A successful launch of 'GSAT 7A' from Isro

 1. भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन 19 डिसेंबर रोजी ‘जीसॅट-7 ए’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
 2. नियोजित वेळेनुसार संध्याकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी GSLV-F11 रॉकेट जीसॅट-7 ए उपग्रहाला घेऊन अवकाशाच्या दिशेने झेपावला. खास लष्करी सेवेसाठी बनवण्यात आलेला हा दुसरा दळणवळण उपग्रह आहे.
 3. भारतीय हवाई दलासाठी या उपग्रहाचे प्रक्षेपण अत्यंत महत्वाचे आहे. कारण जीसॅट-7 ए या दळणवळण उपग्रहामुळे हवाई दलाला जमिनीवरील विविध रडार स्टेशन्स, हवाई तळ आणि अॅवाक्स विमानांचे नेटवर्क परस्परांशी जोडणे शक्य होईल.
 4. जीसॅट-7 ए हा लष्कराचा 39 वा दळणवळण उपग्रह आहे.
 5. या दळणवळण उपग्रहाचा खर्च ५०० ते ८०० कोटी रुपये आहे. या उपग्रहाच्या चार सौर पॅनलमध्ये ३.३ किलोवॅट इलेक्ट्रीक पावर निर्माण करण्याची क्षमता आहे.
 6. जीसॅट ७ ए आधी इस्त्रोने जीसॅट ७ ज्याला रुक्मिणी म्हटले जाते तो उपग्रह २९ सप्टेंबर २०१३ रोजी प्रक्षेपित केला आहे. खास नौदलासाठी या उपग्रहाची निर्मिती करण्यात आली आहे.
 7. जीसॅट ७ च्या मदतीने नौदलाला २ हजार सागरी मैल क्षेत्रावर लक्ष ठेवता येते. भारतीय नौदलाच्या युद्धनौका, पाणबुडया आणि लढाऊ विमाने कुठे आहेत त्याची माहिती मिळते.


The cluster university will be established in Mumbai

 1. डॉ. होमी भाभा विद्यापीठास मंत्रिमंडळ मान्यता
 2. राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियान(RUSA) अंतर्गत 4 कॉलेजचे मिळून- 1 विद्यापीठ स्थापन केले जात आहे.
 3. हे राज्यातील पहिले क्लस्टर विद्यापीठ तर देशातील तिसरे
 4. शासकीय विज्ञान संस्था , सिडनेहॅम कॉलेज , एल्फिन्स्टन कॉलेज , शासकीय अध्यापक महाविद्यालय या 4 कॉलेजचे एकत्रित - डॉ. होमी भाभा क्लस्टर विद्यापीठ असणार आहे.


Inaugurating 'Asian Singh Conservation Project' in New Delhi

 1. 20 डिसेंबर 2018 रोजी भारत सरकारच्या केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाकडून ‘आशियाई सिंह संवर्धन प्रकल्प’ याचे उद्घाटन केले गेले.
 2. जगामधील आशियाई सिंहांच्या शेवटच्या प्रजातींचे संरक्षण आणि संवर्धन करण्याकरिता आणि त्यांच्या संबंधित पर्यावरणविषयक घटक कायम राखण्याकरिता हा प्रकल्प राबविला जात आहे.
 3. या प्रकल्पाच्या अंतर्गत प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने, नियमित वैज्ञानिक शोधकार्याद्वारे, रोग व्यवस्थापन, पाळत तंत्राच्या सहाय्याने आशियाई सिंहांच्या संरक्षणार्थ उपस्थित उपाययोजनांना बळकटी आणणार.
 4. प्रकल्पासाठी 3 वर्षाकरिता सुमारे 9784 लक्ष रुपये खर्चीले जाणार, जो केंद्र प्रायोजित योजना-वन्यजीवन अधिवासाचा विकास (CSS-DWH) अंतर्गत मंजूर करण्यात आला आहे.
 5. सिंहांची वर्तमान स्थिती~पर्शिया (इराण) ते पूर्व भारतामधील पलामाऊ पर्यंत असलेल्या भागात आशियाई सिंह आढळून येतात, जे आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत.
 6. 1890च्या दशकाच्या अखेरीस गुजरातच्या गिर वनात 50 सिंहांपेक्षा कमी संख्या होती, मात्र सरकारच्या प्रयत्नांमुळे ही संख्या 2015 साली 523 इतकी भरली.


Publication of 'Timeless Laxman' book by Modi

 1. मुंबई येथे रिपब्लिक समीट' या कार्यक्रमात त्यांच्या हस्ते 'टाइमलेस लक्ष्मण या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं.
 2. हे पुस्तक व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या जीवनावर आधारित आहे.
 3. यावेळी मोदींनी लक्ष्मण यांच्या आठवणींना उजाळा दिला.
 4. कार्टुनमधून अनेक विषयांवर लक्ष्मण यांनी भाष्य केल्याचेही त्यांनी म्हटले.


Top