
3223 08-Jan-2018, Mon
- पृथ्वीपासून सुमारे 60 ते 1000 किलोमीटर इतक्या उंचीपर्यत वातावरणात आढळणारा आयनोस्फियर थर अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्याकरिता अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) ने GOLD आणि ICON नामक मोहिमा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमांमधून या थराची संपूर्ण आकृती तयार केली जाणार आहे.
- 'ग्लोबल-स्केल ऑब्जर्वेशन ऑफ द लिम्ब अँड डिस्क' (GOLD) याच महिन्यात तर 'आयनोस्फेयरिक कनेक्शन एक्सप्लोरर' (ICON) पुढच्या वर्षी अवकाशात सोडले जाणार आहे.
- ICON पृथ्वीपासून 560 किलोमीटरवरती तर GOLD भू-भौगोलिक कक्षेत (35000 किलोमीटर) परिभ्रमण करणार आहे.
- मोहिमांची उद्दिष्टे:-
- वातावरणाच्या वरच्या थरात हवामान संबंधित बदल पद्धतशीरपणे मोजणे हे या मोहिमांमधील एक सामायिक ध्येय आहे.
- यातून प्रथमच हे पहिल्या जाणार की, वरचे वातावरण चक्रीवादळे आणि भू-चुंबकीय वादळ अश्या भौगोलिक आपत्ती परिस्थितीत प्रतिसाद देत कश्याप्रकारे बदलते.
- ICON आणि GOLD मोहिमा अंतराळ यानासोबत एक छोटा प्रवास करणार आणि पृथ्वी आणि इतर ग्रहांभोवती असलेल्या अंतराळापासून ते सूर्यापासुन सतत वाहणार्या सौर-पवनच्या प्रवाहाची उच्चतम मर्यादा जाणून घेण्यापर्यंतची व्यापक आंतरजोडणी प्रणालीचा अभ्यास करणार आहे.
तुम्हाला हे माहीत आहे का? |
|