chalu ghadamodi, current affairs

1. टीम इंडियाच्या भविष्यासाठी बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने राहुल द्रविडची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख म्हणून निवड केली आहे.

2. बीसीसीआय बंगळुरुमध्ये असणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा कायापालट करण्याच्या तयारीत आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. तरुण खेळाडूंना क्रिकेटचे योग्य धडे मिळावेत यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

3. तर 19 वर्षाखालील संघातील गुणवान खेळाडूंना हेरून त्यांना तयार करण्याचं मोठं काम राहुल द्रविडच्या खांद्यांवर असणार आहे. याचसोबत राहुल द्रविडकडे बीसीसीआयशी संलग्न असणाऱ्या क्रिकेट अकादमींच्या प्रशिक्षकपदाची नेमणूकीचे अधिकारही देण्यात आले आहेत.


chalu ghadamodi, current affairs

1. नाग या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राचा लवकरच लष्कराच्या ताफ्यात समावेश होईल. रविवारी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) पोखरण फायरींग रेंजवर नाग क्षेपणास्त्राच्या तीन यशस्वी चाचण्या घेतल्या. रविवारी दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा नाग क्षेपणास्त्र डागून चाचणी घेण्यात आली. तिन्ही चाचण्या यशस्वी ठरल्याचे डीआरडीओच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

2. तर नाग क्षेपणास्त्र लष्कराच्या ताफ्यात समावेश होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. डीआरडीओने विकसित केलेल्या नाग क्षेपणास्त्रांची 524 कोटी रुपयांना खरेदी करण्याच्या प्रस्तावाला डीएसीने मागच्यावर्षीच मंजुरी दिली आहे. नाग ही तिसऱ्या पिढीची रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. क्षेपणास्त्र वाहून नेणारे वाहनही या सिस्टिममध्ये आहे.

3. तसेच दिवसाच नव्हे तर रात्रीच्या वेळी सुद्धा शत्रू देशाचे रणगाडे उद्धवस्त करण्याची नागमध्ये क्षमता आहे. नागच्या समावेशाने भारतीय लष्कराची हल्ला करण्याची क्षमता वाढणार आहे.

4. 1980 च्या दशकात भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाच क्षेपणास्त्र विकसित करण्याची योजना बनवण्यात आली होती.

5. नाग त्यापैकी एक आहे. अग्नि, पृथ्वी आणि आकाश ही क्षेपणास्त्र सुद्धा याच कार्यक्रमातंर्गत विकसित करण्यात आलीआहेत.


chalu ghadamodi, current affairs

1. भारतीय वेगवान धावपटू हिमा दास हिने नवा इतिहास रचला आहे. हिमा दिस हिने चार दिवसांत भारताला दुसरे सुवर्ण पदक मिळवून दिले आहे.

2.तर पाच जुलै रोजी हिमा दासने 200 मीटरमध्ये सुवर्णपद जिंकले होते. आता पुन्हा एकदा हिमाने सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला आहे. पोलंड येथे सुरू असलेल्या स्पर्धेत हिमा दिसने ही सुवर्ण कामगिरी केली आहे.

3. कुट्नो एथलेटिक्स मीट प्रकारात हिमाने सुवर्ण पदक पटकावले आहे. हिमा दासने 23.77 सेंकदामध्ये 200 मीटर अंतर पार करत विजयी कामगिरी केली आहे. वीके विस्मयाने 24.06 सेकंदात 200 मीटर अंतर पार करत दुसरे स्थान
पटकावले आहे.


chalu ghadamodi, current affairs

1. केंद्र सरकारने मोठ्याप्रमाणात विरोध असुनही अखेर रेल्वेच्या खासगीकरणाकडे पाऊल टाकले आहे. दिल्ली आणि लखनऊ दरम्यान धावणारी तेजस एक्स्प्रेस ही देशातील पहिली खासगी रेल्वे ठरणार आहे.

2.तसेच रेल्वेने 100 दिवसांचे धोरण निश्चित करत सुरूवातीस दोन खासगी रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रेल्वे विभागास संघटनांचा विरोध देखील सहन करावा लागत आहे.

3. तर रेल्वे विभाग दिल्ली- लखनऊ व्यतिरिक्त दुसऱ्या 500 किलोमीटर अंतराच्या मार्गची देखील निवड करत आहे. या मार्गावर दुसरी खासगी रेल्वे चालवली जाणार आहे.

4. तेजस एक्स्प्रेसला चालवले जाण्याची घोषणा 2016 मध्ये करण्यात आली होती. मात्र नव्या वेळापत्रकाबरोबर या रेल्वेला अशातच आणल्या गेले आहे. अनेक दिवसांपासून दिल्ली-लखनऊ रेल्वेची प्रतिक्षा होती. ही रेल्वे आता उत्तर प्रदेशमधील आनंदनगर रेल्वे स्थानकावर उभा आहे. जिला ओपन बिडींग प्रोसेसनंतर खासगी चालकाकडो सोपवले जाईल.


chalu ghadamodi, current affairs

1. शिवणयंत्राचे संशोधक ‘एलियास होव‘ यांचा जन्म 9 जुलै 1819 मध्ये झाला होता.

2. सन 1873 मध्ये 9 जुलै रोजी मुंबई शेअर बाजार सुरू झाला.

3. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म 9 जुलै 1921 मध्ये झाला होता.

4. सन 1951 मध्ये भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.

5. सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती 9 जुलै 2011 मध्ये झाली.


chalu ghadamodi, current affairs

1.भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात 30 सप्टेंबरपूर्वी बँकिंग क्षेत्रातील माहितीची देवाणघेवाण करण्याचा मार्ग अखेर खुला झाला आहे. यामुळे ज्या भारतीयांची 2018 पासून स्वित्झर्लंडमधील बँकांमध्ये खाती आहेत त्यांच्याबाबतची माहिती
भारतातील कर अधिकाऱ्यांना पाठविली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

2. भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यात ‘ऑटोमॅटिक एक्स्चेंज ऑफ इन्फॉर्मेशन’ (एईओआय) करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असून तो गेल्या वर्षीपासून अंमलात आला आहे.

3. तसेच ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने स्विस अर्थमंत्रालयातील अधिकारी आणि स्विस फेडरल कर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून याबाबत लेखी उत्तर आले.

4. तर बँक खात्यांबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करण्यात येणारा भारत हा 73 देशांपैकी एक देश आहे. गेल्या वर्षी एईओआयची 36 देशांबरोबर याबाबत अंमलबजावणी झाली आहे. बँकिंग क्षेत्राबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करण्यापूर्वी कायदेशीर आणि संसदीय पद्धतींची पूर्तता करण्यात आली आहे,


chalu ghadamodi, current affairs

1. पॅन कार्डला आधार नंबर लिंक करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता आधार कार्ड पॅन कार्डला 31 जुलैपर्यंत जोडावं लागणार आहे. 31 जुलैपूर्वी आपण पॅनला आधार कार्ड लिंक न केल्यास आपल्याला रिटर्न फाइल
करता येणार नाही.

2. तर आधारला पॅन लिंक न केल्यास आयटी कलम 139 एएअंतर्गत ते निष्क्रिय समजलं जाईल. प्रत्यक्ष कर संचालक मंडळानं आधारला पॅन कार्ड लिंक करण्याची मर्यादा 30 सप्टेंबर 2019 पर्यंत वाढवली आहे. परंतु रिटर्न फाइल करणाऱ्यांना 31 जुलैपूर्वीच पॅन आणि आधार लिंक करावं लागणार आहे. अन्यथा त्यांना रिटर्न फाइल करता येणार नाही.

3. तसेच कुठूनही येणारा कर परतावाही अडकून पडू शकतो. त्याचबरोबर पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानं 31 मार्च 2019पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्यास सांगितलं होतं. परंतु ती मुदत केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डा(सीबीडीटी)नं वाढवली आहे. त्यामुळे आता 30 सप्टेंबर 2019पर्यंत आपल्याला पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करता येणार आहे.

4. परंतु तरीही 1 एप्रिलपासून उत्पन्नाचा परतावा भरताना आधार क्रमांक देणे आणि लिंक करणे बंधनकारक असल्याचंही सीबीडीटीनं स्पष्ट केलेलं आहे.


chalu ghadamodi, current affairs

1. भारताची शीर्ष कुस्तीपटू विनेश फोगट हिने 53 किलो प्रकारामध्ये आपले पहिले सुवर्णपदक जिंकले आणि दिव्य काक्रानने स्पेनच्या मॅड्रिड येथे स्पेनच्या ग्रँड प्रिक्स 2019 मधील 68 किलो ग्रॅज्युएट प्रकारात अव्वल मानांकन मिळविले. 
2. अंतिम फेरीत विनेशने डच प्रतिस्पर्धी जेसिका ब्लास्का यांना पराभूत केले. 2020 च्या टोकियो गेम्समध्ये ती भारताच्या पदक विजेत्यांपैकी एक आहे. जकार्ता आशियाई गेम्समध्ये तिने सुवर्णपदक जिंकले. विनेशने आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता आणि कांस्यपदक जिंकले होते. ती डॅन कोलोवमध्ये खेळली आणि 53 किलो प्रकारात रौप्यपदक मिळविले.


chalu ghadamodi, current affairs

1. बाजार भागभांडवलानुसार रिलायन्स इंडस्ट्री (RIL) देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून समोर आली आहे.

2. तर रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअरनं घेतलेल्या उसळीनं कंपनीचं बाजार भांडवल 5 लाख कोटी रुपयांच्या पार केलं आहे.

3. कंपनीच्या शेअर्समध्ये सध्या 2 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. सरकारी कंपनी इंडियन आईल कॉर्पोरेशन (IOC)ला मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्री सर्वात मोठी कंपनी बनली आहे.

4. तसेच पेट्रोलियमपासून रिटेल आणि टेलिकॉमसारख्या विविध क्षेत्रात विस्तारलेल्या आरआयएलनं वर्ष 2018- 19मध्ये एकूण 6.23 लाख कोटी रुपयांची उलाढाल केली आहे. तर आयओसीनं 31 मार्च 2019मधल्या वित्त वर्षात 6.17 लाख कोटी रुपयांचं व्यवहार केला होता. आरआयएलनं आयओसीच्या दुप्पट फायदा कमावून देशातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे.


chalu ghadamodi, current affairs

1. सन 1940 मध्ये बॅटल ऑफ ब्रिटन या नावाने ओळखले जाणारे हवाईयुद्ध सुरू झाले.

2. सन 1973 मध्ये पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशला मान्यता दिली.

3. सन 1978 मध्ये मुंबई येथे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाची स्थापना झाली.

4. सन 1992 आर्वी येथील विक्रम इनसॅट भू-केंद्र राष्ट्राला अर्पण केले.

5. तसेच सन 1992 मध्येह संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या इन्सॅट-2ए या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण झाले.


chalu ghadamodi, current affairs

1. "ग्लोबल प्राइम ऑफिस ऑक्युपन्सी कॉस्ट्स सर्वे" शीर्षक असलेला वार्षिक अहवाल सीबीआरई द्वारे केला जातो.ही एक अमेरिकन रिअल इस्टेट कन्सल्टिंग फर्म आहे.

2. नवी दिल्लीची कनॉट प्लेस (सीपी) जगातील 9 व्या क्रमांकाचे महाग कार्यालय आहे. जगभरातील 10 सर्वात महागड्या ऑफिस मार्केट्समध्ये त्याची वार्षिक किंमत सुमारे 144 डॉलर प्रति वर्ग फुट आहे.
3. सलग दुसर्या वर्षासाठी हाँगकाँगच्या मध्यवर्ती जिल्हााने सर्वोच्च स्थान कायम ठेवले.
4. मुंबईचे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स आणि नरीमन कॉम्प्लेक्स 27 व्या स्थानावर आणि 40 व्या स्थानावर आहेत.
5. लंडन (वेस्ट एन्ड) दुसर्या क्रमांकावर असून हाँगकाँग (कोउलून) आणि न्यूयॉर्क (मिडटाउन मॅनहॅटन) यांचा क्रमांक लागतो.बीजिंगचे (फायनान्स स्ट्रीट) यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.


chalu ghadamodi, current affairs

1. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) विविध वित्तीय बाजारांच्या वेळाचे पुनरावलोकन करण्यासाठी अंतर्गत समिती तयार केली आहे. ते 9 .00 ते 9 .00 या वेळेत परकीय चलन बाजारात काम करण्याची वेळ बदलते. सध्या चलन बाजार 9 .00 ते सायंकाळी 5 पर्यंत काम करतो.
2. रिझर्व्ह बॅंकेच्या मागणी आणि संभाव्य फायद्यांना गृहित धरण्याबद्दलचा विचार आहे. रिझर्व्ह बँकेने असेही सांगितले की जर भागधारकांकडून मागणीची कमतरता असेल तर सरकारी सुरक्षा बाजारपेठेतील सध्याच्या बाजारपेठेतील वेळ टिकवून ठेवता येईल.


chalu ghadamodi, current affairs

1. भारताच्या दूती चंदने 100 मीटरच्या डॅशमध्ये सुवर्ण पदक मिळविले. इटलीतील नेपोली येथे जागतिक विद्यापीठ हि स्पर्धा पार पडली आहे.
2. स्वित्झर्लंडच्या
डेल पोन्तेने रौप्यपदक जिंकले. जर्मन लिसा केवेने कांस्यपदक जिंकले
कार्यक्रमात प्रतिष्ठित गोल्ड मेडल जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ट्रॅक आणि फील्ड अॅथलीट बनली आहे.
3. पंतप्रधान नरेंद्र कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांना विजयी होण्यासाठी अभिनंदन केले.


chalu ghadamodi, current affairs

1.भारतातील पहिले हत्ती पुनर्वसन केंद्र केरळ राज्य सरकार स्थापन करेल.हे कोटूर येथील त्याच्या पर्यावरणीय गावात आहे.
2. केरळचे
मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांनी हा प्रकल्प सुरू केला आहे.सध्या केंद्रात केवळ 15 हत्ती आहेत.एकदा काम पूर्ण झाल्यानंतर ते वाढविले जाईल.
3. या केंद्रामध्ये हत्ती संग्रहालय, महोत्सव प्रशिक्षण केंद्र, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, निवृत्तीचे घर आणि प्राण्यांसाठी स्मशानभूमी असेल,तसेच अनाथ, जखमी व वृद्ध हत्ती असतील.
4. 65 हेक्टर क्षेत्रातील नैसर्गिक जंगलांमध्ये पसरलेले केंद्र हत्ती सफारी आणि पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी इतर उपक्रम सुरू करेल.

 


chalu ghadamodi, current affairs

1. ११ जुलै – जागतिक लोकसंख्या दिन
2. १९८९: ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक निर्माता सर लॉरेन्स ऑलिव्हिये यांचे निधन.
3. १८०१: फ्रेन्च खगोलविद जॉन लुई पॉन याने
पॉन धूमकेतूचा शोध लावला.
4. १९९४ : दिल्लीच्या पोलिस महानिरीक्षक (तुरुंग)
किरण बेदी यांना ’रॅमन मॅगसेसे पुरस्कार’ जाहीर
5. १९०८ : लोकमान्य टिळकांना मंडालेची ६ वर्षाची शिक्षा झाली.


chalu ghadamodi, current affairs

1. केंद्र शासनाच्या युवा आणि क्रीडा मंत्रालय यांच्यामार्फत गुणवंत खेळाडूंकरिता क्रीडा पेन्शन योजना राबविण्यात येते. ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे हा या योजनेचा हेतू आहे.

2. गुणवंत खेळाडू पेन्शन योजनेसाठी अर्ज करणारा खेळाडू हा भारताचा रहिवासी असणे आवश्यक आहे. खेळाडूने ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स व वर्ल्ड कप (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धेत समाविष्ट खेळप्रकार) या स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदक प्राप्त केलेले असणे आवश्यक आहे.

3. विविध स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त/गुणवंत खेळाडूस नमूद केल्यानुसार मासिक मानधन देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पेन्शन 30 वर्षापासून (किंवा सक्रिय क्रीडा पासून सेवानिवृत्तीची तारीख, जे नंतर असेल) मिळणाऱ्या खेळाडूवर देय असेल आणि त्याच्या/तिच्या आयुष्यादरम्यान कायम राहील, परंतु पेन्शन लागू करताना खेळाडू सक्रिय क्रीडा करियरमधून निवृत्त झालेले असणे आवश्यक आहे. 


chalu ghadamodi, current affairs

1. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाला देशातीलच नव्हे तर आशिया, आफ्रिका आणि इतर खंडात लसींचा तसेच विविध प्रकारच्या औषधांचा पुरवठा करणारी एक प्रमुख संस्था बनविले जाईल. यासाठी संस्थेला सर्व प्रकारची प्रशासकीय आणि आर्थिक मदत केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

2. श्री. रावल यांनी परळ येथील हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाला भेट देऊन महामंडळाच्या कामकाजाची माहिती घेतली. त्यावेळी ते बोलत होते. महामंडळाने विविध ९ प्रकारच्या औषधगोळ्या तयार करण्याचा हाती घेतलेला प्रकल्प आता अंतिम टप्प्यात आहे, असे मंत्री श्री. रावल यांनी यावेळी सांगितले.

3.‘हाफकिन’ ही भारतासह आशिया आणि आफ्रिका खंडातील अनेक देशांना पोलिओ लसींचा पुरवठा करणारी प्रमुख संस्था आहे. 


chalu ghadamodi, current affairs

1. केंद्र सरकारने पर्यावरणपुरक वाहनांचा आग्रह धरला आहे. त्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा अंगिकार करण्याकडे कल आहे. त्याचवेळी टीव्हीएस मोटार कंपनीने चक्क इथेनॉलवर चालणारी बाइक बाजारात आणली आहे. ही देशातील पहिली बाइक आहे.

2. दुचाकी व तीनचाकी वाहने बनवणारी जागतिक पातळीवरील नामांकित कंपनी टीव्हीएस मोटार कंपनीने ‘अपाचे आरटीआर २०० एफआय ई १००’ ही भारतातील पहिली इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल सादर केली आहे.

3. टीव्हीएस मोटर कंपनीने सर्वात आधी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑटो एक्स्पो २०१८ मध्ये ही संकल्पना मांडली होती. टीव्हीएस अपाचे हा टीव्हीएस मोटार कंपनीचा सर्वात प्रमुख ब्रँड असून जगभरात ३५ लाखाहून अधिक समाधानी ग्राहक या ब्रॅण्डचा आनंद घेत आहेत.

4. इथेनॉलचे उत्पादन नूतनीकरणीय प्लान्ट स्रोतांकरवी देशात केले जाते. हे विषारी नसून बायोडिग्रेडेबल आहे. हाताळणी, साठवण आणि वाहतूक या सर्व दृष्टीने सुरक्षित आहे


chalu ghadamodi, current affairs

1. १९२०: पनामा कालव्याचे औपचारिक उद्‍घाटन झाले.

2. १८१७: अमेरिकन लेखक व विचारवंत हेन्‍री थोरो यांचा जन्म.

3. १६६०: बाजी प्रभू देशपांडे यांचे निधन.

4. १९८२ : राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेची (NABARD) स्थापना

5. १९६५ : संजय मांजरेकर – क्रिकेटपटू जन्म.

 


chalu ghadamodi, current affairs

1.5,000 किलोवॅट क्षमतेच्या सौर पार्कसाठी दिल्ली सरकारने आपल्या योजनेची घोषणा केली आहे. राजघाट थर्मल पॉवर प्लांटला सौर उद्यानात स्थान देण्याचा हेतू आहे. राजघाट वीज प्रकल्प बंद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
2.
फोटोव्होल्टेईक पावर स्टेशनला सौर पार्क म्हणून देखील ओळखले जाते. वीज ग्रिडमध्ये व्यापारी शक्ती पुरवण्यासाठी डिझाइन केलेली ही एक मोठी फोटोव्होल्टाइक प्रणाली आहे.
3. राजघाट थर्मल पॉवर स्टेशनची
135 मेगावॅटची स्थापित क्षमता आहे. प्रथम युनिट 1989-90 दरम्यान सुरू करण्यात आली. 


chalu ghadamodi, current affairs

1. शिक्षण क्षेत्रातील प्रयत्नांचे मोजमाप करण्यासाठी 'परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स 2017-18' आहे.
शिक्षणक्षेत्रात चंदीगड सर्वोत्कृष्ट स्थान पटकावले आहे आणि नंतर केरळ आणि गुजरातचे स्थान आहे.

चंदीगड सर्व राज्यांमध्ये सर्वोत्तम आहे.
2.
अरुणाचल प्रदेश हा सर्वात कमी कामगिरी करणारा राज्य आहे निर्देशांकावर तो 36 वा क्रमांक लागला.
केरळ हे साक्षरतेचा जास्त दर असलेले राज्य असून त्यानंतर लक्षद्वीप आणि मिझोरम चा क्रमांक लागतो.


 


chalu ghadamodi, current affairs

1. केरल राज्य सरकारने नॉन रेसिडेंट केरलाइट्स (एनआरके) गुंतवणूक कंपनी नॉन रेसिडेंट केरलाइट्स अफेयर्स (एनआरकेए) बनविण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा उद्देश राज्यातील प्रमुख पायाभूत सुविधांच्या विकासासाठी परदेशी केरळमध्ये गुंतवणूक करतील.
2.
एनआरकेचा 74 टक्के हिस्सा असेल तर उर्वरित 26 टक्के हिस्सा सरकारकडे राहील. विविध प्रकल्प अंमलबजावणीसाठी एनआरआय गुंतवणूकीचा वापर करण्यावर सरकार लक्ष केंद्रित करतो. या अंतर्गत, कंपनी हेतूसाठी स्पेशल पर्पज वेहिकल(एसपीव्ही) किंवा सहाय्यक कंपनी स्थापन करु शकते.
3. केरळ सरकारने अनिवासी केरळच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अनिवासी केरळच्या प्रकरणांचे (एनओआरकेए) विभाग सुरू केले आहे. एनआरके आणि केरळ सरकार आणि एनआरके समुदायांच्या समस्यांस सामोरे जाण्याच्या समस्यांचे निराकरण करण्याच्या प्रयत्नांची समाप्ती करण्याचा त्यांचा उद्देश आहे.


chalu ghadamodi, current affairs

1. विम्बल्डन महिला एकेरीत सामन्यात रोमानियाच्या सिमोना हालेपने विजेतेपद पटकावले. अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सचा सिमोनाने सरळ सेटमध्ये धुव्वा उडवत पहिले विम्बल्डन विजेतेपद पटकावले. 

2. सात वेळा विम्बल्डन विजेतेपद पटकावणाऱ्या सेरेना विल्यम्सने आपल्या कारकिर्दीतील २४ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवण्याची संधी होती. मात्र, सिमोना हालेपने ६-२, ६-२ असा सरळ सेटमध्ये तिचा पराभव करत एकतर्फी विजय मिळवला.

3. मागील वर्षी सिमोनाने फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटाकवले होते.सेरेना आणि सिमोनामध्ये याआधी १० सामने झाले होते. यापैकी ९ सामन्यांमध्ये सेरेनाने विजय मिळवला होता. त्यामुळे आजच्या अंतिम फेरीत सेरेनाकडे संभाव्य विजेती म्हणून पाहिले जात होते. मात्र, सिमोनाने दमदार कामगिरी करत आपल्या पहिल्या विम्बल्डन विजेतेपदाला गवसणी घातली.


chalu ghadamodi, current affairs

1. १६६०: पावनखिंडीतील लढाई.

2. १८९२: जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचा जन्म.

3. १६६०: पावनखिंड लढवून बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी आपल्याल प्राणाचे बलिदान दिले.

4. १९०८: ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये स्त्रियांना भाग घेण्यास परवानगी.

5. १९६४: भारतीय क्रिकेट खेळाडू उत्पल चॅटर्जी यांचा जन्म.


chalu ghadamodi, current affairs

1. दिवसेंदिवस ट्विटर हा सर्वात महत्त्वाचा भाग होत आहे.ट्विटरने त्याच्या व्यासपीठावरील भाषा समाविष्ट करण्यासाठी द्वेषपूर्ण वर्तनाविरूद्ध त्याचे नियम विस्तृत केले जे इतरांना धर्माच्या आधारावर अपमानित करते.
2. ट्विटरचा मुख्य हेतू म्हणजे प्राथमिक फोकस ऑफलाइन हानीच्या जोखमींना संबोधित करणे होय आणि संशोधनातून असे दिसून येते की भाषेला अपमानित करणे ही जोखीम वाढवते.
3. धर्मांवर आधारित द्वेषयुक्त सामग्रीवर बंदी घालण्यासाठी ट्विटरने विविध समुदायां आणि संस्कृतींकडून अभिप्राय मागितला.परंतु बर्याच लोकांनी ट्विटरच्या नियमांचे प्रामाणिक आणि सातत्याने अंमलबजावणी करण्याच्या क्षमतेबद्दल चिंता व्यक्त केली.
4. उत्तरदायित्वांनी कंपनीला धोरण उल्लंघनाची व्याख्या करताना आणि नियमांच्या अंमलबजावणीमध्ये अधिक सुसंगत असल्याचे स्पष्ट करण्यास सांगितले


chalu ghadamodi, current affairs

1. रायपूरमधील इंदिरा गांधी कृषी विद्यापीठातील केंद्रीय कृषी मंत्रालयाने छत्तीसगडमध्ये कृषी व्यवसाय ऊष्मायन केंद्र स्थापन केले आहे. विद्यापीठाच्या अहवालानुसार, राष्ट्रीय कृषी विकास योजना राफ्तर योजना अंतर्गत कृषी व्यापार ऊष्मायन केंद्र उभारण्यात आला आहे.
2. योजनेअंतर्गत कृषीच्या विविध भागात स्टार्टअपसाठी तरुण आणि उद्योजक मार्गदर्शन, तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा पुरविल्या जातील.
3. कृषी क्षेत्रात नवकल्पना, कौशल्य निर्मिती आणि उद्योजकांचा विकास यावर लक्ष केंद्रित करणे हे ध्येय आहे. संबंधित क्षेत्र राज्यातील ऍग्रिप्रिनरशिपच्या वाढीसाठी अनुकूल पर्यावरणाचा विकास करण्यासाठी लक्ष केंद्रीत करेल.


chalu ghadamodi, current affairs

1. जागतिक बॅंक ग्रुपने घोषित केले की, भारताच्या अंशुला कांत 12 जुलैला यांची पुढील एमडी आणि सीएफओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 
2. अंशुला कांत ही बँकेची
पहिली महिला सीएफओ आहे. वित्तीय आणि जोखीम व्यवस्थापनासाठी ती जबाबदार असेल. आर्थिक संसाधनांची भरपाई करण्यासाठी ती बँकच्या सीईओ क्रिस्टलिना जॉर्जिवाबरोबर काम करतील.
3. वित्त, बँकिंग आणि तंत्रज्ञानाच्या नाविन्यपूर्ण वापरामध्ये अंशुला 35 वर्षांहून अधिक कौशल्याचा अनुभव आहे. त्यांनी पूर्वी
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सीएफओ म्हणून काम केले होते. लेडी श्रीराम कॉलेजमधील अर्थशास्त्र विषयातील पदवी आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्र विषयात स्नातकोत्तर पदवी प्राप्त केली आहे.


chalu ghadamodi, current affairs

1. १८५६: थोर समाजसुधारक तसेच केसरीचे पहिले संपादक गोपाल गणेश आगरकर यांचा टेंभू कराड येथे जन्म.
2. १९३६: भारतीय वंशाचे लेखक आणि विद्वान धन गोपाळ मुखर्जी यांचे निधन
3. १९६९: अमेरिकेने $500, $1,000, $5,000 व $10,000 च्या नोटा चलनातुन काढुन टाकल्या.
4. १८६७: आल्फ्रेड नोबेल यांनी
डायनामाइट या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.
5. २०१३: डाकतार विभागाची १६० वर्षांपासूनची
तार सेवा बंद झाली


chalu ghadamodi, current affairs

1. इंडियन वुमन नेटवर्कच्या सहकार्याने केरळ स्टार्टअप मिशन (केएसयूएम) ने कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) द्वारा स्थापन केलेल्या 'महिला स्टार्टअप समिट 201 9' चे आयोजन केले आहे 
2. हा कार्यक्रम 1 ऑगस्ट 2019 रोजी केरळच्या
इंटिग्रेटेड स्टार्टअप कॉम्प्लेक्स, कोची येथे होणार आहे
3. इव्हेंटची
थीम "समावेशी उद्योजकता इकोसिस्टम" विकसित करणे अशी  आहे.
4. महत्वाकांक्षी महिला व्यावसायिकांना त्यांच्या उद्योजक प्रवासासाठी आणि समावेशी उद्योजकता पर्यावरणाचा विकास करण्यासाठी प्रोत्साहित करणे हे मुख्य उद्दीष्ट आहे.

 


chalu ghadamodi, current affairs

1. तांत्रिक अडचणीमुळे 'चांद्रयान-२' चे आजचे प्रक्षेपण रद्द करण्यात आले असून लवकरच नव्या तारखेची घोषणा केली जाईल असं इस्रोकडून सांगण्यात आलं आहे. आज १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-३च्या मदतीने चांद्रयान-२ अवकाशात झेपवणार होते. 

2.भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या 'चांद्रयान-२' या मोहिमेकडे संपूर्ण देश डोळे लावून होता मात्र तांत्रिक अडचणीमुळे मोहीम रद्द झाली असली तरी भारतीय नागरिक इस्रोसोबत असल्याचं पाहायला मिळत आहे. 

3. चांद्रयान-२ एकूण १२ भारतीय उपकरणे घेऊन जाणार आहे. वजन ३.८ टन इतके आहे. आठ हत्तींच्या वजनाच्या इतके आहे हे वजन. चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणार आहे. आजपर्यंत चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणारी मोहीम झालेली नाही


chalu ghadamodi, current affairs

1. स्वित्झर्लंडचा खेळाडू आणि विम्बल्डनवर अधिपत्य सांगणाऱ्या रॉजर फेडरर याला नमवत सर्वियाच्या नोवाक जोकोविचने यंदाच्या विम्बल्डन पुरुष एकेरीचं जेतेपट मिळवलं आहे. रविवारी सेंटर कोर्टवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात या दोन्ही खेळाडूंमध्ये तुल्यबळ लढत झाल्याचं पाहायला मिळालं.

2. जोकोविचने पाचव्यांदा विम्बल्डनच्या जेतेपदावर नाव कोरलं असून, या निमित्ताने त्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 

3. जवळपास चार तास आणि ५५ मिनिटांपर्यंत खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या जोकोविचने दुसऱ्या स्थानारील रॉजर फेडररला ७-६ (७-५), १-६, ७-६ (७-४), ४-६, १३-१२ (७-३) अशा सेटमध्ये पराभवाचा धक्का दिला.  


chalu ghadamodi, current affairs

1. लॉर्ड्सच्या ऐतिहासकि मैदानामध्ये पुन्हा एकदा इतिहास घडला आहे. अत्यंत रोमांचक अशा मॅचमध्ये इंग्लंडने वर्ल्ड कपवर नाव कोरलं आहे. 

2. वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच फायनल टाय झाली. एवढच नाही तर फायनल टाय झाल्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली, अखेर सुपर ओव्हरही टाय झाल्यामुळे इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं. या मॅचमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडपेक्षा जास्त बाऊंड्री मारल्यामुळे इंग्लडचा विजय झाला.

 


chalu ghadamodi, current affairs

1. १६६२: इंग्लंडमध्ये प्रतिष्ठित असलेल्या रॉयल सोसायटीची स्थापना झाली.

2. १५४२: लिओनार्डो दा विंची यांच्या पेंटिंग मोना लिसा मधील महिला लिसा डेल जिकॉन्डो यांचे निधन.

3. २००६: ट्विटर हा सर्वात मोठा सोशिअल प्लॅटफॉर्म सुरु झाला.

4. १९५५: पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न सन्मान जाहीर.

5. १९६७: गायक व नट नारायण श्रीपाद राजहंस तथा बालगंधर्व यांचे निधन.


chalu ghadamodi, current affairs

1. संयुक्त राष्ट्रांनी 15 जुलैला जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला. संयुक्त राष्ट्राने नोव्हेंबर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे हा दिवस मांडला होता
2. युवा कौशल्य विकासाच्या महत्त्वबद्दल जागरुकता वाढवण्याचा दिवस आहे. दिवसासाठी 2019 ची
थीम म्हणजे जीवन आणि कामाबद्दल शिकणे. आजीवन शिक्षण घेण्याकरिता आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणे ही या दिवशी संयुक्त राष्ट्राची आहे.
3. जागतिक लोकसंख्येपैकी सुमारे 16% तरुण आहेत म्हणजेच 1.2 अब्ज, 15 ते 24 वर्षे वयोगटातील आहेत. शाश्वत, समावेशी आणि स्थिर समाज प्राप्त करण्यासाठी आणि कायमस्वरूपी विकासासाठी आव्हाने आणि धोके टाळण्यासाठी, युवकांचे सक्रिय सहभाग आवश्यक आहे, ज्यात हवामानातील बदल, बेरोजगारी, गरीबी, लैंगिक असमानता, संघर्ष आणि स्थलांतर यांचा प्रभाव समाविष्ट आहे.


chalu ghadamodi, current affairs

1. संगीत नाटक अकादमी २०१८चे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कारांच्या यादीत सुगम संगीतासाठी गायक सुरेश वाडकर, राजीव नाईक यांना मराठी नाट्यलेखनासा‍ठी तर ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी या दिग्गजांचा समावेश आहे. 

2. त्याचबरोबर, विविध कलांमध्ये तबला वादनासाठी झाकिर हुसेन, नृत्यासाठी सोनल मानसिंग हेदेखील मानकरी ठरले आहेत. संगीत नाटक अकादमी पुरस्कारांच्या यादीत डान्स कोरिओग्राफर जतिन गोस्वामी, भरतनाट्यमसाठी के. कल्याणसुंदरम पिल्लई यांचाही समावेश आहे. 


chalu ghadamodi, current affairs

1. येत्या काळात नौदलाची ताकद अधिक वाढणार आहे. 100 हेवीवॅट टॉरपॅडो मिसाईल खरेदी करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने 2 हजार रूपयांचे टेंडर जारी केले आहे. तसेच मुंबईतील माझगाव डॉकमध्ये तयार करण्यात येत असलेल्या
स्कॉर्पिअन क्षेणीच्या सहा पाणबुड्यांमध्ये हे टॉरपॅडो मिसाईल तैनात करण्यात येणार आहेत.

2. 100 हेवीवॅट टॉरपॅडो मिसाईल खरेदी करण्यासाठी 10 दिवसांपूर्वीच एक टेंडर जारी करण्यात आले आहे. स्कॉर्पिअन क्षेणीच्या पाणबुड्यांची निर्मिती मुंबईतील माझगाव डॉकमध्ये सुरू असून त्यांना कलवरी क्लास हे नाव देण्यात आले आहे.

3. तसेच या क्षेणीमधील पहिली पाणबुडी यापूर्वीच नौदलात दाखल करण्यात आली आहे. तसेच सध्या ती पाणबुडी ऑपरेशनल मोडमध्ये आहे. सध्या परदेशी विक्रेत्यांकडून नौदलाची मागणी पूर्ण करण्यात येणार असली, तरी त्यानंतरची मागणी ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत पूर्ण करण्यात येणार आहे.

4. तर डीआरडीओ पाणबुड्यांसाठी तसेच लढाऊ युद्धनौकांसाठी हेवीवेट टॉरपॅडो मिसाईलचा वापर करण्याच्या तयारीत आहे. फ्रान्स, स्वीडन, रशिया आणि जर्मनीच्या जागतिक उत्पादकांना हेवीवॅट टॉरपॅडोसाठी टेंडर जारी करण्यात आले आहे.

5. यापूर्वी इटालियन फर्म ‘ब्लॅक शार्क टॉरपॅडो’ या कंपनीची यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. परंतु हेलिकॉप्टर घोटाळ्यातील नमेक्केनिका समुहाच्या गुंतवणुकीमुळे हा कार्यक्रम रद्द करावा लागला होता.


chalu ghadamodi, current affairs

1. अंधांना चलनी नोटा सहज ओळखता याव्यात, यासाठी एक अनुप्रयोग (अ‍ॅप्लिकेशन) रिझर्व बँक ऑफ इंडियानेविकसित करण्याचे ठरवले असून सध्यातरी रोखीच्या व्यवहारांना महत्त्व असल्याने त्याचा वापर करता येणार आहे.

2. सध्या 10, 20, 50, 100, 200, 500, 2000 या नोटा चलनात असून एक रुपयाची नोट केंद्राने जारी केली आहे.

3. तर रिझर्व बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे, की नोटा ओळखणे अंधांना सोपे नसते. त्यामुळे या नोटांमधील खुणांच्या माध्यमातून त्या ओळखणे आवश्यक असते त्यासाठी 100 व त्यावरील चलनाच्या नोटात अंधांसाठी खास ओळख
पटवणाऱ्या सुविधा आहेत पण त्या त्यांना माहिती नाहीत.

4. अंधांना या नोटा ओळखता याव्यात यासाठी रिझर्व बँक प्रयत्नशील आहे. महात्मा गांधी मालिका व महात्मा गांधी नवी मालिका यातील नोटांच्या प्रतिमा घेऊन प्रस्तावित मोबाइल अनुप्रयोगासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत.


chalu ghadamodi, current affairs

1. राज्य शासकीय कर्मचारी आणि अधिकार्‍यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात येईल आणि सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्षे करण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिले. येत्या 31 डिसेंबरपर्यंत हा निर्णय लागू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

2. केंद्राप्रमाणे राज्यातही पाच दिवसांचा आठवडा लागू करणे, वेतन त्रुटींबाबत बक्षी समितीचा दुसरा अहवाल तत्काळ सादर करणे, केंद्राप्रमाणे सातव्या वेतन आयोगातील वाहतूक भत्त्यासह इतर भत्ते मिळणे, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे, महिला कर्मचार्‍यांसाठी दोन वर्षांची बालसंगोपन रजा देणे, प्रशंसनीय कामाबद्दल आगाऊ वेतनवाढ देणे, अधिकार्‍यांच्या पाल्यांनाही अनुकंपा भरती सुविधा लागू करणे अशा विविध 18 मागण्यांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली. 


chalu ghadamodi, current affairs

1. सन 622 मध्ये प्रेषित मुहम्मद पैगंबर यांनी मदिनेहून प्रयाण केले. इस्लामिक हिजरी कॅलेंडरची या दिवसापासून सुरुवात झाली.

2. अमेरिकेच्या पहिल्या अणुबॉम्बची चाचणी 16 जुलै 1945 मध्ये केली.

3. सन 1965 मध्ये ईटली व फ्रान्सला जोडणार्‍या माँट ब्लँक बोगद्याचे उद्‍घाटन झाले.

4. गुजरातमध्ये शाळेतील प्रवेशाच्या वेळी पाल्याच्या नावानंतर आईलाही नाव लावण्याच्या अधिकाराचा निर्णय 16 जुलै 1998 रोजी घेण्यात आला.


Top