींमध्ये 33 मानदंडांची आवश्यकता आहे.
 6. याची प्रथम पॅरिसपासून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर दोन वर्षांत युरोपमधील सर्वच सागरी किनारपट्ट्यांना ब्लू फ्लॅग प्रमाणन देण्यात आले.
 7. ही मोहीम युरोपच्या बाहेर 2001 साली दक्षिण आफ्रिकेत पसरली.
 8. डिसेंबर 2017 मध्ये ब्लू फ्लॅग मानदंडांनुसार भारतीय किनारे विकसित करण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने एक पायलट प्रकल्प सुरू केला.
 9. ब्लू फ्लॅग मानदंडांनुसार समुद्रकिनार्‍यांना पर्यावरण आणि पर्यटन-अनुकूल बनविण्यासाठी, समुद्रकिनाऱ्यावर प्लॅस्टिकमुक्त असणे आणि कचरा व्यवस्थापन प्रणाली असणे आवश्यक आहे.
 10. पर्यटकांसाठी स्वच्छ पाणी उपलब्धता, पर्यटकांसाठी आंतरराष्ट्रीय मानदंडांच्या सोयी-सुविधा आणि समुद्रकिनाऱ्यावरील पर्यावरणीय प्रभावाचा अभ्यास करणं आवश्यक आहे.


 Catalonia; Spain's state is over; The new government's choice

 1. स्पेनच्या केंद्रीय सरकारच्या माद्रिदमधून 7 महिन्यांपासून थेट अधिपत्त्याखाली असलेल्या कॅटालोनियाच्या प्रादेशिक सरकारने 3 जून 2018 रोजी क्विम टोरा यांच्या नेतृत्वाखाली नवे केंद्रीय मंत्रिमंडळ म्हणून शपथ घेत स्पेन सरकारचे राज्य संपुष्टात आणले आहे आणि हा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला.
 2. स्पेनपासून कॅटालोनिया प्रदेशाला स्वतंत्र करण्याच्या समर्थनार्थ 27 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान झाले होते.
 3. कॅटालोनियाच्या प्रादेशिक सरकारने आपल्या स्वातंत्र्याची घोषणा केली होती. मात्र या वादग्रस्त निर्णयाला स्पेनच्या सरकारचा विरोध असून आंतरराष्ट्रीय समुदायांकडून याला अजून मान्यता मिळालेली नाही.
 4. कॅटालोनिया हा स्पेनच्या 17 स्वायत्त समुदायांपैकी एक आहे.
 5. स्वायत्त समुदाय म्हणजे स्पेनचा सर्वाधिक उच्च-स्तरीय प्रशासकीय विभाग असतो.
 6. कॅटालोनिया हा स्पेनच्या उत्तर-पूर्व दिशेला आहे आणि उत्तरेकडे याची सीमा फ्रान्स आणि अण्डोरा देशाला मिळते.
 7. कॅटालोनियाची लोकसंख्या 75 लाख आहे आणि याची राजधानी बार्सिलोना शहर आहे.


 The test of 'Agni-5' nuclear warfare test was successful

 1. 3 जून 2018 रोजी ओडिशातील बालासोर येथून भारताच्या ‘अग्नि-5’ या स्वदेशी क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या पार पाडली गेली.
 2. अग्नि-5 ची ही सहावी चाचणी असून आत्तापर्यंतच्या सर्व सहाही चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत.
 3. दीर्घ पल्ल्याच्या ‘अग्नि-5’ या लक्ष्यभेदी क्षेपणास्त्राची मारक क्षमता 5000 किलोमीटर इतकी आहे.
 4. संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) ने या क्षेपणास्त्राची निर्मिती केली आहे.
 5. सर्वात अत्याधुनिक असे हे क्षेपणास्त्र पूर्णपणे भारतीय बनावटीचे आहे.
 6. अग्नि-5 ची लांबी 17 मीटर असून रुंदी 2 मीटर आहे. त्याचे उड्डाणपूर्व वजन 50 टनांचे असून एक टन वजनाहून जास्त क्षमतेचे आण्विक विध्वंसक अस्त्र वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे.
 7. MIRV तंत्रज्ञानामुळे एकाचवेळी अनेक ठिकाणे लक्ष्य करता येतात.
 8. अग्नि-5 या आंतरखंडीय बॅलेस्टीक क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारताच्या सुरक्षा ताफ्यात मोठी भर पडणार आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ)
 1. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) या नावाने प्रसिद्ध असलेल्या या संस्थेची स्थापना १९५८ साली झाली.
 2. उद्देश्य:-
 3. पंतप्रधानांच्या शास्त्रीय सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था राष्ट्रीय सुरक्षेसाठी लागणार्‍या अत्याधुनिक शस्त्रास्त्र, उपकरणांचा विकास करणे, संशोधन करणे, इतर संस्थांच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय संशोधन संस्थांच्या साहाय्याने नवीन चाचणी घेणे, संशोधन कार्यक्रम राबवणे इ. कार्य करणे.
 4. संशोधन शाखा:-

 5. एरोनॉटिक्स, रॉकेट आणि क्षेपणास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेन्टेशन, व्हेइकल, अभियांत्रीकी, नावेल सिस्सिटम, आर्मामेन्ट टेक्नॉलॉजी, एक्स्पोलॉजी रिसर्च, रोबोटिक्स यांसारख्या अनेक शाखांचा समावेश होतो. संरक्षण समस्येचे संख्यात्मक विश्लेषण करणे, स्फोटक वस्तूंची सुरक्षित हाताळणी करण्यासंदर्भात सल्ला व मार्गदर्शन देण्याचे कार्य ही संस्था करते. संस्थेमध्ये ५२ प्रगत प्रयोगशाळा आहेत, ५००० च्यावर शास्त्रज्ञ व २५००० शास्त्रीय व संबधीत मनुष्यबळ आहे.
 6. लढाऊ विमान, रॉकेट, आखूड पल्ल्याच्या बंदुकी, रिमोट व्हेईकल, क्षेपणास्त्रे, रडार अशी अनेक अत्याधुनिक उपकरणे संस्थेने विकसित केली आहेत.

 


Top