China invasion of the moon's dark side

 1. पृथ्वीवरून चंद्राच्या न दिसणार्‍या बाजूचा शोध घेण्यासाठी व तेथे संपर्क निर्माण करण्याच्या दृष्टीने चीनने सोमवारी एका उपग्रहाचे प्रक्षेपण केले. या उपग्रहाचे नाव क्युक्यीयो म्हणजे मॅगपी ब्रिज असे आहे. या उपग्रहाचे प्रक्षेपण लाँग मार्च-४सी या रॉकेटच्या साह्याने चीनच्या शीचँग सॅटेलाईट लाँच सेंटर येथून करण्यात आले. ही माहिती चायना नॅशनल स्पेस अ‍ॅडमिनेस्ट्रेशने (सीएएसए) दिली आहे.
 2. या उपक्रमाची अधिक माहिती देताना मॅनेजर झीहँग लिहुवा म्हणाले की, ‘चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणार्‍या भागाचे संशोधन करणार्‍या देशाच्या स्पर्धेत चीनचा प्रथम क्रमांक असण्याच्या दृष्टीने, हे पहिले पाऊल आहे.’
 3. रॉकेटच्या प्रक्षेपणानंतर २५ मिनिटांनी या उपग्रहाला चंद्राच्या कक्षेत सोडण्यास यश आले.
 4. पृथ्वीपासून २०० किमीवर सोडण्यात आलेल्या या उपग्रहाचा एकूण प्रवास ४ लाख किमीचा असणार आहे. त्यानंतर सौरऊर्जेवर चालणारा आणि संपर्क स्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार अँटिना उघडण्यात येणार आहे.
 5. क्युक्यीयो उपग्रह चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील हॅलो ऑरबिटमध्ये म्हणजे ४ लाख ५५ हजार किमीवरच्या सेकंड लॅगरॅनजिन (एल२) मध्ये पोहोचण्याची अपेक्षा आहे. हा जगातील चंद्राच्या दुसर्‍या बाजूकडे पोहोचणारा पहिला संवाद सॅटेलाईट असणार आहे. या मोहिमेत खूपच आव्हाने आहेत. तसेच त्या कक्षेत स्थापन करण्यास त्याला खूपच जुळवाजुळव करावी लागणार असल्याचे झीहँग यांनी सांगितले.
चंद्र 
 1. चंद्राला स्वतःभोवती फिरण्यास लागणारा वेळ हा पृथ्वीच्या भोवती फिरण्यास लागणाऱ्या वेळाएवढाच असल्यामुळे चंद्राची कायम एकच बाजू पृथ्वीच्या दिशेला असते. चंद्राच्या दुसऱ्या बाजूची छायाचित्रे ही सर्वप्रथम लूना ३ या अंतराळयानाने १९५९ साली घेतली.
 2. पृथ्वीवरुन पाहण्याच्या विशिष्ट कोनामुळे चंद्राचा एकूण ५९% इतका भाग पृथ्वीवरून दिसतो. पण एकाच ठिकाणाहून जास्तीत जास्त ५०% भागच पाहता येतो.
 3. चंद्राची पृथ्वीकडील बाजू चंद्राची पृथ्वीविरुद्ध बाजू
 4. चंद्राच्या दोन्ही बाजूंमध्ये लक्षात येणारा सर्वांत मोठा फरक म्हणजे चंद्राच्या पृथ्वीकडील बाजूवर दिसणारे डाग (मारिया).

 


Iran Nuclear Issue: A Report

 1. युरोपीय संघाचे वरिष्ठ राजनैतिक हेल्गा स्कीम यांच्या नेतृत्वाखालील जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटन तसेच रशिया व चीन यांच्या राजनैतिकांची मे-18 च्या पुढील आठवड्यात व्हिएन्नामध्ये 2015 च्या कराराप्रमाणेच इराणसोबत एक नवीन करार तयार करण्याच्या उद्देशाने बैठक होणार आहे.
 2. अलीकडेच अमेरिकेने इराण अणू करारामधून बाहेर पडण्याच घोषणा केली आहे आणि सोबतच पुन्हा एकदा इराणवर निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे. इराणचा बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम किंवा मध्यपूर्वेतील संघर्षातील हस्तक्षेप रोखण्यासाठी अणू कराराद्वारे काहीही केले गेले नसल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे.
 3. अशी आशा आहे की सुधारित करार अमेरिकेला परत या भागीदारीत आणणार आणि इराणवरील निर्बंध उठविण्यास मदत होईल. शिवाय इराणला आर्थिक मदत देखील प्रदान करू शकता येणार.
 4. इराण अण्वस्त्र बनवण्यासाठी अणुऊर्जा कार्यक्रम चालवत आहे असा आरोप होत होता. सन 2005 ते 2013 दरम्यान इराणचे राष्ट्रपती महमूद अहमदिनेजाद यांनी या कार्यक्रमाला आणखी वेग दिला. त्यानंतर जागतिक शांतता राखण्याच्या हेतूने अमेरिका आणि इतर राष्ट्रांनी इराणवर कडक आर्थिक निर्बंध घातले.
 5. 2013 साली तत्कालीन राष्ट्रपती हसन रौहानी यांनी या देशांबरोबर वाटाघाटी करून इराण अणू करार केला आणि तो करार 2016 साली लागू केला.  
 6. इराण अणू करार जॉइंट कॉमप्रिहेंसिव प्लान ऑफ अॅक्शन (JCPOA) या नावाने देखील ओळखला जातो. हा करार संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे पाच स्थायी सदस्य अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, रशिया आणि चीन आणि जर्मनी यांच्यासोबत तेहरानचा 14 जुलै 2015 रोजी झाला, ज्यामधून आर्थिक मदतीच्या बदल्यात इराणच्या आण्विक कार्यक्रमावर कडक बंधने लादली जातात.
 7. या करारांतर्गत इराणने आपल्या सुमारे 9 टन अल्प संवर्धित युरेनियम साठ्याला कमी करून 300 किलोग्रामपर्यंत करण्याची अट स्वीकारली. इराण आपले आपले अल्प संवर्धित युरेनियम रशियाला देणार आणि सेंट्रीफ्यूजांची संख्या कमी करणार. त्याबदल्यात रशिया इराणला जवळजवळ 140 टन नैसर्गिक युरेनियम येलो-केकच्या रूपात देणार, ज्याचा वापर अणुऊर्जा केंद्रांमध्ये अणु-इंधन बनविण्यासाठी होतो.
 8. या करारांतर्गत इराणने आश्वासन दिले की ते अणुशस्त्र बनविणार नाहीत. इराणने 10 ते 25 वर्षापर्यंत आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना पाहणी करण्याची परवानगी देखील दिली. त्याबदल्यात इराणवरचे आर्थिक निर्बंध हटवण्यात आले होते.


 Three people died due to 'Nippah' virus in Kozhikode

 1. केरळमधील कोझिकोड शहरात 'निपाह' या भयानक विषाणूची लागण झाल्याने तिघा जणांचा मृत्यू झाला आहे.
 2. दरम्यान, आणखी 25 जणांच्या रक्ताच्या तपासणीमध्ये हा विषाणू असल्याचे निष्पन्न झाले आहे. या विषाणुमुळे प्रभावित झालेल्या रुग्णांना श्वास घेणे त्रासदायक होते. मेंदूमध्ये जळजळ होते. योग्य वेळेत उपचार न झाल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. निपाह विषाणुवर अद्यापपर्यंत प्राणी किंवा मानवांसाठी प्रभावी लस उपलब्ध झालेली नाही.
 3. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) निपाह विषाणू हा वटवाघुळामुळे फळाफुलांच्या माध्यमातून मनुष्य आणि जनावरांमध्ये पसरतो. 1998 साली मलेशियातील कांपुंग सुंगई निपाह परिसरातून या विषाणुबाबतची प्रकरणे समोर आली होती. यामुळे या विषाणूला 'निपाह' असे नाव देण्यात आले. सर्वात आधी डुकरांमध्ये याचा परिणाम पाहायला मिळाला होता. 2004 साली बांग्लादेशात हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरला होता. केरळमध्ये प्रथमच निपाह विषाणू पसरल्याची माहिती समोर आली आहे.
काय आहे निपाह?
 1. निपाह व्हायरस (NiV) हा एक नव्याने निर्माण होत असलेला इन्फेक्शनरूपी आजार आहे. हा व्हायरस प्राण्यांकडून मानवी शरीरात संक्रमित होतो. यावर उपचार म्हणून सध्या कोणतीही लस उपलब्ध नाही.
 2. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) 10 प्रमुख जीवघेण्या आजारांच्या यादीत निपाह व्हायरसचा समावेश आहे. या व्हायरसची लागण झाल्यास मृत्यूची शक्यता 70 टक्के असते.
 3. 1999 मध्ये मलेशिया आणि सिंगापूरमध्ये डुकरांशी संपर्क येणाऱ्या शेतकऱ्यांना मेंदू आणि श्वसनासंदर्भात गंभीर आजार झाले होते. त्यावेळी तीनशे माणसांना या आजाराने ग्रासलं होतं आणि शंभर जणांचा मृत्यू झाला होता.
 4. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी त्या वेळी मलेशियात लक्षावधी डुकरांना मारण्यात आलं. यामुळे मलेशियातील शेतकरी उद्योजकांचं प्रचंड नुकसान झालं.
 5. ताप, डोकं दुखणं, अशक्त वाटणं, श्वसनाचे आजार, मानसिक गोंधळ उडणं या आजाराच्या शक्यता आहेत. ही लक्षणं दोन दिवस कायम राहिल्यास रुग्ण कोमात जाऊ शकतो.
 6. निपा (Nipah) व्हायरसवर उपचार म्हणन अद्याप लस नाही. तोवर आजारी डुकरं, वटवाघुळं यांच्याशी संपर्क टाळणं हाच या आजारावरचा उपाय आहे.

 


Top

Whoops, looks like something went wrong.