
1777 11-Mar-2019, Mon
- 2016 साली स्थापना झालेल्या ‘ACKO जनरल इंशुरन्स’ या भारताच्या प्रथम डिजिटल विमा कंपनीला ‘गोल्डन पीकॉक इनोवेटिव्ह प्रॉडक्ट पुरस्कार-2019’ या प्रतिष्ठित सन्मानाने गौरविण्यात आले आहे.
- हा पुरस्कार कंपनीच्या "ओला राइड इंशुरन्स" या मायक्रो इन्शुरन्स उत्पादनासाठी दिला गेला आहे.
- अलीकडेच दुबईत पार पडलेल्या एका सोहळ्यात या पुरस्काराचे वाटप करण्यात आले.
- पुरस्काराविषयी:-
- 1991 साली ‘कॉर्पोरेट नेतृत्व आणि उत्कृष्टता’ यासाठी दिल्या जाणार्या ‘गोल्डन पीकॉक अवॉर्ड’ या पुरस्काराची स्थापना करण्यात आली.
- भारताच्या ‘इंस्टीट्यूट ऑफ डायरेक्टर्स’ या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.
- स्थानिक आणि जागतिक पातळीवरील व्यवसायाच्या उत्कृष्टतेचे प्रतीक म्हणून आज या पुरस्काराला ओळखले जाते.
- त्याअंतर्गत दिला जाणारा ‘गोल्डन पीकॉक इनोवेटिव्ह प्रॉडक्ट/सर्व्हिस अवॉर्ड’ हा विद्यमान बाजारपेठेच्या मागण्यांनुसार उत्पादने आणि सेवा विकसित करण्यासाठी संस्थात्मक नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी तयार केलेला आहे.