
759 14-Mar-2019, Thu
- मे महिन्यात खेळल्या जाणार्या बाराव्या ‘ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2019’ या स्पर्धेचे प्रायोजकत्व ‘गोडॅडी इंक’ या कंपनीला देण्यात आले आहे.
- त्यासंबंधीचा भागीदारी करार कंपनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) सोबत नुकताच केला.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC):-
- हे क्रिकेट खेळासाठीचे आंतरराष्ट्रीय व्यवस्थापक मंडळ आहे.
- सन 1990 मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या प्रतिनिधींनी ICC ची ‘इम्पेरियल क्रिकेट कॉन्फरन्स’ या नावाने स्थापना केली होती.
- सन 1989 मध्ये याला वर्तमान नाव प्राप्त झाले.
- ICC चे मुख्यालय संयुक्त अरब अमिरात (UAE) देशाच्या दुबई शहरात आहे.
- ICCचे 105 सदस्य संघ आहेत आणि त्यात 12 पूर्ण सदस्य आहेत, जे कसोटी सामने खेळतात.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) दर चार वर्षांनी एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे आयोजन करते.
- 1975 साली सर्वप्रथम एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाचे आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आले.