DERC rules for resolving the grievances of customers and for Lokpal

 1. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी दिल्ली विद्युत नियमन आयोग (DERC) कडून “DERC (ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी असलेले मंच आणि लोकपाल) नियमन-2018” ही नियमावली तयार करण्यात आली आहे.
 2. DERC ने प्रत्येक विद्युत वितरण कंपनीच्या मंचच्या संरचनेसाठी ही नियमावली तयार केली आहे.
 3. प्रत्येक मंचामध्ये अध्यक्षला पकडून तीन सदस्यांचा समावेश असला पाहिजे आणि अध्यक्ष पदासाठी DERC कडून नामांकन दिले जाईल.
 4. शिवाय ‘विद्युत अधिनियम-2003’ व ‘DERC नियमन-2018’ यांच्या कार्यकक्षेत काम करण्यासाठी DERC एक लोकपाल (ombudsman) नियुक्त करणार आहे.
 5. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल.


 Indian scientists have developed the logic devices used in DNA based computing

 1. कोलकाता स्थित इंडियन असोसिएशन फॉर द सॉल्टिव्हिलेशन ऑफ सायन्स (IACS) येथील शास्त्रज्ञांना DNA आधारित एक लॉजिक डिव्हाईस तयार करण्यात यश आले आहे, ज्याचा DNA आधारित गणनेमध्ये उपयोग होऊ शकतो.
 2. एका छोट्या अणूचा वापर करून रियूजेबल YES आणि INHIBIT लॉजिक सिस्टम तयार करण्यात आले आहे.
 3. हा अणू फ्लोरोसेंट प्रोबप्रमाणे काम करतो आणि ह्यूमन टेलोमर्स व न्यूक्लिक अॅसिड क्लिविंग एंझाइम्स (न्यूक्लिसेस) यांच्यामध्ये आढळून येणार्‍या 4-स्ट्रेन्डेड DNA संरचना (जी-क्वाड्रुप्लेक्स) यांना जोडतो.
 4. कार्बाझोल लिगंड नावाचे फ्लोरोसेंट प्रोब मानवी जणूकामध्ये उपस्थित असलेल्या अन्य DNA संरचनेच्या व्यतिरिक्त एका निवडक पद्धतीने जी-क्वाड्रुप्लेक्सला जोडतो.
 5. एकदा का प्रोब DNA (जी-क्वाड्रुप्लेक्स) सोबत जोडले गेले, तर मग छोटा अणू DNA ला कमकुवत करणार्‍या काही एंझाइमंना (न्यूक्लिसेस S1 आणि एक्झोन्यूक्लिसेस) रोखतो.
 6. मात्र, तरीही काही अन्य एंजाइम (DNase I आणि T7 एंडोन्यूक्लिसेस I) त्याही अवस्थेत DNA वर हल्ला करतात.
या शोधाचे महत्त्व
 1. DNA-आधारित नॅनो तंत्रज्ञानावर आधारित नैदानिक संवेदक आणि अन्य जैव-आण्विक यंत्रे तयार करण्यासाठी हा शोध उपयोगी ठरू शकतो.
 2. यामुळे DNA कंप्युटेशन पद्धतीसाठी क्षमता तयार केली जाऊ शकते.
 3. सिलीकॉन व DNA-आधारित संगणकांमध्ये जाळे तयार करू शकता येणार आहे.


 Financial interdependence increased but there is still a difference: the Global Findx Database

 1. मोबाइल फोन आणि इंटरनेटमध्ये त्वरित विकासामुळे वित्तीय अंतर्भाव जागतिक पातळीवर सतत वाढत आहे, परंतु याचा लाभ जगात विविध देशांमध्ये अनियमित आहे.
 2. जगातल्या 144 अर्थव्यवस्थांमध्ये लोक वित्तीय सेवांचा कसा वापर करतात यावर तयार करण्यात आलेल्या जागतिक बँकेच्या ‘ग्लोबल फिंडेक्स’ नामक ताज्या अहवालात असे आढळून आले आहे की, स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांकडे अधिक खाते आहेत.
 3. जागतिक पातळीवर अजूनही 1.7 अब्ज प्रौढांकडे बॅंकेचे खाते नाहीत, तरीही त्यांच्यापैकी दोन तृतीयांशकडे मोबाइल फोन आहेत, ज्यामुळे त्यांना आर्थिक सेवा प्राप्त करण्यास मदत होऊ शकते.
 4. वित्तीय प्रणालीमध्ये लोकांना आणण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा सध्याच्या रोख व्यवहारांमध्ये लाभ घेता येऊ शकतो.
‘ग्लोबल फिंडेक्स’
 1. ठळक बाबी:-
 2. जागतिक पातळीवर 69% प्रौढांकडे (जवळपास 3.8 अब्ज) बँकेत किंवा मोबाइल मनी प्रदाताकडे एक खाते आहे, जो दारिद्र्यापासून बचाव होण्यास एक मदत म्हणून काम करीत आहे.
 3. हा आकडा 2014 सालच्या 62% आणि 2011 सालच्या 51% यांच्या तुलनेत  अधिक आहे. अहवालानुसार, सन 2014 ते सन 2017 पर्यंत 515 दशलक्ष प्रौढांनी प्रत्येकी एक खाते उघडलेत आणि सन 2011 पासून हा आकडा 1.2 अब्ज एवढा निर्दशनास आला.
 4. काही अर्थव्यवस्थांमध्ये खातेधारकांची संख्या वाढलेली आहे, मात्र अन्य ठिकाणी ही प्रगती अत्यंत मंद होती. या मागचे कारण म्हणजे स्त्री व पुरुषांमधील तसेच अमीर व गरीब यांच्यामध्ये आढळून येणारी असमानता.
 5. विकसनशील अर्थव्यवस्थानमध्ये स्त्री-पुरुषांमधील तफावत सन 2011 पासून 9% एवढी कायम आहे.
 6. आर्थिक व्यवहार करण्यासाठी मोबाईल फोन आणि इंटरनेटच्या वापरात लक्षणीय वाढ झाली आहे. सन 2014-2017 या कालावधीत खातेधारकांनी डिजिटल माध्यमातून देयके वितरीत करणे किंवा प्राप्त करणे याबाबतीत हे प्रमाण 67% वरून 76% पर्यंत वाढले आहे आणि विकसनशील देशांमध्ये हेच प्रमाण 57% वरून 70% पर्यंत इतके वाढले आहे.
 7. खाजगी क्षेत्रातील काम करणार्‍या 200 दशलक्षांपेक्षा जास्त बॅंक खाते नसलेल्या प्रौढ व्यक्तींना रोख वेतन दिले जाते.
 8. भारत - दक्षिण आशियात खातेधारक प्रौढांचा वाटा 23% ने वाढून तो 70% एवढा झाला आहे. भारत याबाबतीत अग्रेसर आहे. भारतात शासनांच्या बदलत्या वित्तीय धोरणांमुळे वित्तीय अंतर्भाव वाढून, स्त्रीवर्ग आणि गरीब प्रौढांना अधिकाधिक लाभासह, 80% पर्यंत खातेधारकांची संख्या वाढलेली दिसून आली आहे. तर अन्य भागांमध्ये प्रादेशिक पातळीवर खातेधारकांची संख्या केवळ 12% ने वाढली.


 English Language Day: April 23

 1. “मल्टीलिंगुएलीजम अँड द यूएन” या विषयाखाली 23 एप्रिल 2018 ला जगभरात ‘इंग्रजी भाषा दिन” आयोजित करण्यात आला आहे.
 2. संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात दरवर्षी 23 एप्रिलला ‘इंग्रजी भाषा दिन’ पाळला जातो.
 3. संयुक्त राष्ट्रसंघाची 6 भाषांना मान्यता आहे.
 4. या सहाही भाषांसाठी दरवर्षी एक दिन पाळला जातो.
 5. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सहा अधिकृत भाषा:-
  1. फ्रेंच (20 मार्च),
  2. चीनी (20 एप्रिल),
  3. इंग्रजी (23 एप्रिल),
  4. रशियन (6 जून),
  5. स्पॅनिश (23 एप्रिल),
  6. अरबी (18 डिसेंबर).
 6. 23 एप्रिल 1616 रोजी प्रसिद्ध विल्यम शेक्सपियर यांचा मृत्यू झाला.
 7. त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी 2010 साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सार्वजनिक माहिती विभागाने या दिनाची स्थापना केली.


Mario Abdo Benitez: The next President of Paraguay

 1. पुराणमतवादी मारिओ अब्दो बेनीटेझ यांनी पराग्वेमध्ये राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणूक जिंकली आणि ते पराग्वेचे पुढील राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत.
 2. 46 वर्षीय बेनीटेझ वर्तमान राष्ट्रपती होरोशीओ कार्टेस यांच्याकडून राष्ट्रपती पदाचा कार्यभार सांभाळतील.
 3. नवा राष्ट्रपती कार्यकाळ पुढील पाच वर्षांसाठी 15 ऑगस्ट 2018 पासून सुरू होणार आहे.
 4. पराग्वे हा दक्षिण अमेरिकेतला एक भूपरिवेष्टित देश आहे.
 5. असुशिओन ही देशाची राजधानी आहे. 
 6. आणि गुयारानी हे राष्ट्रीय चलन आहे.


Top

Whoops, looks like something went wrong.