current affairs, loksatta chalu ghadamodi

1. भारताने पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या वस्तूंवर सीमा शुल्क 200 टक्के वाढवल्यानंतर तेथून होणारी आयात 92 टक्के कमी झाली आहे. पाकिस्तानातून होणारी आयात मार्च अखेरीस 2.84 दशलक्ष डॉलर्सची होती.

2. तर पुलवामा हल्ल्यानंतर यावर्षी 16 फेब्रुवारीला पाकिस्तानविरोधात भारताने आर्थिक कारवाई केली होती, त्यात पाकिस्तानातून येणाऱ्या वस्तूंवर 200 टक्के सीमा शुल्क लादण्यात आले होते.

3. तसेच कापूस, फळे, सिमेंट, पेट्रोलियम पदार्थ, खनिजे पाकिस्तानातून आयात करण्यात येत होती.

4. व्यापार मंत्रालयाच्या माहितीनुसार मार्च 2018 अखेरीस 34.61 दशलक्ष डॉलर्सच्या वस्तूंची आयात झाली. मार्चमध्ये 2.84 दशलक्ष डॉलर्सच्या वस्तूंची आयात करण्यात आली असून त्यात 1.19 दशलक्ष डॉलर्सच्या कापसाचा समावेश आहे.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. बालाकोट हवाई हल्ल्यानंतर सरकारने ब्राह्मोस क्षेपणास्त्रे एकूण 40 सुखोई लढाऊ जेट विमानांवर बसवण्याचा निर्णय घेतला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

2. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड व ब्राह्मोस एरोस्पेस लिमिटेड या दोन कंपन्यांना याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. डिसेंबर 2020 पर्यंत सुखोई लढाऊ विमानांवर ब्राह्मोस क्षेपणास्त्रे बसवण्यात येतील असे सांगण्यात आले.

3.प्रत्यक्षात ब्राह्मोस क्षेपणास्त्रांची हवाई आवृत्ती सुखोई विमानांवर बसवण्याचे सरकारने 2016 मध्ये ठरवले होते. प्रत्यक्षात ते काम 2017 च्या अखेरीस सुरूही झाले, पण त्याची गती फार मंद होती त्यामुळे आता हे काम वेगाने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. भारतातील धर्मनिरपेक्षता, संस्कृती आणि इतिहास गौरवशाली आहे. इंडिया या नावातून परकेपणा जाणवतो, तर ‘भारत’मधून राष्ट्रीय एकात्मतेची झलक पहायला मिळते. त्यामुळे भारतीय संविधानामध्ये दुरुस्ती करून ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ हा शब्द वापरला जावा, असा ठराव स्वदेशी जागरण मंचाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. याबाबतची माहिती मंचाचे राष्ट्रीय सहसंयोजक डॉ. अश्विनी महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

2. नियोजन आयोगाने एकाच प्रकारची योजना संपूर्ण देशात राबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे योजना आयोग बदलून नीती आयोग स्थापन करण्याचा निर्णय योग्यच होता. मात्र, नीती आयोगाच्या कार्यपद्धतीवर पुनर्विचार करण्याची गरज आहे.

3. लक्ष वेधले. एअर इंडिया, बीएसएनएलसह सार्वजनिक क्षेत्रातील 92 कंपन्यांमध्ये निर्गुंंतवणुकीच्या नीती आयोगाच्या प्रस्तावावर पुनर्विचार करावा, अशी मागणीही मंचाने केली.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. 10 जून : महाराष्ट्र राज्य दृष्टीदिन.

2. अ‍ॅक्रन, ओहायो येथे बॉब स्मिथ बिल विल्सन यांनी 10 जून 1935 रोजी अल्कोहोलिक्स अ‍ॅनॉनिमस या संस्थेची स्थापना केली.

3. दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीसमोर 10 जून 1940 रोजी शरणागती पत्करली.

4. दुसरे महायुद्ध – इटलीने फ्रान्स व इंग्लंडविरुद्ध 10 जून 1940 रोजी युद्ध पुकारले.

5. 10 जून 1982 पासून दृष्टीदिन महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. भारतीय अंतराळ संसोधन संस्था अर्थात इस्रोची महत्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेची चाचणी अखेरच्या टप्प्यात आली असून तामिळनाडूच्या महेंद्रगिरी आणि बंगळूरूच्या ब्यालालू येथे ही चाचणी सुरु आहे.

2. तसेच येत्या 9 जुलैपासून या मोहिमेचे लॉन्चिंग करण्याचा इस्रोचा मानस आहे.

3.तर इस्रोच्या वेळापत्रकानुसार, या मोहिमेवर जाणारे अंतराळयान 19 जून रोजी बंगळूरू येथून रवाना होईल त्यानंतर ते 20 किंवा 21 जूनला श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावर पोहोचेल. त्यानंतर येथून त्याचे चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण होईल.

4.चंद्रावर गेल्यानंतर थ्रीडी मॅपिंगच्या माध्यमातून तिथल्या पाण्याच्या रेणूंची तपासणी, खनिजांची तपासणी त्याचबरोबर ज्या ठिकाणी आजवर कोणीही पोहोचलेले नाही अशा चंद्राच्या बाजूवर यान उतरवणे यासाठी इस्रोने मोठी तयारी केली आहे.

5.पृथ्वीपासून चंद्राचे अंतर 3,844 लाख किमी आहे. यामध्ये यानाचे प्रक्षेपण अचूकता अंतर ही महत्वाची गोष्ट आहे.

6.चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा यावर परिणाम होतो. त्याचबरोबर चंद्रावर इतर खगोलीय संस्थांचा वावर असून सुर्याच्या अतिनील किरणांचाही परिणाम यावर होणार आहे. त्याचबरोबर संवाद साधताना होणारा उशीर ही देखील या मोहिमेतील एक मोठी समस्या आहे.

7.पृथ्वीवरुन कोणताही संदेश पाठवला तर तो यानापर्यंत पोहोचताना काही मिनिटं लागू शकतात. त्याठिकाणी संदेशासाठीचे रेडिओ सिग्नल्स कमजोर असू शकतात. त्याचबरोबर या संवादादरम्यान होणारा वातावरणाचा आवाजही यावर परिणाम करु शकतो.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मची सुरुवात होऊन 10 दिवस होत असतानाच अर्थ मंत्रालयाने आयकर विभागात ‘सफाई’ अभियान सुरु केले आहे.

2. भ्रष्टाचार आणि बेहिशेबी मालमत्ता असे आरोप असलेल्या 12 अधिकाऱ्यांना सरकारने निवृत्ती घ्यायला लावली.
3.
अर्थ मंत्रालयाने डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड एडमिनिस्ट्रेटिव रिफॉर्म्समधील 56व्या कलमाअंतर्गत 12 अधिकाऱ्यांना निवृत्ती घ्यायला लावली.आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि सहाय्यक आयुक्तपदावरील अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.

4.1985 च्या बॅचमधील आयकर विभागातील सहआयुक्त अशोक अग्रवाल यांचा या यादीत समावेश आहे. अग्रवाल यांनी सक्तवसुली संचालनालयातही काम केले होते. याशिवाय नोएडातील आयकर आयुक्त एस के श्रीवास्तव यांना देखील सक्तीची निवृत्ती घ्यायला लावली आहे. श्वेताभ सुमन, होमी राजवंश (आयकर आयुक्त, तामिळनाडू), बी बी राजेंद्र प्रसाद (आयुक्त, गुजरात), अलोक कुमार मित्रा (आयुक्त कोच्ची), अजय कुमार सिंह (आयुक्त, कोलकाता), बी अरुलप्पा (आयुक्त, कोच्ची), विवेक बत्रा (अतिरिक्त आयुक्त, भुवनेश्वर), चंद्रसेन भारती (अतिरिक्त आयुक्त अलाहाबाद), राम कुमार भार्गव (सहाय्यक आयुक्त, लखनौ) हे भ्रष्टाचाराप्रकरणी दोषी ठरले असून त्यांना देखील निवृत्ती घ्यायला लावण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांना निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. नाटककार, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक गिरीश कर्नाड यांचे बंगळुरूत निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.

2. जागतिक स्तरावरील साहित्य आणि कला यामधील योगदानाबद्दल त्यांना 1999 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

3. तसेच त्यांनी ‘कानुरू हेगाडीथी’ (1999) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, तर ‘इक्बाल’ (2005) आणि ‘लाइफ गोज ऑन’ (2009), एक था टायगर अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून त्यापैकी तीन पुरस्कार कन्नड चित्रपट वंश वृक्ष (1972), काडू (1974), ओन्दानुंडू कालाडल्ली (1978) या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी आणि ‘गोधुली’ (1980) या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी मिळाला आहे. याशिवाय उंबरठा या मराठी चित्रपटामध्येही त्यांनी काम केले होते.

4. 1994 साली साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. संस्कार चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग याने मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये निवृत्तीची घोषणा केली. तर या घोषणेबरोबर युवराजच्या 18 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम लागला आहे.

2. तसेच कोणत्याही भारतीय खेळाडूला करता आला नाही असा पराक्रम आपल्या नावावर करणारा युवराज हा एकमेव खेळाडू ठरला आहे.

3. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन विश्वचषक जिंकणाऱ्या संघांमध्ये युवराजचा समावेश होता. यामध्ये 19 वर्षांखालील विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वचषकाचा समावेश आहे.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात सन 1665 मध्ये 11 जून रोजी पुरंदरचा तह झाला.

2.11 जून 1895 मध्ये पॅरिस-बॉर्डोक्स-पॅरिस ही इतिहासातील पहिली ऑटोमोबाईल रेस किंवा पहिली मोटर रेस झाली.

3.एडविन आर्मस्ट्राँग यांनी 11 जून 1935 रोजी पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1.गुंतवणूकदारांसाठी सध्याच्या कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. सध्याच्या कामगारविषयक 44 कायद्यांचे चार गटांत वर्गीकरण आणि सुसूत्रीकरण केले जाणार आहे.

2. तर वेतन, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक सुरक्षा आणि ओद्योगिक संबंध अशा चार गटांत या कायद्यांचा समन्वय साधला जाणार आहे.

3. गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आंतरमंत्री गटाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

4. तसेच या बैठकीस शहांबरोबर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, कामगारमंत्री संतोष गंगवार, वाणिज्य आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल आदी सहभागी झाले होते.

5. कामगारांच्या प्रॉव्हिडंड फंडशी संबंधित कायदे, कामगार राज्य विमाविषयक कायदे, प्रसूतीविषयक सवलती आणि भरपाईविषयक कायदे यांचे एकाच सामाजिक सुरक्षा कायद्यात सुसूत्रीकरण होणार आहे.

6. तर औद्योगिक सुरक्षाविषयक सध्या अस्तित्वात असलेल्या खाण कामगार कायदा, गोदी कामगार कायदा आदी कायद्यांचे विलीनीकरण होण्याची शक्यता आहे. किमान वेतन कायदा, बोनस कायदा, प्रोत्साहन आणि अन्य भत्ते या कायद्यांचेही सुसूत्रीकरण होण्याची शक्यता आहे.

7. औद्योगिक तंटा कायदा 1947, कामगार संघटना कायदा 1926, औद्योगिक कामगार कायदा 1946 यांचेही सुसूत्रीकरण अपेक्षित आहे


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. ई-सिगारेट आणि व्हॅप्स यांसारख्या निकोटिनयुक्त इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर बंदी घालण्यासाठी सेंट्रल ड्रग्ज स्टॅण्डर्ड कंट्रोल संघटनेने (सीडीएससीओ) ई-सिगारेटला ड्रग्ज म्हणून प्रतिबंधित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिल्याची माहिती मिळाली आहे.

2. तर या प्रस्तावाला आरोग्य मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर सीडीएससीओला उत्पादन, विक्री आणि वितरण यावर प्रतिबंध घालता येणे शक्य होणार आहे. मात्र याचा व्हेपर उत्पादने बाजारपेठेला फटका बसणार आहे. यापूर्वी आरोग्य
मंत्रालय आणि सीडीएससीओने सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या आयात आणि विक्रीवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता.

3. तसेच कर्नाटक, केरळ, मिझोराम, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशने ई-सिगारेटच्या उत्पादनावर आणि वितरण व विक्रीवर बंदी घालण्याचे आदेश अलीकडेच जारी केले आहेत.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. अंतराळातील संकटांचा सामना करण्यासाठी देशाच्या सैन्य दलाचे लष्करी सामर्थ वाढवण्याच्यादृष्टीने केंद्र सरकारने एका नव्या संस्थेस मंजुरी दिली आहे. या उद्देशाच्या प्राप्तीसाठी ही संस्था अत्याधुनिक युद्धशस्त्र प्रणाली व तंत्रज्ञानाचा विकास करेल.

2. तर डिफेन्स रिसर्च एजन्सी (डीएसआरओ) असे नाव असेलेली या नव्या संस्थेला अंतराळातील युद्धशस्त्र प्रणाली व तंत्रज्ञान निर्मितीची जबाबदारी देण्यात आली असल्याचे संरक्षण मंत्रालयातील सुत्रांनी एएनआयला सांगितले आहे.

3. तसेच सरकारकडून काही वेळापूर्वीच सर्वोच्च स्तरावर हा निर्णय घेण्यात आला आहे. आता संयुक्त सचिव-स्तरावरील शास्त्रज्ञांद्वारे या संस्थेची बांधणी करण्यास सुरूवात झाली आहे. या संस्थेसाठी शास्त्रज्ञांचा एक गट काम करेल, जो की
तिन्ही सैन्यदलाच्या अधिका-यांशी समन्वय साधुन असेल.

4. ही संस्था डिफेन्स स्पेस एजन्सी (डीएसए) ला संशोधन व विकास कार्यात मदत करणार आहे. ज्यामध्ये तिन्ही सेवा दलांचा समावेश असेल.डीएसएची निर्मिती ही अंतराळातील युद्धात देशाची मदत करण्यासाठी करण्यात आलेली आहे.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. मोदी सरकारनं आपल्या दुसऱ्या कार्यकाळात अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक-आर्थिक सशक्तीकरणासाठी पुढील पाच वर्षांत पाच कोटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली. यात निम्मं प्रमाण मुलींचं असेल. अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी याबद्दलची माहिती दिली.

2. तसेच अल्पसंख्यांक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या मौलाना आजाद शिक्षण प्रतिष्ठानच्या 65 व्या आमसभेनंतर नक्वींनी पत्रकारांशी संवाद साधला.

3. मदरशातील शिक्षकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना विविध शैक्षणिक संस्थांमध्ये प्रशिक्षण देण्यात येईल असं मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर मदरशातील शिक्षक हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, संगणकाचं शिक्षण देऊ शकतील.

4. तर पुढील महिन्यापासून हे काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक-आर्थिक सशक्तीकरणासाठी पाच वर्षांत पाच कोटी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येईल.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. 12 जून हा दिवस जागतिक बालकामगार विरोधी दिन म्हणून पाळला जातो.

2. भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा जन्म इ.स. 499 मध्ये 12 जून रोजी झाला.

3. गोपाळकृष्ण गोखले यांनी 12 जून 1905 रोजी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली.

4. 12 जून 1975 मध्ये अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना 6 वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.


current affairs, loksatta chalu ghadamodi

१. यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना जाहीर झाला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तथा राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी बुधवारी ही घोषणा केली.
२. 1 लाख रुपये, स्मृती चिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राजर्षी शाहू जयंतीदिनी म्हणजे मंगळवार (२६ जून) सायंकाळी ६ वाजता शाहू स्मारक भवन येथे आयोजित कार्यक्रमामध्ये प्रदान करण्यात येणार आहे. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे.
३. राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूर यांच्यावतीने दरवर्षी शाहू जयंतीनिमित्त समाज प्रबोधन, साहित्य, कला, संस्कृती, विज्ञान, संगीत, क्रीडा इत्यादी क्षेत्रात दीर्घकाळ उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला अथवा संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
४. यंदाचा हा पुरस्कार अण्णा हजारे यांना त्यांच्या सामाजीक क्षेत्रातील अमुल्य कामगिरीबद्दल देण्यात येत आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा कृतीशील वारसा चालू ठेवणाऱ्या एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व म्हणून आणि त्यांनी समाज प्रबोधनाच्या वाटचालीमध्ये दीर्घकाळ दिलेल्या मौलिक योगदानाचा सन्मान म्हणूनही त्यांना हा पुरस्कार देण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला असल्याचे देसाई यांनी सांगितले.


current affairs, loksatta chalu ghadamodi

१. भारतातील उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया योजनेची सुरूवात केली होती.मेक इन इंडिया योजनेला आता उत्तम प्रतिसाद मिळत असून ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये भारतात तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक मेट्रो धावणार आहेत. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली.
२.गेल्या काही वर्षांमध्ये भारताने तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्यातच मेक इन इंडिया या योजनेमुळे भारतातील उत्पादन क्षेत्रालाही मोठी चालना मिळाली आहे. देशांतर्गत आणि परदेशी कंपन्यांद्वारे देशातील उत्पादन क्षेत्राला चालना मिळावी यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. त्यातच आता या योजनेला मोठे यश मिळाले असून भारतात तयार करण्यात आलेली मेट्रो ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये धावणार आहे.
३. सिडनीत पहिल्यांदाच चालक विरहित मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. या मेट्रोमध्ये 6 कोचेस देण्यात आले असून 22 अॅल्सटॉम ट्रेनद्वारे ही सेवा पुरवली जाणार आहे. तल्लावांग मेट्रो स्टेशन ते वेस्टवूड स्थानकादरम्यान ही मेट्रो सेवा चालवण्यात येईल.
४. तल्लावांग ते वेस्टवूडदरम्यान एकूण 13 मेट्रो स्थानके असतील. सिडनी मेट्रोसाठी अॅल्सटॉम एसए या कंपनीने 22 मेट्रो ट्रेन तयार केल्या आहेत. या ट्रेन आंध्र प्रदेशात असेंबल करण्यात आल्या असून त्या पूर्णत: स्वयंचलित आहे. यामध्ये एलईडी लाइट, आपात्कालिन इंटरकॉम आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यासारख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच एल्सटॉम एसए ने सिग्नलिंग सिस्टम आणि मेट्रो चालवण्यासाठी सिडनी मेट्रोसोबत 15 वर्षांचा करार केला आहे


current affairs, loksatta chalu ghadamodi

१. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्याच कॅबिनेट बैठकीत आज तीन तलाक विधेयकास मंजुरी देण्यात आली. शिवाय मंत्रीमंडळाने जम्मू काश्मीरमध्ये सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट वाढवण्यासही मंजुरी दिली आहे.
२. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कॅबिनेट बैठकीतील निर्णयांची माहिती देताना सांगितले की, मुस्लिम महिलांचा विचार करून मोदी सरकार आगामी संसद सत्रात तीन तलाकचे विधेयक सादर करेल. अध्यादेशाचं कायद्यात परिवर्तन करण्यासाठी विधेयक आणण्यात येणार आहे. शिवाय कॅबिनेटने जम्मू-काश्मीर आरक्षण विधेयक २०१९ ला मंजुरी दिली आहे. ज्यामुळे जम्मू-काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमावर्ती भागात राहणा-या नागरिकांना मदत होईल.
३. केंद्र सरकारने आधार आणि अन्य कायदे (संशोधन) विधेयक २०१९ ला ही मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता कोणत्याही व्यक्तीलआ आधार क्रमांक देण्यासाठी जबरदस्ती करता येणार नाही. मंत्र्यांचे खातेवाटप झाल्यानंतर कॅबिनेटची ही पहिलीच बैठक बुधवारी पार पडली. ज्यामध्ये सरकारच्या नजीकच्या व दुरगामी धोरणांवर चर्चा करण्यात आली.


current affairs, loksatta chalu ghadamodi

१. नवी दिल्ली : नोकरशाहीच्या रचनेत (ब्युरोक्रॅटिक हायरार्की) निर्णय प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी उपसचिव आणि संचालकांची पदे खासगी क्षेत्रातून भरण्याची केंद्र सरकारची योजना आहे, असे अधिकाऱ्यांनी बुधवारी सांगितले. सामान्यत: ही पदे सरकारी नोकरांतून म्हणजे भारतीय प्रशासन सेवेसारख्या (आयएएस) गट-अ मधून, तसेच केंद्रीय सचिवालय सेवेत बढती मिळालेल्या अधिकाऱ्यांतून भरली जातात.
२. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाचे (डीओपीटी) सचिव सी. चंद्रमौली यांनी संबंधित अधिका यांना उपसचिव आणि संचालक या पातळीवर तज्ज्ञांची नियुक्ती करण्यासाठी औपचारिक प्रस्ताव तयार करा, असे सांगितले आहे, असे हा अधिकारी म्हणला.
३. प्रारंभी असे एकूण ४० अधिकारी नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. सरकारच्या नीती आयोगाने व्यवस्थेमध्ये तज्ज्ञांना ठराविक मुदतीसाठी सामावून घेणे गरजेचे आहे यावर आपल्या अहवालात भर दिला होता. वेगवेगळ्या पातळ्यांवर उपसचिव ते संयुक्त सचिव या पदांवर नीती आयोग तज्ज्ञांची नियुक्ती करण्याचाही विचार करीत आहे. सल्लागारांची सेवा घेतली जात आहे; परंतु हे तज्ज्ञ सामावून घेण्यात आले तर त्यांचा दर्जा सरकारी सेवेतून त्या पदावर येणा यांचा जो असतो तोच असेल, असे सांगून हा अधिकारी म्हणाला की, याबाबत खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांचे अर्ज मागवणारी जाहिरात लवकरच दिली जाईल


current affairs, loksatta chalu ghadamodi

१. बंगळुरू : चंद्रावरील माती व वातावरणाचा सखोल अभ्यास करण्यासाठी भारताच्या चांद्रयान-2 या दुसऱ्या चांद्रमोहिमेसाठीचे यान १५ जुलै रोजी अंतराळात झेपावेल, असे इस्रोने बुधवारी जाहीर केले. इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी सात आठवड्यांच्या महत्वाकांक्षी अंतराळ मोहिमेची माहिती दिली. चांद्रयान-२साठी जीएसएलव्ही-५ मार्क 3 हा अग्निबाण श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ तळावरून १५ जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी प्रक्षेपित केला जाईल.
२. मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात वैज्ञानिक संशोधनासाठीची साधने व उपकरणे असलेले विक्रम हे लॅण्डर व प्रग्यान ही गाडी (रोव्हर) ६ किंवा ७ सप्टेंबर रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविली जाईल. दहा वर्षांपूर्वी भारताने चांद्रयान-१; मोहीम पूर्ण केली होती. आताची मोहीम प्रगत व तंत्रसिद्धतेने अधिक आव्हानात्मक असेल.
३. चांद्रयान-१ मध्ये चंद्रावर न उतरता ११ वैज्ञनिक उपकरणांनी चंद्राचा दुरुनच अभ्यास केला होता. आता प्रग्यानला कुशीत घेऊन विक्रम चंद्रावर उतरेल. नंतर प्रग्यान चंद्रावरील दगड-मातीचे नमुने गोळा करेल. दूरवरून अभ्यास करूनही चंद्रावरील पाण्याचा शोध लावणे हा चांद्रयान-चा यशाचा तुरा ठरला होता. आता त्याच गृहितकास बळकटी मिळण्याखेरीज चंद्राची नवी गुपितेही उघड होतील.
४. शिवन म्हणाले की, चंद्राभोवती ऑर्बिटरने घिरट्या घालण्यापर्यंतचा टप्पा चांद्रयान-१ प्रमाणे असेल. तेथपर्यंतचे मिशन याआधी यशस्वी झाले होतेच. आताच्या मिशन मधील लॅण्डर व रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविण्याचा शेवटचा १५ मिनिटांचा टप्पा पूर्णपणे नवा असल्याने काहीशी धास्ती निर्माण करणारा असेल. पण कुशल वैज्ञानिक ही नवखेपणाची बाजीही फत्ते करतील, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. या मोहिमेत १४ प्रकारची वैज्ञानिक उपकरणे यानासोबत पाठविली जातील. ती ऑर्बिटर विक्रम हा लॅण्डर व प्रग्यान हा रोव्हर या तिन्हीवर विखुरलेली असतील व ती एकाच वेळी निरनिराळे प्रयोग-चाचण्या करत राहतील.


current affairs, loksatta chalu ghadamodi

महत्वाच्या घटना
१८८१: यू. एस. एस. जीनेट आर्क्टिक समुद्रात नष्ट.
१९३४:व्हेनिसमध्ये अॅडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी यांची भेट.
१९५६:पहिली युरोपियन चॅम्पियन कप फूटबॉल स्पर्धा रियल माद्रिदने जिंकली.
१९८३:पायोनियर १० हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली.
२०००:स्पेन मधील माद्रिद येथे एकाच वेळी १५ स्पर्धकांविरुद्ध खेळताना ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद याने बारा लढतीत विजय मिळविला.

जन्म
१८३१: प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो, असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक गणितज्ञ जेम्सक्लार्क मॅक्सवेल यांचा जन्म(मृत्यू ५ नोव्हेंबर १८७९ केम्ब्रिज, यु. के.)
१८७९: कट्टर हिंदुत्त्ववादी आणि अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांचा जन्म.(मृत्यू:१६ मार्च १९४५)

मृत्यू
१९६९:विनोदी लेखक, नाटकाकर, कवी, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ, टीकाकार, प्रभावी वक्ता, राजकारणी केशवकुमार उर्फ प्रल्हाद केशव अत्रे यांचे निधन.(जन्म १३ ऑगस्ट१८९८)
२०१२:पाकिस्तानी गझल गायक मेहंदी हसन यांचे निधन.(जन्म:१८ जुलै १९२७)


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. ओदिशानंतर फॅनी चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकले.

2. पश्चिम बंगालमध्ये वादळाची तीव्रता ओदिशापेक्षा कमी झाली असली तरी पश्चिम बंगालमध्ये ताशी 90 किलोमीटरच्या वेगाने वादळ धडकले आहे. तसेच फॅनी चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमधील कोलकाता आणि अन्य भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

3. तर ताशी 175 किलोमीटर वेगाच्या चक्रीवादळाने ओदिशात जोरदार तडाखा दिला. नंतर त्याची तीव्रता कमी झाली आहे.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. भारताबरोबर निर्यात वाढवू इच्छिणाऱ्या कंपन्यांना फटका बसण्याची भीती असल्याने अमेरिकेने सार्वत्रिक अग्रक्रम योजना रद्द (जीएसपी) करू नये, असे आवाहन 25 काँग्रेस सदस्यांनी अमेरिकी व्यापार प्रतिनिधींना केले आहे. तर
भारताबरोबरची ही योजना रद्द करण्यासाठी दिलेल्या नोटिशीची 60 दिवसांची मुदत संपली आहे.

2. तसेच सार्वत्रिक अग्रक्रम योजना हा अमेरिकेचा जुना कार्यक्रम असून त्यामुळे संबंधित देशांच्या हजारो वस्तू कुठलाही कर लागू न करता अमेरिकेत येत असतात. त्याचा लाभ भारतालाही होत आहे.

3. 4 मार्च रोजी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असे जाहीर केले,की भारताबरोबरची ही योजना आम्ही बंद करणार असून यापुढे भारताला त्याचा लाभ मिळू देणार नाही.

4. तसेच त्यासाठी दिलेल्या नोटिशीची 60 दिवसांची मुदत संपली असून त्या पाश्र्वभूमीवर 25 अमेरिकी काँग्रेस सदस्यांनी ही योजना रद्द न करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाचे मन वळवण्याचे प्रयत्न केले आहेत.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1.भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे माजी अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात झाला आहे.

2. फ्रान्समधील ‘शेवेलियर डी लॉर्ड नॅशनल डी ला लिगियन दी ऑनर’ हा पुरस्कार किरण कुमार यांना प्रदान करण्यात आला.

3. भारत आणि फ्रान्समधील अवकाशसंशोधनाच्या कार्यामध्ये प्रमुख भूमिका पार पाडल्याबद्दल किरण कुमार यांचा सन्मान करण्यात आल्याचे फ्रान्समार्फत सांगण्यात आले आहे.

4. तसेच फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या वतीने भारतातील फ्रान्सचे राजदूत अलेकझॅण्डर जीगलर यांनी दिल्लीमधील फ्रान्सच्या दुतावासात हा पुरस्कार किरण कुमार यांना प्रदान केला.

5. तर ‘शेवेलियर डी लॉर्ड नॅशनल डी ला लिगियन दी ऑनर’ हा पुरस्कार देण्याची सुरुवात 1802 मध्ये नेपोलियन बोनापार्टने केली होती.

6. हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून फ्रान्सच्या प्रगतीमध्ये हातभार लावणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. भारताची महत्वाकांक्षी मोहिम असणाऱ्या चांद्रयान-2 चं लवकरच प्रक्षेपण केलं जाणार आहे.

2. तसेच 9 जुलै ते 16 जुलै दरम्यान हे प्रक्षेपण केलं जाणार आहे. इस्त्रोने 1 मे रोजी यासंबंधी घोषणा केली आहे.

3. जीएसएलव्ही मार्क-3 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने चांद्रयान-2 चं प्रक्षेपण केलं जाणार आहे.

4. श्रीहरीकोटा येथून हे प्रक्षेपण केलं जाणार असून 6 सप्टेंबरपर्यंत चांद्रयान-2 चंद्रावर पाऊल ठेवेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

5. चांद्रयान-2 मध्ये ऑर्बिटर, लॅण्डर (विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) हे तीन प्रमुख भाग असणार आहेत.

6. तसेच चांद्रयान-2 चं वजन 3290 किलो असणार आहे. चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर ऑर्बिटर लॅण्डरपासून वेगळं होईल. यानंतर लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागावरु उतरेल आणि यानंतर पुन्हा रोव्हर त्याच्यापासून वेगळा होईल.

7. ऑर्बिटरमध्ये अनेक संवेदनशील उपकरणं, कॅमेरा आण सेन्सर्स असणार आहेत. अशाच पद्धतीने रोव्हरमध्येदेखील अत्याधुनिक उपकरणं असतील. हे दोघे मिळून चंद्राच्या पृष्ठभागावर असणाऱ्या मिनरल्स आणि इतर गोष्टींची माहिती पाठवतील. जी माहिती पाठवली जाईल त्याचा इस्त्रो अभ्यास करणार आहे.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. 5 मे : युरोप दिन

2. कुबलाई खान हा 5 मे 1260 मध्ये मंगोलियाचा सम्राट बनला.

3. 5 मे 1901 मध्ये पं. विष्णू दिगंबर पलुस्क यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.

4. पश्चिम जर्मनीला 5 मे 1955 मध्ये सार्वभौमत्व प्राप्त झाले.

5. 5 मे 1964 मध्ये युरोप परिषदेने 5 मे हा युरोप दिन घोषित केला.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1.शासकीय ग्रंथ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत, तसेच राज्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचे येणाऱ्या पिढीला आकलन व्हावे, या उद्देशाने राज्याच्या दर्शनिका विभागाने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

2. तर गेली अनेक वर्षे केवळ शासकीय वितरकांकडेच उपलब्ध होणार्या जिल्हा-राज्य दर्शनिका आता लवकरच खासगी वितरकांकडेही उपलब्ध होणार आहेत.

3. दर्शनिका विभाग महाराष्ट्राचे ऐतिहासिक, सांस्कृतिक वैभव टिकविण्यासाठी काम करत आहे. या दर्शनिका गेली अनेक वर्षे केवळ शासकीय वितरकांकडे उपलब्ध होत होत्या. मात्र, यामुळे त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्यास अडथळे निर्माण होत होते. परिणामी, वाचक आणि वितरक यांच्यातील ही दरी दूर करण्यासाठी दर्शनिका विभागाने ही सर्व गॅझेटिअर खासगी वितरकांकडे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

4. तसेच विभागामार्फत आतापर्यंत एकूण 87 ग्रंथ प्रकाशित करण्यात आले आहेत. या सर्व ग्रंथांच्या ई-बुक आवृत्तीदेखील प्रकाशित करण्यात आल्या असून, 40 हजारांपेक्षा जास्त पृष्ठे शासनाच्या संकेतस्थळावर ‘दर्शनिका’ या शीर्षकाखाली
सर्वांसाठी उपलब्ध आहेत.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यात आले. त्यातून त्यांना सत्तेत सहभागाची संधी देण्यात आली; मात्र महिला लोकप्रतिनिधींना कमी लेखून राष्ट्रीय कार्यक्रमांच्या दिवशी झेंडावंदनापासून वंचित ठेवले जात असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. त्याची दखल घेत आयोगाने अमरावती विभागीय आयुक्तांकडून पाचही जिल्हा परिषदांचा अहवाल मागविला आहे.

2. तसेच निवडणुकीनंतर ग्रामपंचायत सदस्यांच्या कारभाराच्या धोरणाचा आढावा आयोगाने घेतला. त्यासाठी आयोगाने आपल्या स्तरावर माहिती घेतली. त्यात ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी महिलांनी अनेक तक्रारी केल्या. त्यावर
उपाययोजना करण्यासाठी आयोगाने संबंधित यंत्रणांकडून माहितीही मागवली. सोबतच शासनाच्या ही बाब लक्षात आणून दिली.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. भारताने गेल्या वर्षी 25 लाख पर्यटकांना ई-व्हिसा जारी केला. हे प्रमाण 2015 या वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत पाचपट आहे. व्हिसाच्या मुख्य श्रेणींची संख्या 26 वरून 21 पर्यंत कमी करण्यात आली आहे.

2. तसेच यासंदर्भात गृह विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हिसाच्या उपश्रेणींची संख्या 104 वरून 65 इतकी करण्यात आली आहे.

3. 2015 साली इमिग्रेशन विभागाने 5.29 लाख ई-व्हिसा जारी केले होते. गेल्या वर्षी हीच संख्या 25.15 लाख इतकी झाली.

4. भारतीय दूतावासातर्फे देण्यात येणार्या पेपर व्हिसाची संख्या घटली आहे. 2015 साली अशा व्हिसांची 45 लाख इतकी असलेली संख्या 2018 साली 35 लाख झाली.

5. भारताकडून 166 देशांतील पर्यटक, नागरिकांना ई-व्हिसा देण्यात येतो. पर्यटन, वैद्यकीय, व्यावसायिक काम, कॉन्फरन्सला हजर राहणे अशा कारणांकरिता अर्ज केल्यापासून 72 तासांत ई-व्हिसा मिळतो. वेब शो, मालिका, चित्रीकरण स्थळे निवडण्यासाठी दौरा करणे अशा कारणांसाठी फिल्म व्हिसाही देण्यात येतो.

6. फिल्म व्हिसा असलेल्या विदेशी पर्यटकाला आता भारतात 180 दिवस राहायची मुभा देण्यात आली आहे.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फोनी’ चक्रीवादळामुळे राज्याच्या हवामानातही किंचित अंशी बदल नोंदविण्यात आले होते.

2. आता ‘फोनी’चा प्रभाव ओसरत असतानाच हवामानातील बदल कायम असून, विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

3. तसेच मुंबई आणि आसपासच्या परिसरात सोमवारसह मंगळवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 34, 25 अंशाच्या आसपास राहील.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. 6 मे : आंतरराष्ट्रीय आहार नाही दिन

2. पेनी ब्लॅ नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट 6 मे 1840 मध्ये प्रसारित झाले.

3. पॅरिसमधील आयफे ल टॉवरचे उद्‍घाटन 6 मे 1889 मध्ये झाले.

4. ईडीएसएसी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक सॉफ्टवेअर सुरु 6 मे 1949 मध्ये झाले.

5. 6 मे 1954 मध्ये रॉजर बॅनिस्टर हे 1 मैल चार मिनिटांच्या आत धावणारे पाहिले व्यक्ती ठरले.

6. अडोल्फ हिटलर यांच्या डायरीचा 6 मे 1983 मध्ये लबाडी म्हणून खुलासा केला गेला.

7. 6 मे 1997 मध्ये बँक ऑफ इंग्लंड ला स्वायत्तता देण्यात आली.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फॅनी वादळाचा फटका बसलेल्या ओदिशाची हवाई पाहणी करून मदत कार्यासाठी आणखी एक हजार कोटींची मदत जाहीर केली.

2. किनारी राज्यांसाठी आपत्ती दीर्घकालीन आपत्ती निवारण योजना आखण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला आहे. फॅनी वादळाने ओदिशाला झोडपून काढले त्यात 34 बळी गेले होते.

3. तसेच फॅनी वादळाची चाहूल लागताच केंद्राने राज्याला 381 कोटी रुपये मंजूर केले होते असे सांगून मोदी म्हणाले की, राज्याची गरज लक्षात घेऊन वेगाने मदतकार्य करण्यासाठी 1000 कोटी मंजूर करण्यात येत आहेत.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) 22 मे रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून राडार इमेजिंग सॅटेलाईट (रिसॅट-2 बीआरवन) अवकाशात सोडणार असल्यामुळे भारताला अवकाशात नजर ठेवण्यासाठी आणखी एक डोळा लाभणार आहे. यापूर्वीच्या रिसॅट मालिकेतील उपग्रहांच्या तुलनेत रिसॅट-2 बीआर वन हा खूपच अत्याधुनिक आहे.

2. नवा उपग्रह हा बाहेरून जुन्या उपग्रहासारखाच दिसतो; परंतु आधी अवकाशात सोडण्यात आलेल्या उपग्रहापेक्षा याचे कॉन्फिग्युरेशन वेगळे आहे.

3. तसेच नव्या उपग्रहाची टेहळणी व इमेजिंग क्षमता ही वाढलेली आहे. रिसॅटच्या एक्स बँड सिनेथिक अपर्चर राडारची (एसएआर) क्षमता दिवस-रात्र तसेच सर्व हवामानात लक्ष ठेवण्याची आहे. राडार ढगात शिरू शकते व एक रिझोल्युशन
एक मीटरपर्यंत झूम करू शकते. रिसॅट उपग्रह पृथ्वीवरील इमारत किंवा वस्तूचे छायाचित्र दिवसातून दोन ते तीन वेळा घेऊ शकते. त्यामुळे हा उपग्रह पाकव्याप्त काश्मीरमधील जिहादी दहशतवादी तळ आणि नियंत्रण रेषेवरील
दहशतवाद्यांच्या लाँचिंग पॅड्सवरून होणाऱ्या घुसखोरीवर लक्ष ठेवण्यासाठी मदत करील.

4. तर यापूर्वीच्या रिसॅट मालिकेतील उपग्रहांनी घेतलेल्या इमेजेसचा (प्रतिमा) उपयोग 2016 मध्ये केल्या गेलेल्या सर्जिकल स्ट्राईक्ससाठी आणि यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानातील बालाकोटमध्ये जैश-ए-महंमदच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यांसाठी केला गेला आहे.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. पृथ्वीवरील प्राणी व वनस्पतींच्या सुमारे 10 लाख प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर असून त्याला मानवाची कृत्येच कारणीभूत आहेत, पण यातून सरतेशेवटी माणसाचेच नुकसान होणार आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या स्टेट ऑफ नेचरया
मूल्यमापनात म्हटले आहे.

2. तसेच माणसांनी वने, महासागर, जमीन, हवा हे सगळेच धोक्यात आणले असून हवामान बदलांइतकाच हा धोका महत्त्वाचा आहे असे 132 देशांच्या साडेचारशे तज्ञांच्या बैठकीचे अध्यक्ष रॉबर्ट वॉटसन यांनी सांगितले.

3. तर येत्या दहा वर्षांत किमान 1 लाख प्राणी व वनस्पती नष्ट होणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

4. गेल्या 10 दशलक्ष वर्षांत पृथ्वीवरील जीवसृष्टीची जेवढी हानी झाली नाही त्यापेक्षा दहा ते शंभर पट वेगाने हानी आता सुरू आहे. त्यामुळे 66 दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर डायनॉसॉर्स मेले होते त्यानंतरची ही सर्वात मोठी हानी असणार आहे.
ज्या पद्धतीने आपण उत्पादन करतो, वापरतो, त्या सर्व घटकांमध्ये स्थित्यंतरात्मक बदल केला नाही तर हे नष्टचर्य सुरूच राहील.

5. संयुक्त राष्ट्रांनी प्रसारित केलेला अहवाल 1800 पानांचा असून त्यात 15 हजार स्रोतांचा वापर करण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्येही एका अहवालात हवामान विज्ञान समितीने म्हटले होते की, सामाजिक स्थित्यंतरे झाल्याशिवाय तापमान वाढ 1.5 अंशांच्या टप्प्यात ठेवणे शक्य नाही. आधीच तापमान वाढ 12 अंश सेल्सियस झाली असून शतकअखेरीस ती 3 अंशांनी वाढणार आहे.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. 7 मे 1907 मध्ये मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली.

2. सोनी ह्या कंपनी ची स्थापना 7 मे 1946 मध्ये झाली.

3. एअर इंडिया ची मुंबई – टोकियो विमानसेवा 7 मे 1907 मध्ये सुरू झाली.

4. लता मंगेश कर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार 7 मे 1990 मध्ये प्रदान.

5. 7 मे 1992 मध्ये एन्डेव्हर हे अंतराळयान आपल्या पहिल्या मोहिमेवर निघाले.

6. पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रबिंद्रनाथ ठाकूर तथा टागोर यांचा कलकत्ता येथे पिराली ब्राम्हण कुटुंबात 7 मे 1861 मध्ये जन्म.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये महत्त्वाची भूमिका निभावलेले रघुराम राजन बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदाच्या शर्यतीत आहेत.

2. ब्रेग्झिटनंतरचा ब्रिटन बाहेरच्या देशातील व्यक्तिला बँकिंग क्षेत्रातील हे सर्वोच्च स्थान देईल का हा प्रश्न आहे. ब्रिटनचं पतधोरण ठरवणं आणि या देशाचं आर्थिक स्थैर्य राखणं ही काम अराजकीय व्यक्तिवर सोपवली जातात आणि त्यादृष्टीनं ज्या नावांचा विचार सुरू आहे त्यात राजन यांचं नाव आघाडीवर आहे.

3.ब्रिटनची बँक ऑफ इंग्लंड ही शिखर बँक 325 वर्ष जुनी असून सध्या मार्क कार्नी गव्हर्नरपदी आहेत.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. लिया पुत्राजाया (मलेशिया) : कर्करोगाशी कडवी झुंज देत असलेला मलेशियाचा बॅडमिंटन स्टार ली चोंग वेई याने गुरुवारी निवृत्ती जाहीर केली.

2.कारकीर्दीत अनेक जेतेपदाचा मानकरी राहिलेल्या ३६ वर्षांच्या लीची आॅलिम्पिक सुवर्ण जिंकण्याची इच्छा मात्र अपूर्णच राहिली


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. महाराष्ट्रातील महानगरांच्या महापौरांनी आपल्याला प्रशासकीय आणि वित्तीय अधिकार असायला पाहिजेत, अशी मागणी केली आहे.

2. जगातील बहुतेक महानगरांमध्ये पालिकांचा कारभार लोकनियुक्त महापौरांच्या हातात असतो. काही ठिकाणी नागरिक त्यांची प्रत्यक्ष निवड करतात तर काही ठिकाणी लोकप्रतिनिधी.

3. न्यू यॉर्क आणि लंडनसारख्या शहरांचे महापौर प्रत्यक्ष नागरिक तर स्पेनमधील बार्सेलोना आणि युरोपमधील अनेक शहरांचे महापौर लोकप्रतिनिधींमधून निवडले जातात.

4. शहरासंबंधीची धोरणे आणि नियम ठरविणे, नियोजन आणि विकासाचे नियमन करणे, करनिर्धारण आणि नागरी सेवांचे दर ठरविणे, प्रकल्प आखणे-राबविणे, पालिकेसाठी उत्पन्न मिळविणे, बजेट आणि खर्च करणे अशी सर्व कामे महापौरांच्या अधिकारात मोडतात.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. वॉशिंग्टन : भारतीय बाजाराची विशालता लक्षात घेऊन गुगलने काही खास उत्पादने विकसित केली व नंतर ती उत्पादने जागतिक बाजारातही नेण्यात आली, असे प्रतिपादन गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी केले.

2.सुंदर पिचाई हे भारतीय वंशाचे आहेत.

3. अमेरिका-भारत व्यापार परिषदेने भरवलेल्या ‘इंडिया आयडियाज्’ शिखर संमेलनात पिचाई यांनी हे वक्तव्य केले.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1.14 जून हा दिवस ‘जागतिक रक्त दाता दिन म्हणून पाळला जातो.

2. भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ ‘निळकंथा सोमायाजी‘ यांचा जन्म 14 जून 1444 मध्ये झाला.

3. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ‘अनाथ बालिकाश्रम‘ ही संस्था 14 जून 1896 मध्ये स्थापन केली.

4. भारताला स्वायत्तता देण्यासंबंधीची ‘वेव्हेल योजना‘ 14 जून 1945 रोजी जाहीर झाली होती.

5. ए.सी. किंवा डी.सी. यापैकी कोणत्याही विद्युतप्रवाहावर चालणार्‍या उपनगरी गाडीचा (Electric Multiple Unit EMU) शुभारंभ 14 जून 2001 मध्ये पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक वासुदेव गुप्ता यांच्या हस्ते झाले.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. देशात 2021 मध्ये जनगणना करण्यात येणार असून पहिल्यांदाच जनगणनेच्या माहितीचे संकलन ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.

2. जनगणनेच्या पूर्वतयारीसाठी ऑगस्ट ते सप्टेंबर 2019 या कालावधीत देशातील काही ठराविक जिल्ह्यां तील गावांमध्ये आणि शहरांमध्ये याची प्री टेस्टदेखील करण्यात येईल.

3. तर आगामी जनगणनेमध्ये काही मोठे बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बदलांच्या पार्श्वभूमीवर 3 जून ते 11 जून या कालावधीत पुण्यातील यशदा येथे राज्यस्तरी य प्रशिक्षकांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.

4. तसेच पहिल्यांदाच जनगणनेच्या माहितीचे संकलन ऑनलाइन पद्धतीने होणार आणि त्याचीच चाचणी यादरम्यान होणार आहे.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. साहित्य अकादमीच्या युवा आणि बाल साहित्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली.   

2. मराठी भाषेसाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतं य’ या कवितासंग्रहाला यंदाचा युवा साहित्य पुरस्कार मिळाला असून सलीम मुल्ला यांच्या ‘जंगल खजिन्याचा शोध’ या कादंबरीसाठी बालसाहित्य पुरस्कार देण्यात आला आहे.     

3. साहित्य अकादमीने 22 भाषांमधील युवा साहित्यिकांच्या 11 काव्यसंग्रह, सहा कथा, पाच कांदबऱ्या आणि एका समीक्षेची पुरस्कारासाठी निवड केली. या वर्षी युवा साहित्यात कवितांचा अधिक प्रभावी ठरल्या. युवा साहित्य अकादमीचा तर पुरस्कार पन्नास हजार रुपयांचा आहे. 35 वर्षांच्या आतील साहित्यिकांसाठी युवा पुरस्कार दिला जातो    .

4. तसेच फक्त मैथिली भाषेतील पुरस्कार जाहीर झालेले नाहीत.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. बिहार सरकारने वृद्धांसाठी एका नव्या सार्वत्रिक पेन्शन योजनेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री वृद्धजन पेन्शन योजना’ (एमव्हीपीवाय) असे या योजनेचे नाव आहे.

2. तर 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शिवाय माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या वयोवृद्ध पत्रकारांना देखील पेन्शन दिले जाणार आहे.

3. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या योजनेची माहिती दिली. 1 एप्रिल 2019 पासून या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच शासकीय सेवानिवृत्त असलेल्या वयोवृद्धांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

4. तर या योजनेअंतर्गत 60 वर्षांपेक्षा जास्त वय व पात्र असलेल्या सर्वांना मासिक 400 रूपये पेन्शन तर 80 वर्षांपेक्षाजास्त वय असलेल्याना 500 रूपये प्रति महिना दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

5. सध्या वृद्धांसाठी असलेली पेन्शन योजना केवळ मागास प्रवर्गालाच लागू आहे. याशिवाय मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या पत्रकारांना सहा हजार रूपये पेन्शन जाहीर केले आहे. जे पत्रकार सध्या माध्यमांमध्ये कार्यरत आहेत आणि ज्यांना कोणतेही पेन्शन मिळत नाही ते ‘बिहार पत्रकार सन्मान योजने’च्या लाभास पात्र असणार आहेत.

6. तसेच या योजनेची देखील या वर्षाच्या 1 एप्रिलपासून अंमलबजाव णी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. जगभरातील 2000 मोठ्या कंपन्यांच्या यांदीत भारतातील 57 कंपन्यांना स्थान देण्यात आले आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला पहिल्या 200 कंपन्यांच्या यादीत स्थान देण्यात आले असून पहिल्या 200 कंपन्यांमध्ये ही एकमेव भारतीय कंपनी आहे. फोर्ब्सच्या नुकतीच एक यादी जाहीर केली आहे.

2. फोर्ब्सच्या जागतिक 2000 कंपन्यांच्या यावर्षीच्या यादीत चीनच्या इंडस्ट्रियल अँड कॉमर्शियल बँक ऑफ चायनाला (आयसीबीसी) पहिले स्थान देण्यात आले आहे. आयसीबीसी सलग सातव्यांदा फोर्ब्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

3. तर पहिल्या 200 कंपन्यांच्या यादीत रियालंस इंडस्ट्रीज या एकमेव कंपनीला या यादीत स्थान देण्यात आले आहे. पेट्रोलिअम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रात रिलायन्स इंडस्ट्रीज 11 व्या स्थानावर आहे. तर रॉयल डच शेलला पहिले स्थान देण्यात आले आहे.

4. पहिल्या 2000 कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक 209 वे, ओएनजीसी 220 वे, इंडियन ऑईल 288 वे आणि एचडीएफसी लिमिटेड 332 वे स्थान देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त या यादीत टीसीएस, आयसीआयसीआई बँक, एल अँड टी,
भारतीय स्टेट बँक आणि एनटीपीसीला पहिल्या 500 कंपन्यांच्या यादीत स्थान दिले आहे.       

5. तर या यादीत 61 देशांच्या               कंपन्यांना स्थान देण्यात आले आहे.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. 15 जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय हवा दिन आहे.

2. वैद्यकीय इतिहासात प्रथमच डॉ. जॉं बाप्तिस्ते डेनिस यांनी 15 जून 1667 मध्ये यशस्वी रक्तसंक्रमण केले.

3. 15 जून 1869 मध्ये महाराष्ट्रातील पहिला विधवा विवाह साजरा झाला.

4. लोकपाल बिलासाठी आग्रह धरणारे ‘समाजसेवक अण्णा हजारे‘ यांचा जन्म 15 जून 1937 रोजी झाला.

5. बा.पां. आपटे हे 15 जून 1970 रो जी पुणे      विद्यापीठाचे आठवे कुलगुरू झाले.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. इंग्लंडमधील डिजिटल तंत्रज्ञानविषयक उद्योजकांच्या समूहाने दिलेल्या माहितीनुसार, तेथील तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जास्तीत जास्त व्हिसा अर्ज करणाऱ्यांत भारतासह अमेरिकेचा वरचा क्रमांक लागतो.

2. ब्रिटनच्या गृहविभागाची मान्यता असलेल्या ‘टेक नेशन’ या संस्थेतर्फे तेथील तंत्रज्ञान क्षेत्रातील व्हिसा दिला जातो.

3. डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रासाठीच्या टेक नेशन प्रथम स्तरीय असाधारण प्रज्ञा व्हिसा वर्गवारीत २०१८-१९ मध्ये ४५ टक्के वाढ झाली आहे.

4.याआधीच्या वर्षांत या वर्गवारीसाठी ४५० अर्ज आले होते. ही संख्या आता ६५० वर गेली आहे. भारतातून व्हिसासाठी येणारे अर्ज हे विविध क्षेत्रांसाठी असतात, असे ‘टेक नेशन’ने निदर्शनास आणले आहे.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. मेट्रो रेल्वेच्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. देशातील सर्वच मेट्रोंमध्ये प्रवास करता येण्यासारखे ‘वन मेट्रो वन कार्ड’ केंद्र सरकार सुरू करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, मेट्रोच्या ठराविकच फेऱ्यांसाठी या कार्डाचा उपयोग करता येणार आहे. 

2. केंद्र सरकारने ‘वन नेशन वन कार्ड’ योजना लाँच केली होती. या कार्डच्या माध्यमातून कोणत्याही राज्यांमध्ये परिवहन सुविधेचा लाभ घेता येणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी ‘केवायसी’ प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य असेल. हे मेट्रो कार्ड क्रेडिट आणि डेबिट कार्ड प्रमाणेच असेल


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. अ‍ॅमेझॉन इंडियाने विद्यार्थी, गृहिणी आणि निवृत्त व्यावसायिकांना अर्ध-वेळ रोजगार देण्याचा निर्णय घेतला आहे.

2. अ‍ॅमेझॉनच्या या निर्णयामुळे  शिखर हंगामात (पीक सिझन) वितरण गतिमान राहण्यास मदत होईल आणि उबेरप्रमाणे लवचिक रोजगारांची निर्मितीही करता येईल.

3. गतिमान आणि विश्वसनीय वितरण हा ई-कॉमर्स व्यवसायाचा आत्मा आहे. . अ‍ॅमेझॉनच्या ‘प्राईम आॅफर्स’मध्ये दुसऱ्या दिवशी वस्तू ग्राहकाच्या घरी पोहोचते. ठराविक वस्तूंवर ही योजना लागू आहे. ‘प्राईम नाऊ’मध्ये दोन तासांत पोहोच दिली जाते. किराणा सामान पोहोचविण्यासाठी प्राईम नाऊचा प्रामुख्याने वापर होतो. 


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. बहुतांश वेळेस ‘एटीएम’मध्ये कॅश नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाल्याचं पाहायला मिळतं. पण आता जर 3 तासाहून अधिक काळ एखाद्या एटीएममध्ये कॅश नसेल तर संबंधित बँकांना दंड ठोठाविण्याच्या तयारीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आहे.

2.छोटी शहरे आणि ग्रामीण भागांतील एटीएमम          ध्ये कित्येक दिवस पैसेच उपलब्ध नसतात. विनाकारण नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागतो. तरीही अनेकदा बँका याकडे दुर्लक्ष करतात. पण आता याविरोधात कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आरबीआय आहे. यानुसार कोणतंही एटीएम तीन तासांपेक्षा अधिक काळ कॅशलेस नसावं, जर कॅश संपली असेल तर तीन तासांच्या आत संबंधित बँकेनी त्या एटीएममध्ये पैशांचा भरणा करावा अन्यथा बँकेवर दंडात्मक कारवाई केली जाईल.          

3. एखाद्या एटीएममध्ये कॅश आहे किंवा नाही याची माहिती बँकांना मिळत असते. किती रक्कम शिल्लक आहे आणि किती वेळात पैसे संपतील म्हणजेच कधीपर्यंत पैशांचा भरणा करावा याबाबत माहिती देखील संबंधित बँकांना मिळत असते. एटीएममध्ये लावलेल्या सेंसरद्वारे बँकेला रियल टाईमवर किती रक्कम उपलब्ध आहे याची माहिती मिळते.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. आर्टिफिशिअल इंटेलिजंसमध्ये जगातील सर्वात शक्तीशाली सुपरकॉम्प्युटर डीजीएक्स-2 भारतात आला आहे. या कॉम्प्युटरला जोधपूर आयआयटीमध्ये ठेवण्यात आले आहे. या कॉम्प्युटरमुळे देशातील विद्यार्थ्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे प्रशिक्षण देण्यास गती मिळणार आहे.

2. आयआयटी जोधपूरचे कॉम्प्युटर सायन्स विभागाचे अध्यक्ष डॉ. गौरव हरित यांनी सांगितले की, हा जगातील सर्वात वेगवान आर्टिफिशिअल इंटेलिजंस अॅप्लिकेशन्स कॉम्प्युटर असून भारतात पहिल्यांदाच आला आहे. हा कॉम्प्युटर विशेष प्रयोगशाळेमध्ये       बसविण्यात आला आहे.

3. तसेच या कॉम्प्युटरची किंमतही खूप आहे. या कॉम्प्युटरसाठी तब्बल 2.5 कोटी रुपये मोजण्यात आले आहेत. यामध्ये 16 खास जीपीयू लावण्यात आले आहेत. या प्रत्येक कार्डची क्षमता  32 जीबी  एवढी आहे. तर रॅम 512 जीबीची देण्यात
आली आहे. साधारण कॉम्प्युटरची क्षमता केवळ 150 ते 200 वॅट असते. मात्र, या सुपरकॉम्प्युटरची क्षमता 10 किलोवॅट आहे.

4. प्रत्येक कॉम्प्युटर प्रोग्रॅम डेटा विश्लेषण आधारावर असते. आणि हे विश्लेषण सुपरकॉम्प्युटर वेगात करणार आहे.

5. यामध्ये लावलेल्या 32 जीबीची 16 जीपीयू कार्ड या कॉम्प्युटरला खास बनवितात. यामुळे कामाचा वेग वाढला आहे.

6. देशात सध्या आयआयएससी बंगळुरुसह काही संस्थांमध्ये डीजीएक्स-1 सुपरकॉम्प्युटर आहेत. मात्र, डीजीएक्स-2 सुपरकॉम्प्युटर पहिल्यांदाच देशात आला आहे. डीजीएक्स-1 पेक्षा हा कॉम्प्युटर दुप्पट क्षमतेने जास्त आहे.

7. डीजीएक्स-1 ला एखादे काम करण्यासाठी 15 दिवस लागत असतील तर डीजीएक्स-2 ला दीड दिवस लागतात. या कॉम्प्युटरचे वजन तब्बल 150 किलो आहे तर साठवण क्षमता 30 टीबी आहे.           

8. डीजीएक्स-2 हा सुपर कॉम्प्युटर अमेरिकेच्या एनव्हिडीया या कंपनीने बनविला आहे. आयआयटी जोधपूर आणि या कंपनीमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजंस क्षेत्रासाठी दोन वर्षांचा करार झाला आहे. या करारानुसारच कॉम्प्युटर भारतात
आणण्यात आला आहे.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. सौंदर्यस्पर्धेतील महत्त्वाचा मानला जाणारा ‘फेमिना मिस इंडिया २०१९’चा किताब राजस्थानच्या सुमन रावने पटकावला आहे. मुंबईतील सरदार वल्लभभाई पटेल इनडोअर स्टेडियममध्ये शनिवारी हा सोहळा पार पडला.

2. या स्पर्धेत उत्तर प्रदेशची शिनता चौहान पहिली रनरअप ठरली तर तेलंगणाची संजना विज दुसरी रनरअप ठरली आहे.

3.गतवर्षी मिस इंडियाचा किताब जिंकलेल्या अनुकृती वासने सुमनला ‘मिस इंडिया २०१९’चा ताज घातला.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात वन-डे क्रिकेटमध्ये ११ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.

2.हा पल्ला गाठण्यासाठी विराटला या सामन्याआधी ५७ धावांची गरज होती. या खेळीदरम्यान विराट कोहलीने भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आहे.

3. सर्वात कमी डावांमध्ये ११ हजार धावा करण्याचा विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर जमा झाला आहे. विराटने २२२ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे.

4.११ वर्षांहून कमी कालावधीत हा पल्ला गाठणारा कोहली हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. वन डे क्रिकेटमध्ये ११००० धावा करणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांनी हा पल्ला पार केला आहे.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. 1885 मध्ये  न्यू यॉर्क बंदरमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी चे आगमन झाले.

2. आइसलँडने (डेन्मार्कपासून) 1944 मध्ये स्वातंत्र्य  घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.

3. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक      शाळांतून बायबलचे पठण करणे 1963 मध्ये कायदेबाह्य ठरवले.

4. 1967 मध्ये चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.     

5. 1991 मध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर.

6. 1297 मध्ये ज्येष्ठ गुरु संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांनी त्र्यंबकेश्वर येथे देह ठेवला. 

7. राजमाता जिजाबाई यांचे निधन 1674 मध्ये झा     ले.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. भारतीय जनता पार्टीचे राजस्थानमधील कोटा येथील खासदार ओम बिर्ला हे लोकसभेच्या अध्यक्ष पदासाठी एनडीएचे उमेदवार राहणार असल्याची माहिती एएनआयने दिली आहे.

2. तसेच लोकसभा अध्यक्ष पदाच्या शर्यतीत माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी, राधामोहन सिंह. रमापती राम त्रिपाठी, एसएस अहलुवालिया आणि डॉ. विरेंद्र कुमार यांच्यासारखे अनेक दिग्गज नेते होते.

3. मात्र आज लोकसभा अध्यक्ष पदासाठी ओम बिर्ला हे उमेदवारी दाखल करणार आहेत. ज्यानंतर बुधवारी संसदेत यासाठी मतदान होईल. लोकसभेत एनडीए आघाडीचे बहुमत असल्याने ओम बिर्ला हेच लोकसभा अध्यक्ष होणार हे निश्चित आहे.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. जगातील एकूण अण्वस्त्रांची संख्या गतवर्षांत कमी झाली आहे. असे असले तरी विविध देश त्यांच्या अण्वस्त्र साठय़ात आधुनिकता आणत आहेत असे एका अहवालात म्हटले आहे.

2. तर स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रीसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेने म्हटले आहे की, अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत व पाकिस्तान, इस्रायल, उत्तर कोरिया या देशांकडे एकूण 13,865 अण्वस्त्रे आहेत. याचा अर्थ अण्वस्त्र संख्या
2018 च्या तुलनेत सहाशेने कमी झाली आहे.

3. अण्वस्त्र संख्या कमी झाली असली तरी चीन, भारत, पाकिस्तान हे देश त्यांची अण्वस्त्रे आधुनिक करीत आहेत. या संस्थेच्या अण्वस्त्र नियंत्रण कार्यक्रमाचे संचालक श्नन किली यांनी सांगितले की, जगात अण्वस्त्रे कमी होत असली तरी
त्यांचे स्वरूप बदलत आहे.

4. अमेरिका व रशिया यांच्याकडे जगातील नव्वद टक्के अण्वस्त्रे आहेत. त्यांनी अण्वस्त्रांची संख्या कमी केली आहे. नवीन स्टार्ट करारावर 2010 मध्ये अमेरिका व रशिया यांनी स्वाक्षऱ्या केल्या असून त्यात सज्ज अण्वस्त्रांची संख्या कमी
ठेवण्याचे बंधन आहे.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. जगातील एकूण अण्वस्त्रांची संख्या गतवर्षांत कमी झाली आहे. असे असले तरी विविध देश त्यांच्या अण्वस्त्र साठय़ात आधुनिकता आणत आहेत असे एका अहवालात म्हटले आहे.

2. तर स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रीसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेने म्हटले आहे की, अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत व पाकिस्तान, इस्रायल, उत्तर कोरिया या देशांकडे एकूण 13,865 अण्वस्त्रे आहेत. याचा अर्थ अण्वस्त्र संख्या
2018 च्या तुलनेत सहाशेने कमी झाली आहे.

3. अण्वस्त्र संख्या कमी झाली असली तरी चीन, भारत, पाकिस्तान हे देश त्यांची अण्वस्त्रे आधुनिक करीत आहेत. या संस्थेच्या अण्वस्त्र नियंत्रण कार्यक्रमाचे संचालक श्नन किली यांनी सांगितले की, जगात अण्वस्त्रे कमी होत असली तरी
त्यांचे स्वरूप बदलत आहे.

4. अमेरिका व रशिया यांच्याकडे जगातील नव्वद टक्के अण्वस्त्रे आहेत. त्यांनी अण्वस्त्रांची संख्या कमी केली आहे. नवीन स्टार्ट करारावर 2010 मध्ये अमेरिका व रशिया यांनी स्वाक्षऱ्या केल्या असून त्यात सज्ज अण्वस्त्रांची संख्या कमी
ठेवण्याचे बंधन आहे.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. भाजपातील ज्येष्ठ नेते जे.पी. नड्डा यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

2. तर झालेल्या भाजपाच्या संसदीय बैठकीत जे पी नड्डा यांच्याकडे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. अमित शाह यांनी केंद्रीय गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्षाध्यक्षपद सोडणार अशी चर्चा होती.

3. मात्र, त्यांना अध्यक्षपदी कायम ठेवून पक्षात कार्यकारी अध्यक्ष या पदाची निर्मिती करण्यात आली. 

 


current affairs, loksatta chalu ghadamodi

1.स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांचा जन्म 18 जून 1899 मध्ये झाला.

2.पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांचा जन्म 18 जून 1911 रोजी झाला.

3.सन 1908 मध्ये 18 जून रोजी फिलीपाइन्स विश्वविद्यालाची (University of the Philippines) ची स्थापना झाली.

4. डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून 18 जून 1946 रोजी गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले.

5. जनावरांमधे आढळणार्‍या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस 18 जून 1981 मध्ये विकसित केली गेली.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. यश बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष, यशोवर्धन बिर्ला ज्याला यश बिर्ला म्हणून ओळखले जाते, त्याला 16 जून, 2019 रोजी कोलकाता स्थित यूको बँकेने जाणूनबुजून पैसे न भरल्याबद्दल डिफॉल्टर घोषित केले आहे.

2. यूको बँकेने दावा केला आहे की यशवर्धनच्या ग्रुप कंपन्यांमध्ये बिर्ला सूर्या या कंपनीने 67.65 कोटी रुपयांचे कर्ज फेडले नाही. यूको बँकेच्या मीडियाच्या निवेदनानुसार, यश बिर्लाला कर्जाची परतफेड करण्यासंबंधी अनेक सूचना पाठविल्या गेल्या. त्यांच्या कंपनीला मल्टी-क्रिस्टलाइन सोलर फोटोव्होल्टेक पेशी तयार करण्यासाठी रु. 1 अब्ज चे कर्ज देण्यात आले होते.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. गुंतवणूकदारांसाठी सध्याच्या कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. सध्याच्या कामगारविषयक 44 कायद्यांचे चार गटांत वर्गीकरण आणि सुसूत्रीकरण केले जाणार आहे. वेतन, सामाजिक सुरक्षा, औद्योगिक सुरक्षा आणि ओद्योगिक संबंध अशा चार गटांत या कायद्यांचा समन्वय साधला जाणार आहे. 

2कामगारांच्या प्रॉव्हिडंड फंडशी संबंधित कायदे, कामगार राज्य विमाविषयक कायदे, प्रसूतीविषयक सवलती आणि भरपाईविषयक कायदे यांचे एकाच सामाजिक सुरक्षा कायद्यात सुसूत्रीकरण होणार आहे.

3.औद्योगिक सुरक्षाविषयक सध्या अस्तित्वात असलेल्या खाण कामगार कायदा, गोदी कामगार कायदा आदी कायद्यांचे विलीनीकरण होण्याची शक्यता आहे. किमान वेतन कायदा, बोनस कायदा, प्रोत्साहन आणि अन्य भत्ते या कायद्यांचेही सुसूत्रीकरण होण्याची शक्यता आहे. औद्योगिक तंटा कायदा 1947, कामगार संघटना कायदा 1926, औद्योगिक कामगार कायदा 1946 यांचेही सुसूत्रीकरण अपेक्षित आहे


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. पुढील पाच वर्षे केंद्र सरकारच्या वतीने अल्पसंख्य समाजातील पाच कोटी विद्यार्थी-विद्यार्थिनींना तीन प्रकारच्या शिष्यवृत्त्या दिल्या जाणार आहेत. या शिष्यवृत्त्यांमध्ये पन्नास टक्के विद्यार्थिनींना सामावून घेतले जाणार आहे.

2. मदरशामध्येही आधुनिक शिक्षण देण्यासाठी जुलै महिन्यापासून नवा कार्यक्रमही हाती घेण्यात येणार असल्याची माहिती अल्पसंख्य कार्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली. दहावीपर्यंत (प्री मॅट्रिक), दहावीनंतर (पोस्ट मॅट्रिक) आणि व्यावसायिक-तांत्रिक शिक्षणासाठी (मेरिट कम मिन्स) अशा तीन शिष्यवृत्त्यांचा लाभ अल्पसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनींना मिळणार आहे.

 


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. जगातील सर्वात जास्त वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरांची यादी नुकतीच एका कंपनीने जाहीर केली. या यादीमधील पहिले नाव मुंबई शहराचे आहे. अॅपल आणि उबर या कंपन्यांना लोकेशन्स पुरवण्याचे काम करणाऱ्या टॉमटॉम या कंपनीने जगभरातील 56 मोठ्या देशांचा अभ्यास करुन एक अहवाल सादर केला आहे.

2. मुंबई खालोखाल या यादीमध्ये भारतातील दुसरे शहर आहे ते म्हणजे राजधानी दिल्ली. सर्वाधिक वाहतूक कोंडीच्या जागतिक यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या दिल्लीमध्ये एका जागेवरुन दुसऱ्या जागी प्रवास करण्यासाठी नियोजित वेळेपेक्षा 58 टक्के अधिक वेळ लागतो.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. 1862 :-अमेरिकेने गुलामगिरीची प्रथा बेकायदा जाहीर केली .
2. 1961 :-कुवेतला इंग्लंड कडून स्वातंत्र्य मिळाले .
3. 1966 :-शिवसेनेची स्थापना 
4. 1981 :- भारताच्या अँपल उपग्रहाचे प्रक्षेपण 
5. 1941 :- फ्रेंच गणित तज्ज्ञ ब्लेस पास्कल यांचा जन्म 
6. 1947 :- ब्रिटिश लेखक सलमान रश्दी यांचा जन्म 
7. 1956 :- अमेरिकन उद्योगपती आय बी एम चे अध्यक्ष थॉमस वॉटसन यांचे निधन 


current affairs, loksatta chalu ghadamodi

1.वित्त आणि कॉर्पोरेट अफेयर्सचे केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन नवी दिल्ली येथे झालेल्या आर्थिक स्थिरता आणि विकास परिषदेच्या (एफएसडीसी) 20 व्या बैठकीचे अध्यक्ष होते.

2.आर्थिक स्थिरता आणि विकास परिषद (एफएसडीसी) हा भारत सरकारद्वारा गठित एक उच्चस्तरीय संस्था आहे.
3. ही सुपर रेग्युलेटरी संस्था प्रथम 2008 मध्ये रघुराम राजन कमिटीने मांडली होती.
भारताचे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी संपूर्ण आर्थिक क्षेत्रातील आर्थिक नियमिततेने हाताळणारी स्वायत्त संस्था स्थापन केली.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पे यांनी श्रीलंकेला अपरिहार्य कारणास्तव रद्द केले आहे. त्याच्या भेटीमध्ये त्याने इस्टर रविवारी आत्मघाती बॉम्बस्फोटात हल्ला करणार्या ख्रिश्चनांसोबत एकता दाखवण्याची योजना केली होती.
2. एक इव्हँजेलिकल ख्रिश्चन, पोम्पेओ यांनी बर्याचदा जगभरातील धार्मिक स्वातंत्र्याबद्दल बोलले आहे. इस्टर रविवारी चर्च आणि लक्झरी हॉटेलवरील श्रीलंकामध्ये समन्वयित हल्ले 45 परदेशी नागरिकांसह 258 लोक ठार झाले. श्रीलंकेच्या सरकारने म्हटले आहे की, हल्लेखोर स्थानिक
इस्लामवादी अतिरेकी गट, नॅशनल थॉवीथ जमैथ यांनी केले होते, नंतर व्हिडीओ नंतर इस्लामिक राज्य गटाला निष्ठा देणारी बमबारी दर्शविली.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1.भारत-बांगलादेश सहयोग दूरदर्शन फ्री डिशच्या मालकीची एक चॅनेल आपल्या देशात दूरदर्शनच्या दर्शकांसाठी उपलब्ध असेल.डीडी इंडिया बांगलादेशमध्ये त्या देशातल्या लोकांना पाहण्याकरिता उपलब्ध करुन देण्यात येईल.
2.
प्रसार भारती आणि बांगलादेश टीव्ही (बीटीव्ही) यांच्यात स्वाक्षरी केलेल्या एमओयूचा परिणाम म्हणून ही व्यवस्था आहे.


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. दरवर्षी 20 जून रोजी जागतिक शरणार्थी दिवस साजरा केला जातो. संपूर्ण दिवस शरणधारकांच्या परिस्थितीबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी समर्पित आहे.
2. 2019 वर्ल्ड रिफ्यूजी डे साठी
थीम # स्टिपविथ्रिफ्यूजीज - जागतिक शरणार्थी दिवसावर एक पाऊल घ्या अशी आहे 
3.शरणार्थी ही अशी व्यक्ती आहे जिने युद्ध, छळ किंवा नैसर्गिक आपत्तीतून सुटण्यासाठी आपल्या देशाला सोडले आहे.
4.
संयुक्त राष्ट्र महासभेने ठरविले की 2000 पासून 20 जून जागतिक शरणार्थी दिवस म्हणून साजरा केला जाईल. जनरल असेंब्लीने 2001 मध्ये शरणधारकांच्या स्थितीशी संबंधित 1 9 51 मधील 50 व्या वर्धापन दिनानिमित्त लक्ष वेधले.
 


current affairs, loksatta chalu ghadamodi

1. 2030 पर्यंत पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्रमुख धोरण म्हणून आयर्लंडने नवीन पेट्रोल आणि डिझेल वाहनांची विक्री करण्यास बंदी करण्याचा निर्णय घेतला.
2.
'क्लाइमेट ऍक्शन प्लॅन' मध्ये प्रकाशित आयरिश सरकारच्या 180 उपायांपैकी हे एक आहे.
चार्जिंग स्टेशनच्या नेटवर्कद्वारे समर्थित आयरिश रस्तेवर 9 50,000 इलेक्ट्रिक वाहने आहेत.
या प्लॅनमध्ये नॉन-रीसायकलेबल प्लास्टिक काढून टाकणे आणि प्लास्टिकच्या वस्तूंसाठी उच्च शुल्क समाविष्ट करणे देखील समाविष्ट आहे जे रीसायकल करणे कठीण आहे.
3. यासाठी, सरकारने देशभरात चार्जिंग नेटवर्कमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.

2050 पर्यंत शुद्ध शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्यासाठी लो-कार्बनमध्ये संक्रमण करणे त्यांचे मुख्य उद्दीष्ट आहे.
4.
नवीन जीवाश्म ईंधन कार विक्रीवर बंदी, ते 2045 पर्यंत अशा वाहनांना राष्ट्रीय कार चाचणी (एनसीटी) प्रमाणपत्रे देणे थांबवतील.


current affairs, loksatta

1. देशाची राजधानी राजधानी सुरक्षित राहावी यासाठी आता भारत अमेरिकेकडून नॅशनल अडव्हान्स सरफेस टू एअर मिसाईल सिस्टम – II (NASAMS-II) खरेदी करण्याच्या तयारीत आहे.

2. भारत याचा उपयोग स्वदेशी, रशियन आणि इस्त्रायली तंत्रज्ञान प्रणाली एकत्रित करून हवाई ढाल बनवण्यासाठी करणार आहे.

3. दरम्यान, हे क्षेपणास्त्र खरेदी केल्यास दिल्लीवर कोणत्याही क्षेपणास्त्रांच्या हल्ल्याचा, तसेच ड्रोन आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांपासूनही संरक्षण मिळणार आहे.

4.संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिका NASAMS-II या क्षेपणास्त्राच्या विक्रीसाठी अंतिम मसुद्याचे स्वीकृती पत्र जुलै ते ऑगस्टदरम्यान पाठवण्याची शक्यता आहे.

5. तसेच 6,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च असलेल्या परदेशी सैन्य विक्री कार्यक्रमाअंतर्गत अमेरिका भारताला या क्षेपणास्राची विक्री करणार आहे. तसेच दिल्लीच्या जवळ या क्षेपणास्त्राच्या बॅटरीच्या उभारण्यासाठीही जागांची निवड
करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

6. सध्या अमेरिका भारतावर टर्मिनल हाय अल्टीट्यूड एरिया डिफेंस (THAAD) आणि पॅट्रियट अडव्हाँस्ड कॅपेबिलिटी (PAC-3) मिसाइल डिफेंस सिस्टमच्या खरेदीवर विचार करण्यासाठी दबाव टाकत आहे.दिलेल्या माहितीनुसार 5.43
अब्ज डॉलर्सच्या उन्नक एस – 400 टायम्फ या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या पाच स्क्वाड्रन्ससाठी रशियाशी यापूर्वीच व्यवहार करण्यात आला आहे.

7. तसेच यापूर्वी ऑक्टोबर 2018 मध्ये भारताने रशियाबरोबर एस – 400 चा व्यवहार केला होता. अमेरिका भारतावर प्रतिबंध घालण्याची भीती असतानाही भारताने हा करार केला होता. मेरिकेच्या THAAD ची रशियाच्या एस – 400
शी तुलना करणे योग्य नसल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

8.NASAMS हे क्षेपणास्त्र प्रामुख्याने दिल्लीच्या सुरक्षेसाठी खरेदी करण्यात येणार आहे. तर भारत खरेदी करणार असलेले एस – 400 हे क्षेपणास्त्र ऑक्टोबर 2020 ते एप्रिल 2023 या कालावधीदरम्यान भारताला मिळेल.

9. एस – 400 सिस्टम 380 किमीपर्यंत असेलेला बॉम्ब, जेट, टेहळणी विमान, क्षेपणास्त्र आणि ड्रोनची माहिती घेण्यास आणि त्यांना नष्ट करण्यास सक्षम आहे.

10. NASAMS च्या माध्यमातून दिल्लीची सुरक्षा केली जाणार आहे. या क्षेपणास्त्रावर जमिनीवरून हवेत मारा करणारे स्टिंगर क्षेपणास्त्र, बंदूक प्रणाली AIM-120C-7 AMRAAMs (मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र) वापरण्यात येणार
आहे. थ्री डायमेंशनल सेंटीनल रडाल प्रणालीवर हे आधारित असेल. दरम्यान, या क्षेपणास्त्राची बाहेरील लेअर डीआरडीओद्वारे विकसित करण्यात येणाऱ्या स्वदेशी बीएमडी प्रमालीद्वारे तयार करण्यात येणार आहे. या प्रणालीतील उन्नतहवाई संरक्षण (AAD) आणि पृथ्वी वायू संरक्षण (PAD) इंटरसेप्ट क्षेपणास्त्र भविष्यात शत्रूच्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यांना रोखण्यासाठी तयार करण्यात आले आहे. याद्वारे 15 ते 20 किमीपासून 80 ते 100 किमीपर्यंतच्या उंचीवरून 2000 किमीपर्यंतचे लक्ष्य भेदता येणे शक्य आहे.

11. तर दुसरीकडे एस 400 सिस्टमच्या माध्यमातूनही संरक्षण केले जाणार आहे. यामध्ये 120, 200, 250 आणि 380 किमीपर्यंत लक्ष्य भेदणारी क्षेपणास्त्रे असतील. यामध्ये रडार, लॉन्चर्ससारख्या अत्याधुनिक सुविधाही देण्यात येणार आहेत.

12. त्यानंतर इस्त्रायल आणि भारताने संयुक्तरित्या विकसित केलेल्या मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र प्रणाली बराक – 8 ला सेवेत सामावून घेतले जाणार आहे.