
1773 05-Aug-2018, Sun
- भारताविरुद्ध एजबस्टन येथे होणारा पहिला कसोटी सामना यजमान इंग्लंडसाठी पुरुष विभागातील १०००वा कसोटी सामना असणार आहे.
- १००० कसोटी सामने खेळणारा इंग्लंड हा पहिलाच संघ ठरणार आहे. त्या खालोखाल ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलियाने ८१२ कसोटी सामने खेळले आहेत.
- इंग्लंडने मार्च १८७७मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर आजपर्यंत ते ९९९ कसोटी सामने खेळले आहेत.
- त्यापैकी ३५७ सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळविला आहे तर २९७ मध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. तसेच ३४५ सामने अनिर्णित राहिले आहेत.
- या ऐतिहासिक सामन्यासाठी आयसीसीच्या अव्वल श्रेणी पंच मंडळातील वरिष्ठ सदस्य व न्यूझीलंडचे माजी कर्णधार जेफ क्रो हे आयसीसीचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
- कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी त्यांच्या हस्ते इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष कॉलिन ग्रिव्ह्ज यांचा रौप्य सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला जाणार आहे.
- भारताविरुद्ध इंग्लंडने जून १९३२मध्ये पहिला कसोटी सामना खेळला. उभय संघांदरम्यान ११७ कसोटी सामने खेळले गेले असून, इंग्लंडने ४३ सामन्यांत तर भारताने २५ सामन्यांत विजय मिळवला आहे. उर्वरित सामने अनिर्णित राहिले आहेत.