Educator, Social reformer - Savitribai Phule On January 3, 168th birth anniversary of

 1. जन्म :- जानेवारी ३, इ.स. १८३१ , नायगाव, सातारा, महाराष्ट्र.
 2. मृत्यू :- मार्च १०, इ.स. १८९७, पुणे, सातारा, महाराष्ट्र.
 3. सावित्रीबाई फुले  या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. 
 4. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.
 5. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत.

 

जीवन 
 1. सावित्रीबाईंच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणार्‍या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. 
 2. इ.स. १८४० साली जोतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते. 
 3. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मुळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.
 4. सावित्रीबाईंचे पती जोतिराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. 
 5. सगुणाऊ एका इंग्रज अधिकार्‍याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. 
 6. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतिरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. 
 7. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्‍यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. 
 8. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.

 

 

शैक्षणिक कार्य व सामाजिक कार्य

 1. १ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. 
 2. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.
 3. १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडेवाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. 
 4. सा-या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले.
 5. १८४७-१८४८ साली केवळ चार वर्षांत 18 शाळा उघडल्या आणि चालवल्या.
 6. बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण  समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. 
 7. जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. 
 8. केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली.
 9. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली.
 10. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले.
 11. इ.स. १८९६-९७ सालांदरम्यान पुणे परिसरात प्लेगच्या  साथीने धुमाकूळ घातला.  हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा रोग संसर्गजन्य आहे हे कळल्यावर ब्रिटिश शासनाने जबरदस्तीने संभाव्य रुग्णांना वेगळे काढून स्थानांतरित करण्याचा खबरदारीचा उपाय योजला. यातून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीबाईंनी प्लेगपीडितांसाठी पुण्याजवळ वसलेल्या ससाणे यांच्या माळावर दवाखाना सुरू केला. त्या रोग्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना आधार देऊ लागल्या. प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. त्यातून १० मार्च, इ.स. १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
 12. सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते.
 13. पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले.
 14. सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो.


Vijay Keshav Gokhale new Foreign Secretary

 1. चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केलेले आणि महाराष्ट्राचे सुपुत्र विजय केशव गोखले हे आता देशाचे नवे परराष्ट्र सचिव असणार आहेत.
 2. २९ जानेवारीपासून स्वीकारणार पदभार स्वीकारणार आहेत..
तुम्हाला हे माहीत आहे का?
 1. सध्याचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांचा कार्यकाळ २८ जानेवारीला संपणार आहे.
 2. २९ जानेवारी २०१५ रोजी एस जयशंकर यांची परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
 3. त्यानंतर २०१७ मध्ये त्यांना एक वर्षाची बढतीही देण्यात आली होती.
 4. त्याचमुळे या पदावर विजय केशव गोखले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
 5. पुढील दोन वर्षांसाठी ते भारताचे परराष्ट्र सचिव असतील.
 6. भारतीय परराष्ट्र सेवेच्या (आयएफएस) १९८१च्या बॅचचे अधिकारी विजय केशव गोखले सध्या परराष्ट्र खात्यात सचिव (आर्थिक घडामोडी) पदावर कार्यरत आहेत.
 7. त्यांनी जर्मनीतही भारताचे राजदूत म्हणून काम केले आहे.
 8. तसेच हाँगकाँग, चीन आणि अमेरिका या देशांमध्येही त्यांनी काम केले आहे.
 9. भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये डोकलामचा सीमा प्रश्न निर्माण झाला होता. ५० दिवसांपेक्षा जास्त काळ सुरू असलेला हा वाद सोडवण्यात विजय केशव गोखले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
 10. विजय गोखले हे मूळचे पुण्याचे आहेत. 
 11. विजय गोखले यांच्या आधी १९७९ ते १९८२ या कालावधीत पुण्याचे राम साठे हे देशाचे परराष्ट्र सचिव होते.
 12. त्यांच्यानंतर एका मराठी माणसाला दुसऱ्यांदा परराष्ट्र सचिव होण्याचा मान मिळाला आहे.


NASA has set a new target for Surya

 1. अमेरिकेची अंतराळ संस्था NASA ने वर्ष 2018 मध्ये सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी आपले यान सूर्याच्या अगदी जवळ पाठविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी नव्या वर्षात अशी मोहीम राबविण्याची तयारी सुरू आहे.
 2. NASA आपली ‘पार्कर सोलर प्रोब’ मोहीम सूर्याच्या बाह्य वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी तयार करीत आहे आणि या वर्षी त्याचे प्रक्षेपण केले जाणार आहे.
तुम्हाला हे माहीत आहे का?
 1. पार्श्वभूमी:-
 2. ‘पार्कर सोलर प्रोब’ 
  1. ‘पार्कर सोलर प्रोब’ 7 वर्षांच्या कालखंडात सात वेळा सूर्याच्या कक्षेच्या जवळ जाऊन त्याची तपासणी करणार आहे. सूर्याच्या जवळ जाण्यासाठी शुक्र ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर केला जाणार आहे.
  2. यान सूर्याच्या वातावरण सीमेच्या 62 लक्ष किलोमीटर इतक्या जवळ जाणार आहे. अशी मोहीम पहिल्यांदाच चालवली जाणार आहे.
  3. अभ्यासादरम्यान, सूर्याच्या प्रखर उष्णता आणि सौर विकिरणांच्या धोकादायक भागामध्ये वैज्ञानिक शोध चालवले जाणार आहे.
  4. सूर्याच्या बाह्य आवरणात कोणत्या प्रकारची ऊर्जा आणि ताप प्रवाहीत होत आहे.
  5. तसेच सूर्यापासून बाहेर पडणारी हवा आणि ऊर्जा यांच्या कणांची गती कशी वाढते यासंबंधी समजून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
  6. खगोलशास्त्रज्ञ यूजीन पार्कर यांनी जवळजवळ 60 वर्षाआधी सौर पवन अस्तित्वात असल्याची भविष्यवाणी केली होती.
 3. इतर नियोजित मोहिमा
  1. मंगळ ग्रहावर मोहीम चालविण्यासाठी रोबोटिक ‘इनसाइट मार्स’ मोहीम राबवविणार आहे, ज्यामधून ग्रहाच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जाणार आहे.   
  2. पृथ्वीवर उपस्थित बर्फाची चादर, सागरी तळ आणि भू-जल पातळी यासंबंधी माहिती जमा करण्यासाठी ICESat-2 आणि GRACE नामक दोन नव्या पिढीचे उपग्रह पाठवविणार आहे.
  3. NASA चे या वर्षातले पहिले ‘OSIRIS-Rex’ नामक मोहीम ऑगस्ट 2018 मध्ये पृथ्वीच्या जवळ ‘बेन्नू’ नामक लघुग्रहावर पाठवणार आणि 2023 मध्ये अभ्यासासाठी नमूने घेऊन येणार आहे.
  4. जून 2018 च्या आधीच प्रक्षेपित केले जाणारे ‘ट्रांजीटिंग एक्सोप्लॅनेट  सर्व्हे सॅटेलाइट (TESS)’ हे 200,000 चमकदार, जवळच्या तार्‍यांवर लक्ष ठेवणार आणि आपल्या सूर्यमालेच्या बाहेरील ग्रहांचा शोध घेणार आहे.
 4. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA)
  1. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) ही संयुक्त राज्य अमेरिकेची (UAS) शाखा आहे, जी देशाच्या सार्वजनिक अंतराळ कार्यक्रमांचे आयोजन करण्यास आणि उड्डाणशास्त्र व हवाई-अंतराळ संशोधनासाठी जबाबदार आहे.
  2. NASA ची स्थापना 19 जुलै 1948 रोजी नॅशनल अॅडवायजरी कमिटी फॉर एरोनॉटिक्स (NCA) च्या जागी केली गेली होती.
  3. या संस्थेने 1 ऑक्टोबर 1948 पासून कार्य करण्यास सुरुवात केली. 


What is Bitcoin and Cryptococcus?

 1. आज अर्थजगतात ‘बिटकॉइन’ किंवा ‘क्रिप्टोकरंसी’ किंवा ‘डिजिटल करंसी’ या शब्दांचा उल्लेख होत असल्याचे दिसून येत आहे. 
 2. बिटकाइनचा विकास ‘सातोशी नकामोतो’ नामक एका अभियंताने केलेला आहे. याची सुरुवात 3 जानेवारी 2009 रोजी झाली. आज जगभरात 1 कोटीहून अधिक बिटकॉइन आहेत.
 3. प्रत्येक देशाचे एक चलन असते, ज्यामधून त्या देशामध्ये आणि विदेशी चलनाच्या स्वरुपात इतर देशांमध्ये व्यवहार आणि व्यापार चालू असतो.
 4. त्यासाठी त्या देशात एक केंद्रीय बँक असते, जी ते चलन नियंत्रित करते.
 5. बिटकॉइन हे कोणत्याही देशाचे चलन नाही. हे एक डिजिटल (आभासी) चलन म्हणजेच क्रिप्टोकरंसी आहे, त्यामुळे ते कोणत्याही बँकेत ठेवले जात नाही.
 6. अर्थजगतात बिटकॉइन सारखेच आणखी अनेक चलन आहेत. बिटकॉइन प्रमाणेच लाइट कॉयन, नेम कॉयन, रिपल, इथेरम, NEM, इथेरम क्लासिक, डेश, मोनेरो, जेड कॅश, पीपी कॉयन यासारख्या 1000 क्रिप्टोकरंसी अस्तित्वात आहेत.
हे तुम्हाला माहीत आहे का?
 1. पार्श्वभूमी:-
 2. क्रिप्टोकरंसीची प्रक्रिया:-
  1. क्रिप्टोकरंसीची खरेदी जो प्रथम करतो त्याला यामध्ये अधिक लाभ असतो. म्हणजेच गुंतवणूकदारांकडून गुंतवण्यात येणारी रक्कम उच्च लाभासकट वापस मिळविण्याचे स्वरूप दिले जाते आणि हा लाभ जुन्या गुंतवणूकदारांना नव्या गुंतवणूकदारांकडून केल्या जाणार्‍या पैश्यांमधून प्रदान केला जातो.
  2. अश्या परिस्थितीत पैश्याच्या आगमनावर त्याचे निर्गमन आणि त्याची किंमत अवलंबून असते.
  3. निर्गमन अधिक झाल्यास गुंतवणुकीची ही संपूर्ण व्यवस्था कोसळते.
 3. क्रिप्टोकरंसीचे लाभ:-
  1. क्रिप्टोकरंसीमध्ये ‘क्रिप्टोग्राफी’ तंत्राचा उपयोग करतात. याच्या माध्यमातून वस्तूंची खरेदी केली जाऊ शकते तसेच याची अधिक किंमतीत विक्री करून पैसेही प्राप्त केले जाऊ शकतात.
  2. याचा सर्वात मोठा फायदा हा असतो की कोणीही याची नक्कल करू शकत नाही.
  3. याला कोणतीही सरकार प्रस्तुत करीत नसल्याने याचे कोणतेही नियामक नाही.
  4. याला कोणत्याही देशात देयकाच्या पर्यायाखातर खर्च केले जाऊ शकते.
 4. क्रिप्टोकरंसीचे तोटे:-
  1. जर आपला संगणक हॅक केला गेला, पासवर्ड विसरल्यास किंवा संगणकीय मालवेयरचा हल्ला झाला, तर आपल्या खात्यातील बिटकॉइन प्रत प्राप्त केले जाऊ शकत नाहीत आणि याचे नियामक नसल्याने याबाबत आपण कोणाकडेही तक्रार करू शकत नाही.
  2. क्रिप्टोकरंसीच्या बाबतीत होणारे व्यवहार शोधले जाऊ शकत नाहीत.
  3. बिटकॉइनची कोणतीही 'वास्तविक किंमत' नाही. त्याची किंमत पुर्णपणे अंदाजावर आधारित असते.
  4. याला गुप्त ठेवले जात असल्यामुळे, त्याचा उपयोग घोटाळे, हेराफेरी, टॅक्सचोरी आणि काळापैसा याबाबतीतही होऊ शकतो, जो राष्ट्राहिताच्या विरोधात वापरला जाऊ शकतो.
  5. भारत सरकारने याला कोणताही अधिकृत दर्जा दिलेला नाही आणि याची तुळणा पोंजी स्कीम (बेइमान) सोबत केलेली आहे.


Value Added Tax (VAT) applicable to Gulf countries in Saudi Arabia and United Arab Emirates (UAE)

 1. सौदी अरब आणि संयुक्त अरब अमीरात (UAE) या आखाती देशांमध्ये प्रथमच मूल्यवर्धित कर (VAT / वॅट) लागू करण्यात आला आहे.
 2. देशाचा महसूल वाढविण्याच्या उद्देशाने बहुतेक वस्तूंवर आणि सेवांवर 5% कर आकारला आहे.
 3. खान-पान, वस्त्र, पेट्रोल, फोन, जल आणि वीज देयकांसोबतच हॉटेल बुकिंगवरही वॅट आकारला जात आहे.
 4. वैद्यकीय, वित्तीय आणि सार्वजनिक परिवहन सेवा मात्र करमुक्त आहेत.
तुम्हाला हे माहीत आहे का?
 1. पार्श्वभूमी:-
 2. मूल्यवर्धित कर (VAT) म्हणजे कोणतेही उत्पादन व सेवेच्या वर्धित मूल्यावर लावण्यात येणारा अप्रत्यक्ष कर आहे.
 3. VAT एक बहु-बिंदू गंतव्‍य आधारित कर आकारणी आहे, ज्यामध्ये उत्‍पादन/वितरण श्रृंखलेच्या व्यवहाराच्या प्रत्‍येक चरणात मूल्‍यवर्धनावर घेतला जाणारा कर आहे.
 4. ‘मूल्‍यवर्धन’ म्हणजेच वस्तू व सेवांच्या उत्‍पादन आणि वितरण श्रृंखलेत त्यांच्या किंमतीमध्ये वृद्धी होय.
 5. हा वस्तू वा सेवांच्या अंतिम विक्रीवर लादला जाणारा कर आहे आणि हा शेवटी ग्राहकाकडून वसूल केला जातो.


Nagaland declared as a "disturbed area" for six months

 1. संपूर्ण नागालँडला AFSPA अंतर्गत 1 जानेवारीपासून ते जून-2018 पर्यंत सहा महिन्यांसाठी “अशांत क्षेत्र” म्हणून घोषित करण्यात आले आहे.
 2. राज्य गृह आणि राजकीय विभागाने जारी केलेल्या सूचनेनुसार, सशस्त्र दल (विशेषाधिकार) अधिनियम-1958 अंतर्गत देण्यात आलेल्या शक्तीनुसार, राज्याचा कारभार पूर्वपदावर येईपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे.
 3. सशस्त्र दल (विशेषाधिकार) अधिनियम-1958 (AFSPA) हा भारतीय संसदेचा एक कायदा आहे, ज्यामधून "अशांत क्षेत्र" घोषित केल्यास भारतीय सशस्त्र दलाला विशेष अधिकार प्रदान केले जातात आहे.
 4. ‘अशांत क्षेत्र (विशेष न्यायालय) अधिनियम-1976’ नुसार एखाद्या क्षेत्राला “अशांत” घोषित केल्यास, त्या क्षेत्राला किमान तीन महिन्यांत परिस्थिती सांभाळता यायला हवी.
 5. हा कायदा लागू केल्यास, सशस्त्र दल कोणत्याही सूचनेशिवाय कोणालाही कधीही कैदेत टाकण्याचे अधिकार आणि कुठेही मोहीम चालविण्यास सक्षम असते.
 6. भारत छोडो आंदोलन दडपण्यासाठी इंग्रजांनी 15 ऑगस्ट 1942 रोजी सशस्त्र दल विशेषाधिकार अध्यादेश लागू केला होता.
 7. मुख्यमंत्री:-टी.आर. झेलियांग
 8. राज्यपाल:-पद्मनाभ बालकृष्ण आचार्य


Top

Whoops, looks like something went wrong.