chattisgarh governor balramaji das tondon passed away

 1. छत्तीसगडचे राज्यपाल आणि सहा वेळा आमदारकी जिंकलेले बलरामजी दास टंडन यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
 2. रायपूरच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्यूसमयी ते 91 वर्षांचे होते.
 3. सोमवारी सकाळी आठच्या सुमारास बलरामजी दास टंडन यांना ह्रदयविकाराचा त्रास सुरू झाला. यानंतर राजभवनातील रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना रायपूरच्या आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांना तात्काळ अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले परंतु उपरांना प्रतिसाद न दिल्याने त्यांचे निधन झाले.
 4. बलरामजी दास टंडन यांनी 18 जुलै, 2014 ला छत्तीसकडच्या राज्यपालपदाची सूत्रे हाती घेतली होती. त्यांना जन्म 1 नोव्हेंबर 1927 ला पंजाबच्या अमृतसर येथे झाला होता.
 5. सामाजिक कार्य, समाजसेवा आणि जनकल्याण कार्यात वाहून घेतलेल्या बलरामजी यांच्यावर पंजाबच्या जनतेचा विशेष जीव होता.
 6. बलरामजी यांनी 1957, 1962, 1967, 1969 आणि 1977 अशा पाचवेळा आमदारकी जिंकली होती. तसेच आणीबाणी काळात 1975 ते 1977 अशी दोन वर्ष त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. 
 7. 1991 मध्ये त्यांनी अमृतसरमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांच्यावर अनेकदा हल्ला झाला, परंतु ते थोडक्यात वाचले होते.
 8. बलरामजी यांचा मुलगा संजय टंडन यांनी त्यांच्या आयुष्यावर ‘एक प्रेरक चरित्र‘ हे पुस्तकही लिहिले आहे.
 9. बलरामजी यांना खेळाप्रती आत्मियता होती. कुस्ती, व्हॉलिबॉल, स्विमींग आणि कबड्डी अशा खेळात त्यांना विशेष रस होता.


ease of living index pune top in al over india

 1. शहरांचे नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून लोकांचे जीवनस्तर उंचाविण्यासाठी प्रथमच सुलभ जीवन निर्देशांकाची (ease of Living Index) घोषणा केली आहे. यामध्ये पुणे शहर देशात सर्वोत्कृष्ट ठरले असल्याचे आज केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांनी जाहीर केले.
 2. येथील राष्ट्रीय माध्यम  केंद्रात आज  केंद्रीय मंत्री हरदिप सिंग यांनी सुलभ जीवन निर्देशांकामध्ये असणाऱ्या प्रथम दहा शहरांची घोषणा केली. यामध्ये प्रथम पुणे तर द्वितीय क्रमांक नवी मुंबई, तृतीय क्रमांक बृहन्मुंबई तर सहाव्या क्रमांकावर ठाणे या राज्यातील चार शहरांची निवड करण्यात आलेली आहे. यासह, अन्य शहरांमध्ये तिरूपती, चंदीगड, रायपूर, इंदोर, विजयवाडा आणि भोपाळ आहेत.
 3. सुलभ जीवन निर्देशांकाचे मुल्यांकन हे राष्ट्रीय तसेच जागतिक  स्तरावरील राहण्यायोग्य शहरांच्या आणि शाश्वत विकासाच्या मानांकनाच्या आधारावर करण्यात आलेले आहे. 
 4. जून 2017 मध्ये सुलभ जीवन निर्देशांक ठरविण्यात आले होते. 19 जानेवारी 2018 पर्यंत 111 शहरांचे मुल्यांकन करण्यात आले. यामध्ये संस्थात्मक, सामाजिक, आर्थिक, भौतिक हे चार मुख्य निकष लावण्यात आले असून यामध्ये 15 श्रेणींची वर्गवारी आणि 78 संकेतक दिलेले आहेत. या आधारे सुलभ जीवन शहर निर्देशांक ठरविण्यात आले. 
 5. संस्थात्मक आणि सामाजिक या आधारासाठी प्रत्येकी 25 गुण दिलेले आहे. 5 गुण हे आर्थिक आधारासाठी तर 45 गुण भौगोलिक आधारासाठी देण्यात आलेले आहेत.
 6. निवडलेल्या चार आधारावरील अंमलबजावणीसाठी कार्यशाळा देशभरातील राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशात घेण्यात आलेल्या होत्या.


संस्थात्मक आधारावरील 10 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 2 शहरे

संस्थात्मक आधारावर सुलभ जीवन निर्देशांकामध्ये निवड झालेल्या शहरांमध्ये नवी मुंबई व पुणे ही दोन शहरे महाराष्ट्रातील आहेत. यासह तिरूपती, करीम नगर, हैद्राबाद, बिलासपूर, कोची, अहमदाबाद, विजयवाडा, विशाखापट्टनम ही आहेत. संस्थात्मक निकषासाठी 25 गुणाकंन निर्धारित केलेले होते.

सामाजिक आधारावर निवडलेल्या शहरांमध्ये राज्यातील 4 शहरे

सामाजिक आधारावर निवड झालेल्या निर्देशाकांमध्ये राज्यातील नवी मुंबई, पुणे, बृहन्मुंबई, वसई-विरार या 4 शहरांचा समावेश आहे. यासह तिरूपती, तिरूचिरापल्ली, चंदीगड, अमरावती, विजयवाडा, इंदोर, या शहरांचा समावेश आहे. सामाजिक आधारावरील निकषासाठी 25 गुणाकंन देण्यात आले होते.

 
आर्थिक आधारावर निवडलेल्या शहरांमध्ये 2 शहरे राज्यातील

आर्थिक आधारावर निवडलेल्या शहरांमध्ये राज्यातील पुणे आणि ठाणे या  2 शहरांचा समावेश झालेला आहे. यामध्ये चंदीगड, अजमेर, कोटा, इंदोर, त्रिरूप्पुर, इटानगर, लुधियाना, विजयवाडा या अन्य शहरांची निवड करण्यात आलेली आहे. आर्थिक आधारासाठी 5 गुणाकंन देण्यात आलेले होते.

भौतिक आधारावर निवडलेल्या शहरांमध्ये राज्यातील सर्वाधिक 4 शहरे

भौतिक आधारावर निवडलेल्या शहरांमध्ये राज्यातील बृहन्मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई या चार शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे. यासह चंदिगड, रायपूर, तिरूपती, भोपाल, बिलासपूर, विशाखापट्टनम या शहरांचा समावेश आहे. भौतिक आधारावर  निवडण्यासाठी 45 गुणांकन देण्यात आलेले होते.

याशिवाय 40 लाख लोकसंख्येपेक्षा अधिक असलेल्या शहरांमध्ये उत्कृष्ट व्यवस्थापनामध्ये बृहन्मुंबई, चेन्नई, सूरत या शहरांचा समावेश आहे. 40 लाख लोकसंख्येपर्यंतच्या शहरांमध्ये पुणे, नवी मुंबई, ठाणे या शहरांचा सामावेश आहे.

वेगवेगळ्या मानांकनासाठी निवडण्यात आलेल्या देशभरातील राज्यांमधील अन्य शहरांची माहिती डॅशबोर्डवर देण्यात आलेली आहे. डॅशबोर्डसाठी https://smartnet.niua.org हे संकेतस्थळ देण्यात आलेले आहे. अन्य मानांकनांमध्ये महाराष्ट्रातील सोलापूर, औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, नागपूर, अमरावती, नाशिक, पिंपरी-चिंचवड या शहरांचा समावेश आहे.


देशभरातील दहा शहरं

1) पुणे          2) नवी मुंबई            3) मुंबई           4) तिरुपती                5) चंदीगड

6) ठाणे          7) रायपूर               8) इंदूर             9) विजयवाडा             10) भोपाळ


20 august to 5 september social unity celebration

 1. सद्‌भावना दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
 2. केंद्र शासनाच्या युवा व क्रीडा मंत्रालय यांच्या निर्देशानुसार दिवंगत प्रधानमंत्री राजीव गांधी यांचा जयंती दिवस 20 ऑगस्ट हा दरवर्षी सद्‌भावना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
 3. तसेच केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मंत्रालयामार्फत या सद्‌भावना दिवसाच्या अनुषंगाने दि. 20 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2018 हा पंधरवडा सामाजिक ऐक्य पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येणार आहे.
 4. राज्यातील विविध प्रदेशातील अनेक धर्मांच्या व अनेक भाषा बोलणाऱ्या लोकांमध्ये एकमेकांविषयी ऐक्याची भावना सौहार्द भाव वृद्धिंगत करणे व हिंसाचार टाळणे ही प्रमुख उद्दिष्टे हा पंधरवडा साजरा करण्यामागे आहेत.


36 clean railway station from maharashtra in all over india ranking

 1. देशातील स्वच्छ रेल्वे स्थानकांचा अहवाल रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केला.
 2. महाराष्ट्रातील  एकूण 36 रेल्वे स्थानकांचा यात समावेश असून श्रेणी 'अ 1’ मध्ये  वांद्रे रेल्वे स्थानकाने 7 वा क्रमांक पटकावत देशात पहिल्या 10 मध्ये स्थान मिळविले आहे.
 3. गुणांकनात सुधार झालेल्या रेल्वे स्थानकांच्या श्रेणी 'अ 1’ मध्ये मुंबई-सीएसटी स्थानकाने 9 व्या तर दादर रेल्वे स्थानकाने 10 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
 4. रेल भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत आज रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी देशातील स्वच्छ रेल्वे स्थानकांचा समावेश असलेल्या ‘स्वच्छ रेल स्वच्छ भारत’ अहवालांतर्गत रेल्वे स्थानकांची नावे जाहीर केली. यावेळी रेल्वे मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 5. ‘स्वच्छ रेल स्वच्छ भारत’ अहवालांतर्गत देशातील 407 रेल्वे स्थानकांची नावे जाहीर करण्यात आली. यात श्रेणी ‘अ 1’ मध्ये एकूण 75 रेल्वे स्थानकांत महाराष्ट्रातील 10 रेल्वे स्थानकांचा तर, श्रेणी 'अ' मध्ये एकूण 332 रेल्वे स्थानकांत राज्यातील 26 अशा एकूण 36 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
 6. दोन्ही श्रेणींमध्ये गुणांकनात सुधार झालेल्या सर्वोत्तम 10 रेल्वे स्थानकांची नावे जाहीर करण्यात आली असून ‘अ 1’ श्रेणीत मुंबई-सीएसटी स्थानकाने 9 वा तर दादर रेल्वे स्थानकाने 10 क्रमांक मिळवला आहे.

 महाराष्ट्रातील 36 स्वच्छ रेल्वे स्थानके

 • या अहवालात देशातील एकूण 75 रेल्वे स्थानकांची अ1 श्रेणी मध्ये निवड करण्यात आली. यात पश्चिम रेल्वेच्या वांद्रे रेल्वे स्थानकाने 7 वा क्रमांक मिळवत पहिल्या 10 मध्ये जागा पटकाविली  आहे. मुंबई सीएसटी, पुणे, नागपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, सोलापूर, दादर, ठाणे आणि कल्याण या रेल्वे स्थानकांचा यात समावेश आहे.
 • देशातील एकूण 332 रेल्वे स्थानकांची निवड ‘अ’ श्रेणी मध्ये करण्यात आली असून महाराष्ट्रातील 26 रेल्वे स्थानकांचा यात समावेश आहे. या श्रेणीत राज्यातील अकोला, नाशिक रोड, दौंड, बल्लारशाह,अमरावती, वर्धा, भुसावळ, शेगाव, कोल्हापूर, चाळीसगाव, मनमाड, अहमदनगर, नांदेड, कुर्डुवाडी, जालना, जळगाव, गोंदिया, मिरज सांगली, लातूर, शिर्डी, चंद्रूपूर, पनवेल, लोणावळा, परभणी, कोपरगाव, औरंगाबाद रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.

मुंबई-सीएसटी व दादर रेल्वे स्थानकांच्या गुणांकनात सुधार

 • देशातील रेल्वे स्थानकांवर स्वच्छतेबाबत या अहवालात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे.
 • मुंबई-सीएसटी व दादर रेल्वे स्थानकांची मागील वर्षापेक्षा स्वच्छता यादीत सुधारणा झाली आहे. गेल्यावर्षीच्या ६७९.१ गुणांहून मुंबई-सीएसटी रेल्वे स्थानकाने ८९३.४ अंकावर झेप घेत गुणांकणात सुधार झालेल्या 'अ १’ श्रेणीतील पहिल्या १० स्वच्छ रेल्वे स्थानकांच्या यादीत ९ वे स्थान मिळविले आहे. दादर रेल्वे स्थानकाने गत वर्षीच्या ५५२.२ गुणांहून सुधार करत ९१३ गुण मिळवित याच श्रेणीतील १० वा क्रमांक पटकाविला आहे.
 • मुंबई उपनगरीय रेल्वेच्या 8 स्थानकांचा अहवालात समावेश
 • स्वच्छ  रेल्वे स्थानकांच्या अहवालात मुंबई उपनगरीय रेल्वेच्या एकूण 8 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. यात ‘अ 1’ श्रेणी मध्ये वांद्रे, मुंबई सीएसटी, मुंबई सेंट्रल, ठाणे, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर आणि कल्याण या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. तर ‘अ’ श्रेणीत पनवेल रेल्वे स्थानकाचा समावेश आहे.
 • असे झाले सर्वेक्षण
 • रेल्वे मंत्रालयाच्यावतीने 2016 पासून ‘स्वच्छ रेल स्वच्छ भारत’ योजनेअंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकांचे विविध मानकांवर नामांकित संस्थेच्यावतीने सर्वेक्षण करण्यात येते. यावर्षीही देशातील रेल्वे स्थानकांचे दोन श्रेणींमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. ज्या रेल्वे स्थानकांहून वर्षाकाठी 50 कोटींपेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करतात अशा रेल्वे स्थानकांना 'अ 1’  श्रेणी मध्ये तर 6 ते 50 कोटीं प्रवाशी प्रवास करणाऱ्या रेल्वे स्थानकांना 'अ' श्रेणी मध्ये ठेवण्यात आले. रेल्वे स्थानका शेजारील खुल्या परिसरात स्वच्छता गृह, मुख्य प्रवेश द्वारा शेजारी स्वच्छतागृह व अन्य स्वच्छता. तसेच  रेल्वे स्थानकावर खुल्या ठिकाणी आसन व्यवस्था, विक्रेत्यांची व्यवस्था, स्वच्छतागृहांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, प्रतीक्षालय, रेल्वे रूळ आणि पादचारी आदी बाबींचे सर्वेक्षण होऊन या रेल्वे स्थानकांचे मानांकन ठरविण्यात आले आहे. या सर्वांसाठी 1000 गुण ठरविण्यात आले होते पैकी विविध मानकांनुसार गुणांकन करण्यात आले.


karmveer dadasaheb gaikwad yojana

 1. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत शासनाने आमुलाग्र बदल केला असून आता ही योजना 100 टक्के अनुदानाची करण्यात आली आहे.
 2. यापूर्वी या योजनेत जिरायत आणि बागायत जमिनीसाठी सरसकट प्रति एकरी 3 लाख रुपये इतकी रक्कम मिळत होती. त्यामधील 50 टक्के रक्कम अनुदान स्वरुपात व 50 टक्के कर्ज स्वरुपात मिळत होती. आता जिरायतीसाठी प्रतीएकरी 5 लाख रुपये आणि बागायतीसाठी प्रतीएकरी 8 लाख रुपये इतके अनुदान मिळणार आहे.
 3. या योजनेअंतर्गत 4 एकरापर्यंत जिरायती जमीन किंवा 2 एकरापर्यंत बागायती जमीन लाभार्थ्यास देण्यात येईल.
 4. दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन अनुसूचित जाती तथा नवबौद्ध घटकातील विधवा व परित्यक्त्या महिला तसेच अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील अत्याचारग्रस्त यांना प्राधान्याने या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.


Top