asia cricket worldcup started

 1. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने विश्रांती घेतली असली तरी भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत नेहमीच क्रिकेटरसिकांसाठी खास पर्वणी राहिली आहे.
 2. याच पाश्र्वभूमीवर 15 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेकडे सर्वाचे डोळे लागले आहेत. 
 3. सहा देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचा प्रारंभ बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने होणार आहे.
 4. गेल्या काही वर्षांत बागंलादेशने या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
 5. 2016 मध्ये मायभूमीत झालेल्या स्पर्धेत त्यांनी अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. तसेच 2012 मध्येसुद्धा त्यांनी मश्रफी मोर्तझाच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत मजल मारली होती.
 6. बागंलादेशची फलंदाजी अनुभवी तमिम इक्बाल आणि शकिब-अल-हसन यांच्यावर प्रामुख्याने अवलंबून आहे.
 7. दुसरीकडे श्रीलंकेला गेल्या दोन वर्षांत भारताकडून तिन्ही प्रकारात सपशेल शरणागती पत्करावी लागली.
 8. अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज, उपुल थरंगा, थिसारा परेरा आणि लसिथ मलिंगावर श्रीलंकेची भिस्त आहे. त्याशिवाय युवा खेळाडू अकिला धनंजया, दसून शनाका आणि कसुन रजिथा यांच्याकडे ही सर्वाच्या नजरा आहेत.
 9. कामगिरीतील सातत्य राखण्यात श्रीलंकेला मागील काही मालिकांपासून अपयश येत आहे. यावर त्यांना लवकरच योग्य तोडगा काढावा लागेल.


air force also participated in space mission

 1. मानवाला अवकाश मोहिमेवर पाठविण्याच्या निवड प्रक्रियेमध्ये भारतीय हवाई दलाचाही सहभाग असणार आहे. यासंबंधीच्या अभ्यासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 2022च्या अंतिम मुदतीपर्यंत यामध्ये यश येईल, असा विश्‍वास हवाई दल प्रमुख बी.एस. धनोआ यांनी व्यक्त केला.
 2. एरोस्पेस मेडिसिन संस्था आधीपासूनच अंतराळवीरांच्या निवडीत सक्रिय सहभागी आहे. आम्हीही आता सहभागी होऊ.
 3. अतिशय कमी कालावधीत आम्ही ही कामगिरी बजावण्यात सक्षम होऊ याची मला खात्री आहे, असे त्यांनी येथील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.
 4. इंडियन सोसायटी ऑफ एरोस्पेस मेडिसिनच्या तीन दिवसांच्या 57व्या वार्षिक परिषदेत धनोआ बोलत होते.
 5. एरोस्पेस मेडिसिन तज्ज्ञ हे प्रत्यक्ष कार्यस्थळावर हवाई कर्मचाऱ्यांचे सर्वोत्कृष्ट मित्र असतात, असेही त्यांनी नमूद केले.
 6. यांनी स्वातंत्र्य दिनादिवशी केलेल्या भाषणात भारतीय अंतराळवीर 2022पर्यंत अंतराळात प्रवास करतील, असा विश्‍वास व्यक्त केला होता. याच मुद्द्यावर बोलताना भारतीय एरोस्पेस मेडिसिन कमांडंटचे एअर कमोडोर अनुपम अगरवाल यांनीही अंतरावीरांची निवड करण्यासाठी आम्हाला 12 ते 14 महिन्यांचा कालावधी लागेल, असे स्पष्ट केले.
 7. अवकाश प्रवासासाठी अंतराळवीर तयार करणे हे आमच्यासाठी अतिशय उत्कृष्ट आव्हान असल्याचेही त्यांनी नमूद केले.


bimstec excercise at pune

 1. बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक को-ऑपरेशन म्हणजेच ‘बिम्सटेक’ या संघटनेचे सदस्य असलेल्या सात देशांचा पहिला लष्करी युद्ध सराव पुण्यात पार पडतोय.
 2. यामध्ये शस्त्रसज्जतेसोबतच चकमकीमध्ये दहशतवाद्यांचा मुकाबला करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा सराव इथे केला जातोय.
 3. तत्परता, शिस्त, चपळता आणि धाडस हे सैनिकाचं वैशिष्ट्य. मग हा सैनिक भारतीय सैन्यातला असो किंवा इतर कुठल्याही सैन्यातला.
 4. पुण्यातील औंधमधल्या लष्करी मैदानावर हीच गुण वैशिष्ट्ये सध्या दर्शनीय आहेत.
 5. ‘बिम्सटेक’मध्ये भारत, बांगलादेश, नेपाळ, भूटान, श्रीलंका, थायलंड आणि म्यानमार या देशांचा समावेश आहे.
 6. या युद्ध सरावात प्रत्यक्षपणे भारत, बांगलादेश, भूटान, श्रीलंका आणि म्यानमार हे सहभागी झाले आहेत.
 7. तर नेपाळ आणि थायलंड या देशांनी सैन्य तुकडी न पाठवता फक्त निरीक्षक पाठवले आहेत. दहशतवादाचा सामना करण्यासाठी या युद्ध सरावाचं आयोजन करण्यात आलं आहे.
 8. दहशतवाद्यांना तोंड देण्यासाठी ज्या कौशल्यांची आवश्यकता असते, त्यांची देवाणघेवाण या युद्ध सरावाच्या माध्यमातून केली जात आहे.
 9. 10 सप्टेंबरपासून याची सुरुवात झाली आणि 16 सप्टेंबरला त्याची सांगता होणार आहे. या दरम्यान सहभागी देशांच्या सैन्य तुकड्या थिअरॉटीकल आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून युद्ध सराव करत आहेत.
 10. शहरी भाग तसेच घनदाट जंगलाच्या भागात दहशतवादविरोधी कारवाई यशस्वीपणे करण्यासाठी हे सैनिक सज्ज होत आहेत. यामध्ये सहभागी झालेल्या देशांच्या तुकडीमध्ये 25 सैनिक आणि 5 निरीक्षकांचा समावेश आहे.
 11. या सरावात सहभागी होऊन अनेक नव्या युक्त्या शिकायला मिळाल्याची भावना सहभागी झालेल्या सैनिकांनी व्यक्त केली आहे.


नेपाळ आणि थायलंडचा सहभाग का नाही?

नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये झालेल्या बिम्सटेक संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सदस्य देशांना युद्धसरावाचं निमंत्रण दिलं होतं.

थायलंड वगळता सर्व देशांनी आपण यात सहभागी होणार असल्याचं सांगितलं. थायलंडने तेव्हाच स्पष्ट केलं होतं, की आपण फक्त निरीक्षक म्हणून यामध्ये सहभाग घेऊ. नेपाळने मात्र ऐनवेळी यातून माघार घेतली. नेपाळमधील अंतर्गत राजकीय कारण यामागे सांगितलं जात आहे. यानंतर नेपाळने फक्त निरीक्षकाच्या भूमिकेत यामध्ये सहभाग घेतला.


Top

Whoops, looks like something went wrong.