Kummanam Rajasekharan appoint as Mizoram Governor

 1. मिझोरामचे राज्यपाल म्हणून केरळचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष कुम्मानम राजशेखरन यांनी २९ मे रोजी शपथ घेतली. 
 2. मावळते राज्यपाल लेफ्टनंट जनरल निर्भय शर्मा यांचा कार्यकाळ २८ मे रोजी संपला.
 3. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अजीत सिंह यांनी राजशेखरन यांना पदाची शपथ दिली.
 4. यावेळी मिझोरामचे मुख्यमंत्री लाल थानहावला यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
 5. २०१४मध्ये केंद्रात एनडीएचे सरकार आल्यापासून मिझोरामचे राज्यपाल पद भूषविणारे राजशेखरन हे आठवे व्यक्ती आहेत.
 6. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून राजशेखरन यांनी १९७०मध्ये आपल्या कारकिर्दीची सुरवात केली.
 7. २०१५मध्ये त्यांची भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 


 Prime Minister Money Scheme: Yashish and Challenges

 1. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने भारताच्या वाटचालीमधील एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे - प्रधान मंत्री मुद्रा योजना.
 2. योजनेची यशस्वीता:-
  1. भारत सरकारच्या मुद्रा योजनेमधून आतापर्यंत एकूण 12 कोटी कर्जामधून 6 लक्ष कोटी रुपयांचे कर्ज लोकांना दिले गेले आहेत. यामध्ये एकूण 9 कोटी महिला लाभार्थी आहेत.
  2. योजनेमधून 3.25 कोटी अश्या लोकांना कर्ज दिले गेले आहे, ज्यांनी पहिल्यांदाच आपला व्यवसाय सुरू केला आहे.
  3. 55% कर्ज अनुसूचीत जाती-जमाती, इतर मागासवर्गीय आणि महिला अश्या मागास वर्गीय लोकांना दिले गेले.
  4. वर्तमानात 110 बँकांसह 72 सूक्ष्म वित्तीय कंपन्या आणि 9 बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्या मुद्रा योजनेंतर्गत कर्ज उपलब्ध करून देत आहेत.
  5. जास्तीत जास्त महिलांनी उद्योगाकडे वळणं ही काळाची गरज आहे. आज व्यावसायाभिमूख शिक्षणाकडे मुलींचा कल वाढतोय.
  6. उद्योगामध्ये सरकारदरबारी पुरुषांना मिळणार्‍या सवलतींपेक्षा स्त्रियांना मिळणार्‍या सवलती जास्त आहेत. अनेक सरकारी योजना मोठ्या प्रमाणात राबवल्या जातात.
  7. उद्योगाच्या अनेक गरजा असतात. त्यातील एक म्हणजे आपल्या उत्पादनाची जाहिरात.
  8. महिला उद्योजकांनी आपल्या व्यवसायाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या उत्पादनाच्या पॅकेजिंग, विपणन, प्रसिद्धी आणि जाहिरात अशा वेगवेगळ्या गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे आहे.


 World Tobacco Day - Its Importance and Results

 1. दरवर्षीप्रमाणे जागतिक आरोग्य संघटनेच्या नेतृत्वात 31 मे 2018 रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन जगभरात पाळण्यात आला.
 2. यावर्षी हा दिवस “टोबॅको अँड हार्ट डिसीज” या संकल्पनेखाली पाळण्यात आला.
 3. या दिवशी तंबाखू सेवनामुळे उद्भवणार्‍या समस्यांच्या बाबतीत जागृती निर्माण केली जाते.
 4. सेवनाबाबत जागतिक दृष्य:-
  1. तंबाखू सेवन हे जगातील अनेक आजारामागचे आणि मृत्यूचे मोठे कारण आहे. जगात दरवर्षी साधारणत: 60 लक्ष लोक तंबाखू सेवनामुळे दगावतात. हाच कल पुढेही सुरु राहिल्यास सन 2030 पर्यंत तंबाखूमुळे मृत्यमुखी पडणाऱ्यांची संख्या अंदाजे 80 लक्षच्या घरात असू शकते.
  2. भारतातही तंबाखू सेवन करणाऱ्यांची संख्या देशातील एकूण कर्करुग्णांच्या 30% आहे.
  3. भारतात सध्या सुमारे 25 लक्ष कर्करुग्ण आहेत. त्यात वर्षाला 7 लक्ष लोकांची भर पडते. तंबाखूजन्य पदार्थांच्या अतिसेवनामुळे मेंदूवर परिणाम होऊन चिडचिडपणा, अस्वस्थपणा वाढतो, तंबाखूजन्य पदार्थ न मिळाल्यास बेचैनी वाढते.
  4. गरोदर मातावर विशेष परिणाम होऊन कमी दिवसाचे, कमी वजनाचे मूल जन्मते किंवा मृत्युमुखी पडते, तसेच लहान मुलाच्या वाढीवर परिणाम होऊन त्याची वाढ खुंटते.
  5. सिगारेटच्या धुरामुळे लहान मुलांवर परिणाम होतो. शिवाय यामधून उद्भवणारा आर्थिक भार दिवसेंदिवस वाढत जातो, जे देशाच्या आर्थिक विकासास प्रभावित करते.   
  6. हृदयविकारासाठी कारणीभूत असणाऱ्या दहा गोष्टींमध्ये धूम्रपानाचा (चेन स्मोकर) समावेश आहे. धूम्रपानावर नियंत्रण मिळविल्यास हृदयविकाराचे प्रमाण 25% नी कमी होते असे एका अभ्यासामधून आढळून आले आहे.
  7. यावरूनच दिसून येते की, का या दिनाची आवश्यकता आहे? तंबाखू आणि त्याच्या नकारात्मक परिणामाविषयी जागृती निर्माण केल्याने सामाजिक प्रवृत्तीत बदल घडून येतो.
 5. भारताच्या उपाययोजना:-
  1. तंबाखू नियंत्रण प्रभावीपणे करण्यासाठी ‘कोटपा अधिनियम-2003’ हा तंबाखू नियंत्रण कायदा तयार करण्यात आला.
  2. हा कायदा भारतात तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे नियमन करतो. यामध्ये 18 वर्षाखालील व्यक्तींना तंबाखू विकता येत नाही.
  3. शाळेपासून 100 मीटरच्या परिसरात पान टपरीला परवानगी नाही. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी अशी काही बंधने आहेत. 
 6. जागतिक तंबाखू विरोधी दिन पहिल्यांदा 7 एप्रिल 1988 रोजी WHO च्या वर्धापन दिनी पाळला गेला होता.
 7. त्यानंतर WHO च्या सदस्य राष्ट्रांकडून सन 1987 मध्ये दरवर्षी 31 मे या तारखेला जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळण्याचे मान्य करण्यात आले.


Indian botanist Kamaljit Bawa won the 'Lionnnel Medal'

 1. भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ कमलजीत एस. बावा यांनी वनस्पतीशास्त्रातला प्रतिष्ठित ‘लिनियन मेडल’ मिळवला आहे.
 2. हा सन्मान लंडनच्या लिनियन सोसायटीकडून दिला गेला.
 3. डॉ. कमलजीत एस. बावा हे सन 1888 मध्ये देण्याचे सुरू केल्यापासून ‘लिनियन मेडल’ हा पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय आहेत.
 4. ते बंगळुरू येथील अशोक ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकॉलॉजी अँड द एनवायरनमेंट (ATREE) या ना-नफा संस्थेचे अध्यक्ष आहेत.
 5. लिनियन मेडल हा सन्मान दरवर्षी लंडनच्या लिनियन सोसायटीकडून दिला जातो.
 6. लिनियन सोसायटी ही जीवशास्त्राशी संबंधित जगातली सर्वात जुनी सक्रिय संस्था आहे, जिची स्थापना सन 1788 मध्ये केली गेली.
 7. संस्थेचे नाव प्रसिद्ध स्वीडिश जीवशास्त्रज्ञ कार्ल लिनियस यांच्या स्मृतीत ठेवले गेले आहे.
 8. ज्यांनी वनस्पती आणि प्राण्यांना नाव देण्याची एक प्रणाली विकसित केली.
 9. हे पदक मिळविणारे सर जोसेफ डी. हूकर हे पहिले शास्त्रज्ञ होते.


 Veteran actress Geeta Kapur passed away

 1. पाकिजा आणि रजिया सुलतान या सिनेमांमधून उल्लेखनीय काम केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री गीता कपूर यांचे मुंबईतील वृद्धाश्रमात वृद्धापकाळाने निधन झाले.
 2. कमाल अमरोही यांच्या पाकीजा सिनेमात गीता यांनी राजकुमार यांच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारली होती.
 3. वर्षभरापूर्वी वैद्यकीय उपचारांसाठी गीता कपूर यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मुलगा राजा त्यांना तिथेच सोडून निघून गेला.
 4. त्यांचे पुढे काय करायचे असा प्रश्न रुग्णालय प्रशासनासमोर उभा राहीला होता.
 5. त्यावेळी निर्माते रमेश तौरानी यांनी मदतीचा हात पुढे केल्याने त्यांना काही प्रमाणात आधार मिळाला.
 6. गीता यांनी त्यावेळी त्यांचा मुलगा राजा त्यांना कशापद्धतीने त्रास द्यायचा हे प्रसारमाध्यमांसमोर दुःख कथन केले.


Top

Whoops, looks like something went wrong.