
1025 17-Mar-2019, Sun
- क्रेडिट रेटिंगच्या गुणवत्तेशी संबंधित आव्हानांना संबोधित करण्यासाठी RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक स्थिरता व विकास परिषदेची (FSDC) उप-समिती तयार करण्यात आली आहे.
- सध्या भारतीय सिक्युरिटी व विनिमय मंडळ (SEBI) कडून क्रेडिट रेटिंग संस्था नियंत्रित केल्या जात आहेत.
- मात्र अर्थव्यवस्थेला कमकुवत करणार्या IL&FS डीफॉल्टर व्यक्तींच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पतधोरणात बदल करण्याकरिता त्यासंबंधी अभ्यास करण्याकरिता हा निर्णय घेतला गेला आहे.
- तसेच ही समिती गृहनिर्माण वित्त कंपन्या आणि गृहनिर्माण विकसक यांच्यातल्या दुव्यांच्या संदर्भात अभ्यास करीत आहे.
- त्याशिवाय विविध नियमन डेटाबेस आणि राष्ट्रीय वित्तीय समावेशन धोरण (NSFI) यांच्यातला परस्परसंबंध या विषयाचा देखील विचार करीत आहे.
- भारतीय सिक्युरिटी व विनिमय मंडळ (SEBI):-
- हे भारतामधील सिक्युरिटी (सुरक्षा बंध/कर्जरोखे/रोखे/किंवा अन्य उत्पादने) संदर्भात बाजारपेठेचे नियामक आहे.
- 1988 साली या संस्थेची स्थापना केली गेली आणि ‘SEBI अधिनियम-1992’ अन्वये दि. 30 जानेवारी 1992 रोजी याला वैधानिक दर्जा प्राप्त झाला.
- मुंबईत त्या मंडळाचे मुख्यालय आहे.