Scientists developed a new method for preparing 3D print food

 1. दक्षिण कोरियामधील इवाहा वुमन्स यूनिवर्सिटी येथील शास्त्रज्ञांनी 3D प्रिंटींग क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर करून खायचे अन्नपदार्थ तयार करण्यासाठी एक नवीन तंत्र विकसित केले आहे.
 2. जे वापरकर्त्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार स्वयंपाक करण्याची सुविधा देते.
 3. 3D प्रिंटींग पद्धतीत अंतिम उत्पादन तयार करण्यासाठी कच्चा मालांचा थर रचला जातो.
 4. याचप्रकारे अन्नपदार्थ तयार करण्यासाठी फूड मायक्रोस्ट्रक्चर तयार केले जाते.
 5. त्यासाठी शाई म्हणून कार्बोहायड्रेट आणि प्रथिने यांसारख्या अन्नघटकांचा वापर केला जातो.


Ministry's 'National Energy Storage Campaign' to save renewable energy

 1.  भारतात निर्माण झालेली अक्षय ऊर्जा साठवून ठेवण्याकरिता ग्रिडशी जोडलेला साठा तयार करून कार्यरत करण्यासाठी केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने ‘राष्ट्रीय ऊर्जा साठवणूक मोहीम’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
 2. या मोहिमेसाठी एक मसुदा तयार करण्यात आला आहे.
 3. या मोहीमेंतर्गत एक नियामक कार्यचौकट स्थापन केले जाईल आणि ऊर्जा साठवून ठेवण्याकरिता लागणार्‍या बॅटरींच्या देशी उत्पादनास प्रोत्साहन दिले जाईल.
 4. पुढाकाराचे महत्त्व:-
  1. आज अक्षय ऊर्जा स्रोत भारताच्या एकूण प्रस्थापित वीज क्षमतेचा सुमारे पाचवा भाग आहे.
  2. जरी पॉवरग्रिड सौर व पवन ऊर्जा क्षमतेत वाढ करीत आहेत तरीही भारताची एकूण ऊर्जा मागणी अक्षय स्त्रोतांपासून पूर्ण केली जाऊ शकत नाही.
  3. याचे एकमेव कारण म्हणजे अक्षय स्त्रोतांची क्षमता कालमानानुसार बदलणारी आहे.
  4. उदा. दुपारच्या वेळेस सौर ऊर्जा उत्पादन अधिक असते तर इतर वेळेस आणि आभाळ असल्यास कमी असते.
  5. तसेच वारा नसल्यास पवन ऊर्जा निर्माण होऊ शकत नाही.
  6. यावर एक उपाययोजना म्हणून निर्मित ऊर्जेला बॅटरीमध्ये साठवून ठेवणे.
  7. मात्र सध्या भारतात ऊर्जा साठवून ठेवण्याचा कोणताही पर्याय उपलब्ध नाही.
  8. त्यामुळे या मोहिमेची भूमिका महत्त्वाची ठरते.
‘राष्ट्रीय ऊर्जा साठवणूक मोहीम’
 1. मोहीम संदर्भात:-
  1. राष्ट्रीय ऊर्जा साठवणूक मोहीमेंतर्गत येत्या 5 वर्षांमध्ये 15-20 GWh (गिगावॉट अवर) क्षमतेचा ग्रिडशी जोडलेला साठा तयार करण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे.
  2. ही मोहीम 7 घटकांवर केंद्रीत आहे:-
   1. स्वदेशी उत्पादन;
   2. तंत्रज्ञान व खर्चासंबंधी कल याचे मूल्यांकन;
   3. धोरण व नियमन कार्यचौकट;
   4. वित्त पुरवठा,
   5. व्यापार पद्धती आणि बाजारपेठ निर्मिती;
   6. संशोधन व विकास;
   7. मानके व चाचणी व्यवस्था;
   8. ऊर्जेच्या साठ्यासाठी ग्रिड योजना.


Gujarati poet Sitanshu Yeshaschandra's selection for 27th Saraswati Award

 1. गुजराती कवी सीतांशु यशसचंद्र यांचा कवितासंग्रह “वखार” 2017 सालच्या सरस्वती सन्मानासाठी निवडण्यात आला आहे.
 2. लोकसभेचे माजी महासचिव सुभाष सी. कश्यप यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय निवड परिषदेने या सन्मानासाठी या कवितासंग्रहाची निवड केली आहे.
 3. सरस्वती सन्मान:-
  1. सरस्वती सन्मान या पुरस्काराची के. के. बिर्ला फाउंडेशनतर्फे 1991 साली स्थापना केली गेली.
  2. भारतीय संविधानाच्या अनुसूची VIII मध्ये उल्लेख केलेल्या कोणत्याही भारतीय भाषेत लिहीलेल्या आणि गेल्या 10 वर्षात प्रकाशित झालेल्या उल्लेखनीय साहित्यकृतीच्या सन्मानार्थ भारतीय नागरिकाला हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो.
  3. पुरस्कारामध्ये प्रशस्तिपत्र, 15 लाख रुपये रोख आणि एक सन्मानचिन्ह दिले जाते.
सीतांशु यशसचंद्र
 1. गुजरातच्या भुजमध्ये 1941 साली जन्मलेले सीतांशु यशसचंद्र समकालीन गुजराती साहित्याचे एक प्रमुख प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात.
 2. कवी, नाटककार, अनुवादक आणि शिक्षणतज्ज्ञ यशसचंद्र यांनी तीन कवितासंग्रह लिहिलेले आहेत.
 3. 2008 साली प्रसिद्ध झालेल्या “वखार” या कवितासंग्रहात व्यापक आणि अतिशय तत्काळ मानवी स्थिती समाविष्ट आहेत.
 4. त्यांचे अन्य दोन कवितासंग्रह म्हणजे – “ओडीसेस नु हालेसु (1974)” आणि “जटायू (1986)”.
 5. त्यांच्या “जटायू” साहित्याला 1987 साली गुजरातीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
 6. त्यांना 2006 साली पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.
 7. त्यांनी कवितांसोबतच 10 नाटके आणि 3 टीकात्मक पुस्तके लिहिलेली आहेत.


Ask SEBI to review rules for public welfare underwriting

 1. सिक्युरिटीज अपीलीय न्यायाधीकरण (SAT) कडून सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) यांना सार्वजनिक कल्याणासंबंधी अंडररायटिंगसाठी असलेल्या नियमांचे पुनरावलोकन करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.
 2. SEBI चा मॉडेल अंडररायटिंग करार आणि ICDR (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) विनियम यांच्यामध्ये कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे न्यायाधिकरणाने हा आदेश दिला.
 3. अंडररायटिंगसाठी असलेले नियमन हा एक आदर्श करार आहे.
 4. जो 1993 साली तयार केला गेला होता आणि तेव्हापासून लागू करण्यात आला आहे.
 5. अंडररायटिंग हे एक तंत्र आहे, ज्याद्वारे एक व्यवहारी बँकर एक अंडरटेकिंग देतो की, इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) अंडरसब्सक्राइब्ड (एकही नोंदणी न होणे) असल्याच्या परिस्थितीत, बँकर विकल्या न गेलेल्या समभागांसाठी स्वताःच नोंदणी करणार आहे.
 6. अंडररायटिंगची तरतूद सर्व SME IPOना सक्तीचे आहे.
 7. ही पद्धत गुंतवणूकदारांकडून कमी मागणी असल्यास नोंदणीकृत प्रस्ताव वाया जाऊ देत नाही.
 8. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) हे भारतामधील सिक्युरिटीज बाजारपेठेचे नियामक आहे.
 9. 1988 साली याची स्थापना केली गेली आणि SEBI अधिनियम 1992 अन्वये 30 जानेवारी 1992 रोजी आला वैधानिक दर्जा दिला गेला.


 Zimbabwe has allowed marijuana cultivation for medicinal and scientific uses

 1. झिम्बाब्वे सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या नव्या निर्णयानुसार, इच्छूक व्यक्ती आणि मंडळ मारिजुआनाचे उत्पन्न घेण्यासाठी परवान्यासाठी अर्ज करू शकतात.
 2. या निर्णयासोबतच, 2017 साली लेसोथो हा वैद्यकीय उपयोगासाठी मारिजुआनाच्या लागवडीकरिता परवाना देणारा आफ्रिकेतला पहिला देश ठरलेला आहे.
 3. मारिजुआना हा कॅनाबीस वनस्पतीपासून प्राप्त होणारा आणि तो मानसिक अवस्थेवर परिमाण करणारा अमली पदार्थ आहे.
 4. ज्याचा वैद्यकीय किंवा मनोरंजक म्हणून वापर होतो.
 5. झिम्बाब्वेमध्ये यापूर्वी त्याचे उत्पन्न घेतल्यास आणि साठा केल्यास 12 वर्षांपर्यंत कारावास होता.
 6. मात्र यानंतरही मनोरंजक म्हणून याचा उपयोग बेकायदेशीर समजल्या जाणार आहे.
 7. झिंबाब्वे हा दक्षिण आफ्रिकेतला एक देश आहे. 
 8. या देशाची राजधानी हरारे हे शहर आहे आणि झिंबाब्वे डॉलर हे राष्ट्रीय चलन आहे.
 9. या देशाची इंग्रजी ही अधिकृत भाषा आहे.


Top