Ankur Mittal won the double trap gold medal in the ISSF World Championships

 1. दक्षिण कोरियाच्या चांगवॉन येथे सुरू असलेल्या 52व्या ISSF विश्व नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय नेमबाज अंकुर मित्तल ह्याने पुरूषांच्या डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक पटकावले आहे.
 2. 1986 साली आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) कडून ऑलंपिक स्पर्धांमध्ये पात्रता सिद्ध करण्यासाठी एक एकसंध प्रणाली म्हणून ISSF विश्वचषक स्पर्धेची स्थापना करण्यात आली.
 3. दरवर्षी चार स्पर्धा घेतल्या जातात.
 4. सर्वोत्तम नेमबाजांसाठी 1988 सालापासून ISSF विश्वचषक अंतिम ही स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.
 5. 1907 साली ISSF ची स्थापना करण्यात आली आणि याचे मुख्यालय म्यूनिच (जर्मनी) येथे आहे.


Non-resident Indians should be allowed to manage foreign funds: SEBI Committee

 1. KYC आणि लाभार्थी मालकीच्या नियमांविषयी जाणून घेण्याच्या दिशेने विदेशी गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी, भारतीय सिक्युरिटीज व विनिमय मंडळाने (SEBI) नेमलेल्या समितीने काही शिफारसी केल्या आहेत.
 2. अनिवासी भारतीयांद्वारा (NIRs) आणि भारतीय मूळ असलेल्या लोकांद्वारा (PIOs) व्यवस्थापित केल्या जाणार्‍या आणि त्यांच्या मालकीच्या निधीच्या समावेशासह बर्‍याच परदेशी निधीतून उठलेल्या समस्यांची चिंता बघता, नव्या दिशानिर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी शिफारसी केल्या आहेत.
 3. RBIच्या माजी डिप्टी गव्हर्नर एच. आर. खान यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने केलेल्या शिफारसी -
  1. अनिवासी भारतीय, भारताचे परदेशी नागरीक आणि निवासी भारतीयांना फॉरेन पोर्टफोलिओ इनवेस्टमेंट (FPIs) यामधील अनियंत्रित समभाग विकत घेण्यासाठी अनुमती देण्यात यावी आणि गुंतवणूकीसाठी नसणार्‍या FPIs किंवा SEBIकडे नोंदणीकृत सागरापलीकडील निधी व्यवस्थापित करण्यासाठी त्यांच्यावर कोणतेही निर्बंध लादले जाऊ नये.
  2. निधीमधील सिंगल होल्डिंग 25% पेक्षा कमी आणि ग्रुप होल्डिंग 50% पेक्षा कमी असल्यास अनिवासी भारतीयांना फॉरेन पोर्टफोलिओ इनवेस्टमेंट (FPIs) म्हणून गुंतवणूक करण्याची परवानगी दिली जावी.


Amitabh Chaudhary: The Managing Director and Chief Executive Officer of Axis Bank

 1. अमिताभ चौधरी यांची अॅक्सिस बँकचे पुढील व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
 2. 1 जानेवारी 2019 पासून ते कार्यभार स्वीकारतील.
 3. चौधरी यांची शिखा शर्मा यांच्या जागी केली गेली आहे.
 4. ही नेमणूक तीन वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे.
 5. अमिताभ चौधरी सध्या HDFC लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे MD व CEO आहेत.


The Maharashtra government will knock a penalty for the defecation

 1. महाराष्ट्र राज्य सरकारने खुल्यावर शौच करणार्‍याला, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार्‍याला आणि थुंकणार्‍याला दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.
 2. दंड –
  1. खुल्यावर शौच करणार्‍याला – 500 रूपयांपर्यंत
  2. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार्‍याला - 180 रूपयांपर्यंत
  3. सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍याला - 150 रूपयांपर्यंत
  4. ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ अश्या श्रेणीनुसार दंड आकारला जाणार आहे.


Top