
794 30-Mar-2019, Sat
1.अर्जेटिनाचा आक्रमक गोन्सालो ईग्वेनने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. मी खेळाला देऊ शकत होतो ते सारे काही दिले, अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या.
2. देशा कडून निवृत्ती स्वीकारल्यानंतर मी माझ्या चेल्सी क्लबला आणि कुटुंबाला अधिक वेळ देऊ शकणार असल्याचे ईग्वेनने सांगितले.
3. 2014चा विश्वचषक तसेच 2015 आणि 2016चे कोपा अमेरिकाच्या अंतिम फेरीपर्यंत अर्जेटिनाला पोहोचवण्यात त्याचे योगदान महत्त्वाचे होते. मात्र तरीदेखील संघाला विजेतेपद मिळवून देण्यात अपयशी ठरल्याबाबत त्याच्यावर टीका झाली होती.