जातीय सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि मिश्र संस्कृती आणि राष्ट्रीय सद्भावना बाळगण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने देशात 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर 2017 या काळात ‘कौमी एकता सप्ताह’ पाळल्या जाणार आहे.

सप्ताह दरम्यान आयोजित कार्यक्रमे :-

 1. 19 नोव्हेंबर 2017 - राष्ट्रीय एकता दिवस
 2. 20 नोव्हेंबर 2017 - अल्पसंख्यक कल्याण दिवस
 3. 21 नोव्हेंबर 2017 - भाषिक सलोखा दिवस
 4. 22 नोव्हेंबर 2017 - कमकुवत वर्ग दिवस
 5. 23 नोव्हेंबर 2017 - सांस्कृतिक एकता दिवस
 6. 24 नोव्हेंबर 2017 - महिला दिवस
 7. 25 नोव्हेंबर 2017 - संवर्धन दिवस

गृह मंत्रालयाची स्वायत्त संस्था - नॅशनल फाऊंडेशन फॉर कम्युनल हॉरमोनी (NFCH) कडून ‘कौमी एकता सप्ताह’ चे आयोजन केले जाते, जी या काळात जातीय सलोखा मोहिमांचे आयोजन करते आणि 25 नोव्हेंबरला जातीय सलोखा ध्वज दिवस साजरा करते. 


 1. झिम्बाब्वेतील सत्ताधारी पक्ष झेडएएनयू-पीएलने रॉबर्ट मुगाबे यांना पक्षाच्या नेतेपदावरून हटवले आहे.
 2. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झेडएएनयू-पीएलने मुगाबे यांची पत्नीचे प्रतिस्पर्धी एमरसन म्नांगाग्वा यांना पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
 3. मुगाबे यांनी 52 वर्षीय पत्नी ग्रेसचे प्रतिस्पर्धी राहिलेले उपराष्ट्राध्यक्ष एमरसन म्नांगाग्वा यांना बरखास्त केले होते. त्यामुळे लष्कराने सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेऊन मुगाबेंना नजरकैदेत ठेवले होते.
 4. मुगाबे यांच्या पत्नीने देशाची सूत्रे आपल्या हाती यावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. मुगाबे यांची पत्नी ग्रेस यांना यापूर्वीच पक्षाने निलंबित केले आहे. तसेच लष्कराने जेव्हा सत्तेवर नियंत्रण मिळवले तेव्हाच मुगाबे यांची प्रशासनावरील पकड ढिली झाल्याचे दिसून आले होते.
 5. जगात सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे 93 वर्षीय राष्ट्राध्यक्ष मुगाबे यांचा उत्तराधिकारी कोण याबाबत चर्चा सुरू झाली होती. नेमके त्याचवेळी लष्कराने ही कारवाई केली.


 1. 20 नोव्हेंबरला जगभरात ‘सार्वत्रिक बालदिन / जागतिक बालदिन / जागतिक बालहक्क दिन’ (Universal Children’s Day) साजरा केला जातो.यावर्षी हा दिवस “इट्स ए #किड्स टेकओव्हर” या संकल्पनेखाली साजरा केला जात आहे.
 2. लहान बालकांमध्ये सांप्रदायिक आदान-प्रदान व विविध संप्रदाय वा धर्मांबाबतचे सामंजस्य वाढावे तसेच त्यांच्या अधिकारांची जाणीव पालकांमध्ये निर्माण व्हावी या हेतूने हा दिवस साजरा केला जातो.
 3. 20 नोव्हेंबर ही तारीख निवडण्यामागचे कारण म्हणजे, 1959 साली ह्याच तारखेस संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने बालहक्कांची सनद (Declaration of the Rights of the Child) स्वीकारली. शिवाय 1989 साली ह्याच दिवशी बालहक्कांच्या मसुद्यावर स्वाक्षर्‍या झाल्या.
 4. सर्वांत पहिला बालदिन ऑक्टोबर 1953 मध्ये जिनेव्हाच्या 'इंटरनॅशनल युनियन फॉर चाइल्ड वेल्फेअर' या संघटनेच्या पुढाकाराने जगभर साजरा करण्यात आला.
 5. त्यानंतर व्ही. के. कृष्णमेनन ह्यांनी आंतरराष्ट्रीय बालदिनाची संकल्पनेला प्रोत्साहन देत सभेपूढे मांडली, जी 1954 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने स्वीकारली. त्यानुसार, 1954 साली 20 नोव्हेंबरला प्रथम जागतिक बालदिन साजरा झाला.
 6. बालहक्कांमध्ये जगण्याचा अधिकार, ओळख, आहार, पोषण आणि आरोग्य, विकास, शिक्षण आणि मनोरंजन, नाव आणि राष्ट्रीयत्व, कुटुंब आणि कौटुंबिक वातावरण, दुर्लक्ष होण्यापासून सुरक्षा, शोषण, दुर्व्यवहार तसेच बालकांच्या बेकायदेशीर व्यापारापासून बचाव आदी बाबींचा समावेश होतो.
 7. भारतात बालकांची देखरेख आणि सुरक्षा यासाठी मार्च 2007 मध्ये राष्ट्रीय बाल अधिकार सुरक्षेसाठी एक आयोग वा संवैधानिक संस्थेची निर्मिती करण्यात आली. बालहक्कांबाबत लोकांमध्ये जागृती करण्यासाठी गैर-सरकारी संस्था, सरकारी विभाग, नागरी समाज, स्वयंसेवी संघटना आदी यांच्याद्वारा अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.


Top