800 Nepali Gurkha employees will be recruited in the British Army

 1. ब्रिटीश लष्कराच्या स्पेशलाइज्ड इंफंट्री बटालियन या नव्या तुकडीत 800 पेक्षा जास्त नेपाळी गुरखा कर्मचार्‍यांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 2. वर्तमानात ब्रिटिश सैन्यात 3% गुरखा कर्मचारी आहेत. 2015 साली त्यांच्या सेवेची 200 वर्षांची सेवा पूर्ण केली.
 3. ब्रिटन-भारत-नेपाळ त्रिपक्षीय कराराच्या अंतर्गत गुरखा कर्मचार्‍यांची भरती केली जाते.
 4. त्याअंतर्गत दरवर्षी नेपाळमधील पोखरा येथील ब्रिटिश गुरखा छावणीत गुरखा कर्मचार्‍यांची भरती केली जाते.
 5. ब्रिटन (ग्रेट ब्रिटन/यूनाइटेड किंगडम/यूके/बर्तानिया) हा युरोप खंडाच्या वायव्येकडे असलेला एक संयुक्त बेटराष्ट्र आहे.
 6. ज्यामध्ये स्कॉटलँड, वेल्स आणि इंग्लंड तसेच उत्‍तर आयरलँड या प्रदेशांचा समावेश आहे.
 7. लंडन हे राजधानी शहर आहे आणि पाउंड स्टर्लिंग (GBP) हे राष्ट्रीय चलन आहे.
 8. नेपाळ हा एक दक्षिण आशियाई देश आणि भारताचा शेजारी देश आहे.
 9. हा हिमालय पर्वतराजीमध्ये वसलेला भूपरिवेष्टित देश आहे. ‎काठमांडू ही देशाची राजधानी आहे.
 10. नेपाळी रुपया (NPR) हे राष्ट्रीय चलन आहे.


Financial Stability and Development Council in relation to the credit rating quality

 1. क्रेडिट रेटिंगच्या गुणवत्तेशी संबंधित आव्हानांना संबोधित करण्यासाठी RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक स्थिरता व विकास परिषदेची (FSDC) उप-समिती तयार करण्यात आली आहे.
 2. सध्या भारतीय सिक्युरिटी व विनिमय मंडळ (SEBI) कडून क्रेडिट रेटिंग संस्था नियंत्रित केल्या जात आहेत.
 3. मात्र अर्थव्यवस्थेला कमकुवत करणार्‍या IL&FS डीफॉल्टर व्यक्तींच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पतधोरणात बदल करण्याकरिता त्यासंबंधी अभ्यास करण्याकरिता हा निर्णय घेतला गेला आहे.
 4. तसेच ही समिती गृहनिर्माण वित्त कंपन्या आणि गृहनिर्माण विकसक यांच्यातल्या दुव्यांच्या संदर्भात अभ्यास करीत आहे.
 5. त्याशिवाय विविध नियमन डेटाबेस आणि राष्ट्रीय वित्तीय समावेशन धोरण (NSFI) यांच्यातला परस्परसंबंध या विषयाचा देखील विचार करीत आहे.
 6. भारतीय सिक्युरिटी व विनिमय मंडळ (SEBI):- 
  1. हे भारतामधील सिक्युरिटी (सुरक्षा बंध/कर्जरोखे/रोखे/किंवा अन्य उत्पादने) संदर्भात बाजारपेठेचे नियामक आहे.
  2. 1988 साली या संस्थेची स्थापना केली गेली आणि ‘SEBI अधिनियम-1992’ अन्वये दि. 30 जानेवारी 1992 रोजी याला वैधानिक दर्जा प्राप्त झाला.
  3. मुंबईत त्या मंडळाचे मुख्यालय आहे.


IDBI Bank is classified as Private Sector Bank

 1. भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) भारतीय स्टेट बँक (SBI), ICICI बँक आणि HDFC बँक या बँकांना स्थानिक प्रणालीबद्ध महत्त्वपूर्ण बँका (Domestic Systemically Important Banks / D-SIBs) म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. तर IDBI बँकेला खासगी क्षेत्र बँक या गटात वर्गीकृत केले गेले.
 2. प्रस्तावानुसार, 2019-20 या आर्थिक वर्षात SBI आपल्या जोखमी-भारित मालमत्तेच्या 0.60 टक्के रक्कम बाजूला ठेवेल, ज्याला कॅपिटल बफर असे म्हणतात. तर ICICI बँक आणि HDFC बँकेसाठी हे प्रमाण 0.20 टक्के असेल.
 3. वर्गीकरणाविषयी:-
  1. दरवर्षी RBI देशातल्या बँकांना वर्गीकृत करते, ज्याचा उद्देश त्यांचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम व्यवस्थापित करण्यासाठी बँकिंग प्रणालीला सक्षम करणे हा आहे.
  2. स्थानिक प्रणालीबद्ध महत्त्वपूर्ण बँका (D-SIBs) या वर्गासंबंधी नियमांनुसार बँकेला त्यांच्या कामाकरिता आणखी भांडवल बाजूला काढून ठेवणे आवश्यक आहे. ज्याची मालमत्ता GDP च्या 2% पेक्षा जास्त आहे, त्या बँकेला या गटाचा भाग मानला जातो.
  3. या वर्गात समाविष्ट करण्यात आलेल्या बँकांपैकी कोणतीही बँक अपयशी झाल्यास भारतीय वित्तीय व्यवस्थेवर त्याचा प्रभाव पडणार असा अर्थ होतो.
 4. भारतीय बँकिंग प्रणाली:-
  1. नागरिक, व्यापारी, शेतकरी, व्यवसायिक, उद्योजक, सरकार, शेयर मार्केट आणि देशी-परदेशी संस्था यांच्याशी आर्थिक व्यवहार करणार्‍या संस्थेस बँक म्हणतात.
 5. भारतातल्या बँकांचे प्रकार -
  1. पेमेंट बँक
  2. व्यापारी बँक (शेड्यूल्ड बँक आणि नॉन शेडयूल्ड बँक असे दोन प्रकार)
  3. शेड्यूल्ड बँक (1934 सालच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कायद्यात दुसर्‍या क्रमांकाच्या शेड्यूल्डमध्ये नाव असलेल्या बँका, उदा. SBI आणि तिच्या उपबँका, HDFC बँक)
  4. नॉन-शेड्यूल्ड बँक (उदा. जम्मू अँड काश्मीर बँक)
  5. सहकारी बँक (नागरी आणि गैरनागरी)
  6. विभागीय/प्रादेशिक ग्रामीण बँका (RRB) (उदा. महाराष्ट्र ग्रामीण बँक)
 6. RBI:-
  1. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारतातील केंद्रीय बँकिंग संस्था आहे, जी भारतीय रुपया चलनाचे आर्थिक धोरण नियंत्रित करते. ‘भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम-1934’ च्या उपबंधानुसार ब्रिटिश राजवटीत संस्थेचे दि. 1 एप्रिल 1935 पासून कार्य सुरू झाले. दि. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, RBI चे दि. 1 जानेवारी 1949 रोजी राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
  2. भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) या शहरात आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनी त्याच्या कार्यपद्धती संदर्भात शैली आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘दि प्रॉब्लेम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्यूशन’ या पुस्तकातून घेतले.
  3. RBIच्या मुख्यालयी एक पूर्ण वेळ गव्हर्नर आणि जास्तीत-जास्त चार उप गव्हर्नर नियुक्त केले जातात. सर ओसबोर्न स्मिथ (1 एप्रिल 1935 - 30 जून 1937) हे RBI चे पहिले गव्हर्नर होते.
  4. सर सी॰ डी॰ देशमुख (11 ऑगस्ट 1943 - 30 जून 1949) हे RBIचे तिसरे आणि प्रथम भारतीय गव्हर्नर होते.


National Supercomputing Campaign

 1. राष्ट्रीय सुपरकंप्यूटिंग अभियान (NSM) अंतर्गत 1.3 पेटाफ्लॉप क्षमतेची उच्च-कार्यक्षम संगणकीय सुविधा आणि डेटा सेंटर स्थापित करण्यासाठी खडगपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) आणि प्रगत संगणकीय विकास केंद्र (C-DAC) यांच्यात सामंजस्य करार अलीकडेच झाला.
 2. नव्या प्रणालीचा उपयोग क्रिप्टोग्राफी, हवामानशास्त्र, रसायनशास्त्र, अणुशास्त्र, औषधी, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माहिती विज्ञान अशा क्लिष्ट आव्हानात्मक क्षेत्रांमध्ये संगणकीय कामांसाठी होईल.
 3. अभियानाविषयी:-
  1. 2016 साली राष्ट्रीय सुपरकंप्यूटिंग अभियान (NSM) मंजूर करण्यात आले.
  2. या अभियानाची अंमलबजावणी विज्ञान व तंत्रज्ञान विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभाग संयुक्तपणे करीत आहे.
  3. या अभियानाच्या अंतर्गत 70 पेक्षा जास्त उच्च-कार्यक्षम संगणकीय सुविधांचे जोडलेले जाळे प्रस्थापित करण्यासाठी देशभरातल्या राष्ट्रीय शैक्षणिक आणि संशोधन व विकास संस्थांना सशक्त करणे हा हेतू आहे.
  4. ही प्रणाली राष्ट्रीय नॉलेज नेटवर्क (NKN) यावर राष्ट्रीय सुपरकंप्यूटिंग ग्रिडशी जोडण्यात येईल.
  5. याअंतर्गत शैक्षणिक संस्था आणि संशोधन व विकास प्रयोगशाळांना जोडले जात आहे.
  6. BHU वाराणसी या संस्थेत सी-डॅक द्वारा अभियानाच्या अंतर्गत प्रथम सुपरकंप्यूटर तयार केला गेला.
  7. त्याला "परम शिवाय" (PARAM Shivay) हे नाव देण्यात आले.
  8. हा सुपरकंप्यूटर एक लाख वीस हजारांहून अधिक कामे करू शकतो आणि त्याची सर्वोच्च गणना क्षमता 833 टेराफ्लॉप एवढी आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.