
1123 26-Jun-2017, Mon
26 जून 2017 रोजी जगभरात ‘अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस’ साजरा करण्यात येत आहे.
वर्ष 2017 मध्ये हा दिवस "लिसन फर्स्ट – लिसनिंग टु चिल्ड्रेन अँड यूथ इज द फर्स्ट स्टेप टु हेल्प देम ग्रो हेल्दी अँड सेफ." या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला आहे
या समस्येसाठी उपाययोजना:-
- संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने एप्रिल 2016 मध्ये अमली पदार्थाच्या बाबतीत विशेष सत्र (UNGASS) आयोजित केले होते.
- या सत्रात 2009 साली निश्चित केलेले धोरण दस्तऐवजाला अनुसरून “जागतिक अमली पदार्थाच्या समस्येला हाताळण्यासाठी एकात्मिक आणि संतुलित धोरणाच्या दिशेने आंतरराष्ट्रीय सहकारासाठी राजकीय घोषणापत्र आणि कार्य योजना” मंजूर करण्यात आले.
- या दस्तऐवजात वर्ष 2019 पर्यंत उद्दीष्टे साध्य करण्यासाठी आणि सदस्य राज्यांकडून ही उद्दीष्टे साध्य करण्यासाठी मार्गदर्शन केले आहे.
पार्श्वभूमी:-
- 7 डिसेंबर 1987 संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत ठराव 42/112 मंजूर करून अमली पदार्थाच्या सेवनापासून मुक्त असा समाज करण्याच्या उद्देशाने 26 जून या तारखेला ‘अमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस’ साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
- या दिवशी अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणार्या विघातक परिणामांविषयी जनजागृती केली जाते.
- अमली पदार्थ आणि गुन्हे यावरील संयुक्त राष्ट्रसंघाचे कार्यालय (UNODC) आणि आयोग यादृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करीत आहे