Vikramviar astronaut Peggy Whitson retired from NASA

 1. अवकशात सर्वाधिक काळ वास्तव्य केलेल्या अमेरिकेतील महिला अवकाशयात्री पेगी व्हिटसन नासा या अवकाश संशोधन संस्थेतून निवृत्त झाल्या.
 2. पेगी यांनी अवकाशात ६६५ दिवस २२ तास २२ मिनिटे वास्तव्य करण्याचा विक्रम केलेला आहे.
 3. महिलांमध्ये सर्वाधिक स्पेस वॉक त्यांनी केले आहेत. १० स्पेसवॉकमध्ये त्यांनी ६० तास २१ मिनिटे एवढा मोठा काळ व्यतीत केला.
 4. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात त्यांनी तीन मोहिमा पूर्ण केल्या. २००२मध्ये त्यांचा पहिला अवकाश स्थानक प्रवास घडला.
 5. अवकाशस्थानकात नेमण्यात आलेल्या त्या पहिल्या वैज्ञानिक अधिकारी ठरल्या होत्या. नोव्हेंबर २०१६ ते सप्टेंबर २०१७ दरम्यान त्या अवकाश स्थानकाचे सारथ्य करणाऱ्या पहिल्या महिला होत्या.
 6. त्या १९८६मध्ये नासात आल्या, तेथे अनेक भूमिका पार पाडत असताना त्या मीर अवकाश स्थानकातही प्रकल्प वैज्ञानिक बनल्या.
 7. व्हिटसन यांचा जन्म आयोवात झाला. आयोवा वेसलन कॉलेजमधून त्या विज्ञानाच्या पदवीधर बनल्या.
 8. राइस विद्यापीठातून जैवरसायनशास्त्रात डॉक्टरेट केल्यानंतर जॉन्सन स्पेस सेंटर येथे त्यांनी संशोधनाचे काम सुरू केले.
 9. त्यानंतर कृग इंटरनॅशनल संशोधन गटात त्या काम करीत होत्या. १९९६मध्ये त्यांची जॉन्सन स्पेस सेंटर येथे अवकाशप्रवासासाठी उमेदवार म्हणून निवड झाली.
 10. त्याआधी त्यांनी नासामध्ये जैवरसायनशास्त्रज्ञ म्हणून काम केले होते. अमेरिका-रशिया वैज्ञानिक कार्यकारी गटाच्या त्या सहअध्यक्षही होत्या.
 11. त्यांच्या सोळाव्या मोहिमेत त्यांनी सुनीता विल्यम्सचा स्पेसवॉकचा विक्रम मोडला. टाइम नियतकालिकाने अलीकडेच त्यांचा गौरव केला.


Maharashtra has the second highest number of clean survey in 2018

 1. स्वच्छ सर्वेक्षण २०१८मध्ये स्वच्छतेविषयीच्या विविध स्पर्धेत महाराष्ट्र देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक झारखंड तर तृतीय क्रमांक छत्तीसगढ राज्याने पटकावला.
 2. तर राजधानीचे सर्वात स्वच्छ शहर म्हणून देशात मुंबई उपनगराला पहिला क्रमांकमिळाला असून, घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबईने बाजी मारली आहे.
 3. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरी भागातील स्वच्छतेचे मूल्यांकन करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
 4. त्याअंतर्गत ४ जानेवारी २०१८ ते १० मार्च २०१८ या कालावधीत देशातील ४,२०३ शहरांचे सर्वेक्षण करण्यात आले होते.
 5. त्यामध्ये राज्यातील ४३ अमृत शहरांनी तर एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या २१७ शहरांनी सहभाग घेतला होता. या सर्व विजेत्या शहरांचा गौरव इंदूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
 6. स्वच्छ भारत अभियान हा देशपातळीवर राबवला जाणारा पंतप्रधान मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
 7. २०१५पासून राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पात देशभरातील शहरे, राज्यांच्या राजधानीची शहरे यांचा समावेश आहे.
 8. दरवर्षी जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत स्वतंत्र अशा संस्थेमार्फत देशातील शहरांची विविध निकषांच्या आधारे तपासणी केली जाते.
 9. या तपासणीच्या आधारे गुण दिले जातात. या गुणांच्या आधारे मानांकन आणि क्रमांक काढले जातात.
 10. दरवर्षी ही तपासणी प्रक्रिया पार पाडली जाते. यावेळी सेवा क्षेत्रांत अग्रगण्य असलेली ‘कार्वे’ या कंपनीने देशपातळीवरील शहरांचे मानांकन केले आहे.
 11. घनकचरा व्यवस्थापन, नगर नियोजन, दळणवळण नियोजन, सांडपाणी व मलनिस्सारण व्यवस्था हे घटक शहरांची तपासणी करताना गृहीत धरले जातात.
 12. स्वच्छ सर्वेक्षणामध्ये विविध विभागांतील एकूण ५२ पारितोषिकांपैकी सर्वाधिक एकूण १० पारितोषिके महाराष्ट्राला मिळाली आहेत.
 13. महाराष्ट्रातील २८ शहरांनी पहिल्या शंभरमध्ये स्थान मिळविले आहे. एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरांच्या स्पर्धेत पश्चिम विभागात राज्यातील ५८ शहरांनी स्थान मिळविले आहे.
 14. राज्यातील ९ शहरांना (६ शहरांना राष्ट्रीय स्तरावरील तर ३ शहरांना विभागस्तरीय) स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे.
 15. एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांच्या (अमृत शहरे) स्पर्धेत नवी मुंबईने नववा आणि पुण्याने दहावा क्रमांक मिळवला आहे.
 16. सार्इंच्या शिर्डीने एक लाख लोकसंख्येपेक्षा कमी शहरांच्या वर्गात देशात तिसरा व राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
 17. नागपूर शहराला नावीन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा, परभणीला नागरिक प्रतिसादमध्ये, भिवंडी शहरास गतिमान मध्यम शहराचा, भुसावळ शहरास गतिमान लहान शहर पुरस्कार जाहीर झाला.
 18. सातारा जिल्ह्य़ातील पाचगणी शहराला पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला.
 19. तर नागरिक प्रतिसादाच्या बाबतीत दिला जाणारा पुरस्कार अमरावती जिल्ह्य़ातील शेंदुर्जना घाट या शहराला मिळाला.
 20. पुणे जिल्ह्यातील सासवड या शहराला नावीन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.


Establishment of International Hindu Council by Praveen Togadia

 1. विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर प्रवीण तोगडिया यांनी अहमदाबादमध्ये नवीन संघटनेची स्थापना केली आहे.
 2. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद असे या संघटनेचे नाव असून, तोगडिया हे या संघटनेचे अध्यक्ष असणार आहेत.
 3. यावेळी, तोगडिया समर्थकांनी डोक्यावर घातलेल्या टोपीवर ‘हिंदू ही आगे’ असे लिहिले होते. तसेच व्यासपीठावर भारत माता, गो-माता, गणपती आणि अशोक सिंघल यांच्या प्रतिमा ठेवलेल्या होत्या.
 4. आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद ही विश्व हिंदू परिषदेची स्पर्धक संघटना असणार याचेच संकेत तिच्या नवी दिल्लीत झालेल्या स्थापना कार्यक्रमातून मिळाले आहेत.
 5. एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जवळचे समजले जाणारे तोगडिया हे काही महिन्यांपासून मोदींनाच लक्ष्य करत होते. मोदींनी सत्तेत आल्यानंतर आश्वासने पाळली नाहीत, असा आरोप त्यांनी केला होता.
 6. एप्रिल २०१८मध्ये झालेल्या विश्व हिंदू परिषदेच्या निवडणुकांमध्ये हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपाल विष्णू कोकजे हे संघटनेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी निवडून आले होते.
 7. कोकजे यांनी तोगडियांचे समर्थक मानले जाणारे राघव रेड्डी यांचा पराभव केला होता. त्यामुळे तोगडिया नाराज झाले होते. 


Ratnakar Matkari, Navnath Gorena Sahitya Akademi Award

 1. साहित्य क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी आणि नवनाथ गोरे यांना जाहीर झाला आहे.
 2. २०१८साठी देशातील एकूण ४२ साहित्यिकांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवले जाणार आहे.
 3. त्यात बाल साहित्य पुरस्कारासाठी २१ साहित्यिकांची तर युवा पुरस्कारासाठी २१ साहित्यिकांची निवड करण्यात आली आहे.
 4. यामध्ये रत्नाकर मतकरी आणि नवनाथ गोरे या २ मराठी साहित्यिकांची नावे आहेत. सन्मानचिन्ह आणि ५० हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
 5. साहित्य अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
 6. इंग्रजी भाषेतील पुरस्कारासाठी योग्य पुस्तक आढळले नाही, तसेच डोगरी व बोडो भाषेतील साहित्यासाठीचे उर्वरित पुरस्कार नंतर जाहीर करण्यात येणार आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले.
 7. रत्नाकर मतकरी यांना साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. युवा साहित्य अकादमी पुरस्कार नवनाथ गोरे यांच्या फेसाटी या कादंबरीला जाहीर झाला आहे.
 8. रत्नाकर मतकरी यांनी बाल साहित्यात लिहिलेल्या कथा आणि गोष्टी प्रचंड गाजल्या. बालमनावर एक वेगळाच संस्कार करणाऱ्या या कथा होत्या.
 9. नवनाथ गोरे हे मूळचे सांगली जिल्ह्यामधील जत तालुक्यातील उमदी येथील आहेत. सध्या ते शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात संशोधक सहायक आहेत.
 10. याआधी नवनाथ गोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी, बाबा पद्मनजी प्रदीपराव दाते पुरस्‍कार यासह एकूण दहा पुरस्‍कार मिळाले आहेत.
 11. रत्नाकर मतकरी यांचे बाल साहित्य : अचाटगावची अफाट मावशी, अलबत्या गलबत्या, गाऊ गाणे गमतीचे (बालगीते), चटकदार, चमत्कार झालाच पाहिजे, यक्षनंदन, राक्षसराज जिंदाबाद, शाबास लाकड्या, सरदार फाकडोजी वाकडे.
 साहित्य अकादमी पुरस्कार
 1. बाल साहित्य पुरस्काराचे मानकरी : रत्नाकर मतकरी (मराठी), जुगलोचन दास (आसामी), श्रीशेंदू मुखोपाध्याय (बंगाली), सीताराम बासुमतरी (बोडो), इस्टराइन किरे (इंग्रजी), चंद्रकांत शेठ (गुजराती), दिविक रमेश (हिंदी), कांच्यानी शरणप्पा शिवसंगप्पा (कन्नड), झरीफ अहमद झरीफ (काश्मिरी), कुमुद भिकू नाईक (कोंकणी), विद्यानाथ झा (मैथिली), पी. के. गोपी (मल्याळम), खंगेम्बम शामूगोऊ (मणिपुरी), भीम प्रधान (नेपाळी), बिरेंद्र मोहंती (ओडिया), तारसेम (पंजाबी), सी. एल. शंखला (राजस्थानी), संपदानंद मिश्रा (संस्कृत), लक्ष्मीनारायण हंसदा (संताली), कल्पना अशोक चेल्लनी (सिंधी), कृंगाई सेतूपती (तमीळ), नरमशेट्टी उमामहेश्वर राव (तेलुगु), रईस सिद्दीकी (उर्दू).
 2. काव्यसंग्रहासाठीचे युवा पुरस्कार : समरग्नी बंडोपाध्याय (बंगाली), इशा दादावाला (गुजराती), आस्तीक वाजपेयी (हिंदी), विल्मा बंटवाल (कोंकणी), उमेश पासवान (मैथिली), तोंगब्राम अमरजीत सिंग (मणिपुरी), जयंद्रथ सुना (ओडिया), दुष्यंत जोशी (राजस्थानी), मुनी राजसुंदर विजय (संस्कृत), बाल सुधाकर मौली (तेलुगु).
 3. लघुकथांसाठीचे पुरस्कार : बिपाशा बोरा (आसामी), पद्मनाभ भट (कन्नड), धीबा नाझिर (काश्मिरी), छुडेन कबिमू (नेपाळी), राणी मुर्मू (संताली), सनील कृष्णन (तमीळ), शहनाज रेहमान (उर्दू).
 4. कादंबरींसाठीचे पुरस्कार : नवनाथ गोरे (मराठी), अमल (मल्याळम), गुरप्रीत सेहजी (पंजाबी).
 5. नाटकासाठीचे पुरस्कार : चंपा चेतनानी यांच्या सिंधी नाटकाला.


 Berkshire Hathaway, Amazon and J.P. Morgan's healthcare firm, Atul Gavande, has the ax

 1. बर्कशायर हॅथवे, अॅमेझॉन.कॉम आणि जे.पी. मॉर्गन चेस या जगातील तीन बड्या कंपन्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या हेल्थकेअर कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अतुल गावंडे या मराठी माणसाची नियुक्ती केली आहे.
 2. अमेरिकेतील बोस्टनमध्ये कंपनीचे मुख्यालय असेल. येत्या ९ जुलैपासून गवांदे कंपनीच्या मुख्याधिकारीपदाची सूत्रे हाती घेतील.
 3. या तिन्ही कंपनीच्या अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना कमी दरात चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, हा नव्या कंपनीच्या स्थापनेमागे उद्देश आहे.
 4. औषधोपचाराच्या किमतीवर नियंत्रण आणण्याचा या कंपनीचा प्रामुख्याने भर असेल. 
 5. बर्कशायर हॅथवेचे संस्थापक व प्रसिद्ध गुंतवणूक तज्ञ वॉरेन बफे, अॅमेझॉनचे जेफ बेझोस आणि जेपी मॉर्गनचे जामी डायमॉन यांनी जानेवारी महिन्यात या नव्या कंपनीची घोषणा केली होती.
 6. या तिन्ही कंपन्यांच्या ना नफा तत्त्वावर सुरु केलेल्या या कंपनीमुळे १० लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.
 7.  अतुल गावंडे:-
 8. अतुल गावंडे हे वैद्यकीय क्षेत्रातील प्राध्यापक असून ते एंडोक्राइन सर्जन आहेत. आरोग्य क्षेत्रातील चुकीच्या गोष्टींवर त्यांनी नेहमीच टीका केली आहे.
 9. डॉ. गावंडे यांचे आई-वडील अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेत गेले. अतुल यांचा जन्मही अमेरिकेतीलच आहे. त्यामुळे त्यांना भारतीय वंशाचे अमेरिकन म्हणता येईल.
 10. ब्रिगहॅम अँड वुमन्स हॉस्पिटलमध्ये ते नोकरी करतात. ते हार्वर्ड टीएन चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये आरोग्य धोरण व व्यवस्थापन विभागात प्राध्यापक असून, हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये सर्जरीचे प्राध्यापक आहेत.
 11. पेशाने डॉक्टर असलेले अतुल गावंडे उत्तम लेखकही आहेत.
 12. ‘बिंग मॉर्टल : मेडिसीन अँड व्हॉट मॅटर्स इन द एन्ड हे २०१४’ मध्ये त्यांनी लिहिलेले पुस्तक प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते. या पुस्तकातून त्यांनी वृद्धांच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकला होता.
 13. तसेच आरोग्यविषयक वृत्तपत्र लिखाण व अन्य संशोधन यामुळे त्यांच्या क्षेत्रातील आदरणीय व्यक्ती आहेत.
 14. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध होते. अमेरिकेत राबविण्यात आलेल्या ओबामा केअर या आरोग्य योजनेमध्ये डॉ. गावंडे यांचा मोठा वाटा होता.


Top

Whoops, looks like something went wrong.