
1742 26-Sep-2018, Wed
- भारतीय सैन्याने 2016 साली पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जीकल हल्ले करुन असाच पराक्रम गाजवला होता.
- या पराक्रमाचा गौरव करण्यासाठी आणि भारतीय सैनिकांच्या धैर्याला वंदन करण्यासाठी 28 ते 30 सप्टेंबर 2018 या काळात देशभर “पराक्रम पर्व” साजरे केले जाणार आहे.
- या निमित्त नवी दिल्लीतील राजपथावर मुख्य कार्यक्रम होईल.
- त्याशिवाय 51 शहरातल्या 53 ठिकाणी भारतीय सैन्याचे शौर्य दाखवणाऱ्या विविध घटना आणि कार्यक्रम केले जातील.
- 28 सप्टेंबरला संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते या पराक्रम पर्वाचे उद्घाटन होईल.
- यावेळी या विद्यार्थ्यांशीही संवाद साधतील. सैनिकांच्या शौर्य गाथा सांगणारे चित्रपट आणि फोटो यावेळी दाखवले जातील.
- विद्यार्थ्यांनी सैनिकांना लिहिलेल्या पत्रांचे प्रदर्शनही भरवले जाईल.
- जम्मू आणि काश्मीरमधून दहशतवाद्यांकडून हस्तगत केलेली शस्त्रे देखील यावेळी सर्वसामान्यांना बघता येतील.