Father Francis Dibrito Appointed As 93rd Sahitya Sammelan Chief

उस्मानाबाद येथील नियोजित ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली. निमंत्रक संस्था असल्याने मराठवाडा साहित्य परिषदेने एकाही साहित्यिकाचे नाव सुचवले नाही. साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीबाबत अखिल उस्मानाबाद येथे आज (रविवारी) पार पडलेल्या भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
 

महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ या घटक संस्थांसह संलग्नित संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. घटक संस्थांनी वेगवेगळ्या साहित्यिकांची नावे अध्यक्षपदासाठी सुचवण्यात आली होती. महाराष्ट्र साहित्य परिषदने साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे नाव सुचवले होते. या नावांवर चर्चा झाल्यानंतर दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली. साहित्य संमेलनाची निमंत्रक संस्था मराठवाडा साहित्य परिषदेची शाखा असल्यामुळे ‘मसाप’ने नाव सूचवण्यात आले नाही. इतर संस्थांनी सूचवलेल्या नावांवर चर्चा झाल्यानंतर दिब्रिटो यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले, असे साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. नियोजित साहित्य संमेलन जानेवारी महिन्यात होणार आहे.
 

 दिब्रिटो यांची कारकिर्द

फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.
‘सुवार्ता’ मासिकाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृतीपर लेखन केले आहे.
 

 ‘सुबोध बायबल – नवा करार’ या ग्रंथासाठी दिब्रिटो यांना साहित्य अकादमीचा उत्कृष्ट अनुवादासाठीचा पुरस्कार मिळाला आहे.

१५ व्या मराठी ख्रिती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.

 

‘संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची’, ‘आनंदाचे अंतरंग’, ‘तेजाची पाऊले’, ‘परिवर्तनासाठी धर्म’, ‘ओअॅसिसच्या शोधात’, ‘सृजनाचा मळा’, ‘नाही मी एकला’, ‘सृजनाचा मोहोर’, ‘गोतावळा’ आदी ग्रंथ प्रकाशित आहेत.

वसई येथे वास्तव्य असलेले फादर दिब्रिटो यांनी मराठी साहित्यात धर्म आणि वैचारिक लेखनाद्वारे मौलिक भर घातली आहे.


Gully Boy is India's official entry for the 2019 Oscars.

रणवीर सिंग अभिनीत 'गली बॉय' हा सिनेमा भारताकडून ९२व्या ऑस्कर पुरस्कारासाठी पाठविण्यात येणार आहे. 'बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म' या कॅटेगरीसाठी गली बॉयची भारताकडून निवड करण्यात आली आहे.

गली बॉय'सह 'उरी द सर्जिकल स्ट्राइक', 'केसरी', 'बधाई हो', 'आर्टिकल १५' आणि 'अंधाधून' आदी चित्रपट ऑस्करवारीच्या स्पर्धेत होते. मात्र या सर्व सिनेमावर गली बॉयने मात केली आहे. गेल्या वर्षी भारताने ऑस्करसाठी 'व्हिलेज रॉकस्टार'ची निवड केली होती.


'गली बॉय' या सिनेमात रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्टची प्रमुख भूमिका आहे. झोया अख्तरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या आधी मेलबर्नमध्ये पार पडलेल्या भारतीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये गली बॉयला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार देण्यात आला होता

त्याशिवाय दक्षिण कोरियातील २३ व्या बुकियॉन इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये नेटवर्क फॉर द प्रमोशन ऑफ एशियन सिनेमाचा पुरस्कारही गली बॉयला मिळाला होता. धारावीतील एका स्लम रॅपर्सच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. यापूर्वी झोया अख्तरने 'लक बाय चान्स', 'जिंदगी न मिलेगी दोबारा' आणि 'दिल धडकने दो' आदी सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.


Aditya - L1 First Indian mission to study the Sun

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) सन 2020 मध्ये सूर्य मोहीम अंतराळात प्रक्षेपित करणार आहे. या सूर्य मोहिमेचे नाव “आदित्य–एल1” (Aditya-L1) असे आहे.

मोहीमेची संकल्पना दृष्य उत्सर्जन रेखा कोरोनाग्राफ (Visible Emission Line Coronagraph -VLEC) नावाचे मुख्य भार वाहून नेण्याकरिता 400 किलोग्रॅम वर्गातल्या उपग्रहाच्या रूपात केली गेली आहे.

मोहिमेला L1 (लॅगरेंज बिंदू-1) याच्या आस-पास कोरोना (सुर्याचे प्रभामंडळ) कक्षेत पाठवले जाणार आहे, जे की पृथ्वीपासून 1.5 दशलक्ष किलोमीटर दूर आहे. कोरोना क्षेत्रात जे सूर्याच्या पृष्ठभागापासून अगदी जवळचे क्षेत्र असते.

 केला जाणारा अभ्यास -

सूर्याचा कोरोना त्याच्या पृष्ठभागापासून वर असूनही त्याचे तापमान (6000 केल्व्हिन) पृष्ठभागापेक्षा 300 पट अधिक का आहे याचा शोध घेणे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेत ISRO सुर्याच्या प्रभामंडळाची (कोरोना) रचना समजून घेणार आहे.

“आदित्य-एल 1” पृथ्वीपासून 1.5 दशलक्ष किलोमीटर अंतरावर ठेवली जाणार. तिथून सूर्यावर लक्ष ठेऊन, सूर्याचा बाहेरील 'तेजोमंडल'चे विश्लेषण केले जाणार. सूर्याच्या या बाहेरील आवरणाला तेजोमंडल म्हणतात. हे तेजोमंडल हजारो किलोमीटरपर्यंत पसरलेले आहे. पृथ्वीवरील हवामान बदलावर याचा मोठा प्रभाव पडतो.

सूर्याचा फोटोस्फीयर आणि क्रोमोस्फीयर यांचादेखील अभ्यास केला जाणार. सूर्यामधून बाहेर येणारे विस्फोटक कण देखील या मोहिमेत अभ्यासाचा विषय ठरणार आहेत. हे कण पृथ्वीच्या खालच्या कक्षेत निरुपयोगी ठरतात. त्यांना पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रापासून बाहेर ठेवण्याची गरज आहे.

या मोहिमेत पाठविण्यात येणारी उपकरणे

1) दृष्य उत्सर्जन रेखा कोरोनाग्राफ (VELC)
2) सोलर अल्ट्राव्हायलेट इमेजिंग टेलिस्कोप (SUIT) आणि एक्स-रे स्पेक्ट्रोमिटर - संपूर्ण तरंगलांबीमध्ये सूर्याच्या प्रतिमा घेणे.
3) आदित्य सोलर विंड पार्टीकल एक्सपेरिमेंट (ASPEX) - सौर पवन लक्षणामधील बदल तसेच त्याचे वितरण आणि स्पेक्ट्रल लक्षणांचा अभ्यास करणे.
४) प्लाजमा अॅनालिझर पॅकेज फॉर आदित्य (PAPA) - सौर पवनची संरचना आणि त्याचे ऊर्जा वितरण समजून घेणे.
५) मॅग्नोमीटर – आंतर-ग्रहीय चुंबकीय क्षेत्राचे परिमाण आणि प्रवृत्तीचे मापन करणे.


Top