1. देशातील सर्वात मोठी बँक असा लौकिक असलेल्या एसबीआयने (SBI) आपल्या सहकारी बँकांच्या ग्राहकांना नव्या चेकबुकसाठी अर्ज करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. 
 2. 30 सप्टेंबरपासून आधीचे चेक आणि आयएफएस कोड अवैध मानला जाईल असेही बँकेने स्पष्ट केले आहे. 
 3. ' स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर', ' स्टेट बँक ऑफ हैदराबाद', ' स्टेट बँक ऑफ म्हैसूर', ' स्टेट बँक ऑफ पटियाला', ' स्टेट बँक ऑफ त्रावणकोर' आणि ' भारतीय महिला बँक' या बँकांचे विलीनकरण एसबीआयमध्ये करण्यात आले आहे. या सहाही बँकांचे आधीचे चेकबुक बंद होणार आहेत. 
 4. तसेच या बँकांमध्ये खाती असणाऱ्या सगळ्या ग्राहकांनी लवकरात लवकर  नव्या चेकबुकसाठी अर्ज करावा अशी सूचना एसबीआयने केली आहे. 
 5. नव्या चेकबुकसाठी ग्राहकांनी  थेट बँकेत अर्ज करावा किंवा  इंटरनेट बँकिंग,  एटीएम किंवा मोबाईल बँकिंगचा आधार घेऊन अर्ज करावा असेही एसबीआयने स्पष्ट केले आहे.


 1. जागतिक बँकेने अलीकडेच ‘2016 जाइंट रीपोर्ट ऑन मल्टीलॅटरल डेवलपमेंट बँक्स क्लायमेट फायनॅन्स’ हा अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात जगातल्या सहा मोठ्या बहुपक्षीय विकास बँकांद्वारे (MDBs) हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात झालेल्या वित्तपुरवठ्यासंबंधी नवीनतम आकडेवारी स्पष्ट केली.
 2. या सहा बँका म्हणजे -  आफ्रिकन डेव्हलपमेंट बँक,  एशियन डेव्हलपमेंट बँक,  युरोपियन बॅंक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट,  युरोपियन इनव्हेस्टमेंट बँक,  इंटर-अमेरिकन डेव्हलपमेंट बँक ग्रुप आणि  जागतिक बँक समूह.
 3. जगातल्या सहा मोठ्या बहुपक्षीय विकास बँकांनी (MDBs) सन 2016 मध्ये हवामान बदलाविरुद्धच्या लढ्यात वित्तपुरवठ्यामध्ये अधिकाधिक योगदान देण्यास सुरू ठेवले आहे. त्यांनी सन 2016 मध्ये विकसनशील देश आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना USD 27.4 अब्ज इतका सर्वाधिक वित्तपुरवठा केलेला आहे, जो की सन 2015 मध्ये USD 25 अब्ज इतका होता.
 4. एकूण वित्तपुरवठ्यापैकी, USD 21.2 अब्ज (77%) एवढी रक्कम हवामान उपशमन कार्यांसाठी समर्पित होती, तर उर्वरित 23% रक्कम हवामान अनुकूलन यंत्रणेसाठी समर्पित होती.
 5. सन 2015 मध्ये इतर गुंतवणूकदारांकडून झालेल्या अतिरिक्त वित्तपुरवठ्याबरोबरच बँकांकडून केल्या गेलेल्या एकूण वित्तपुरवठ्याची एकूण रक्कम USD 65.3 अब्जच्या वर पोहोचली.
 6. सन 2016 मध्ये प्रदेशानुसार MDBs मार्फत झालेल्या वित्तपुरवठ्यात,  20% दक्षिण आशियाला, त्याखालोखाल  पूर्व आशियाला  19% तर प्रशांत  महासागर प्रदेश आणि युरोपिय संघाला वगळता यूरोप प्रदेश आणि मध्य आशिया या प्रदेशाला 18% अर्थसहाय्य दिले गेले. मध्य-पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत 9% तर उप-सहारा प्रदेशातल्या  आफ्रिकेला  7% अर्थसहाय्य दिले गेले.
 7. MDBs 2011 सालापासून संयुक्तपणे हवामान बदलासंबंधी वित्तपुरवठ्यात योगदान देत आहेत. त्यांनी गेल्या सहा वर्षांमध्ये एकूण  USD 158 अब्जचे योगदान दिले आहे.


Top