Hysis (PSLV-C43): ISRO's state-of-the-art Earth Observation Satellite

 1. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) दि. 29 नोव्हेंबर 2018 रोजी ‘PSLV-C43’ या प्रक्षेपकाद्वारे एकाचवेळी 31 उपग्रहांना अवकाशात यशस्वीपणे पाठवले आहे.
 2. आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन हे प्रक्षेपण केले गेले. हे PSLVचे 45वे उड्डाण होते.
 3. प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांमध्ये “हायसिस (हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग सॅटलाइट -HysIS)” हा भारताचा अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे.
 4. अन्य उपग्रहांमध्ये अमेरिकेचे 23 तर ऑस्ट्रेलिया, कॅनडा, कोलंबिया, फिनलंड, मलेशिया, नेदरलंड आणि स्पेन यांचा प्रत्येकी एक असे एकूण 30 उपग्रह आहेत. कोलंबियाने पहिल्यांदाच स्वतःच्या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी ISROची निवड केली आहे.
 5. भारताचा “हायसिस (हायपरस्पेक्ट्रल इमेजिंग सॅटलाइट -HysIS)” उपग्रह –
  1. 380 किलो वजनाच्या हायसिसच्या मदतीने पृथ्वीवरील जमीन, पाणी, वनस्पती आणि अन्य घटकांबाबत माहिती मिळवता येणार आहे.
  2. शिवाय प्रदूषणाची माहिती देखील हा उपग्रह पुरविणार आहे.
  3. हायसिसचे आयुष्य पाच वर्षांचे असणार आहे.
 6. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) –
 7. ही भारत सरकारची प्रमुख अंतराळ संस्था आहे.
  1. याचे बंगळुरू येथे मुख्यालय आहे.
  2. 1962 साली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या प्रयत्नांमुळे, 15 ऑगस्ट 1969 रोजी स्थापित ISRO ने 1962 साली स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रीसर्च (INCOSPAR) ला बदलले.
  3. ही संस्था विज्ञान विभागाकडून व्यवस्थापित केली जाते. 
  4. ISRO चा पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’ 19 एप्रिल 1975 रोजी सोव्हिएत संघाने प्रक्षेपित केला. 1980 साली, भारतीय बनावटीचे प्रक्षेपक SLV-2 द्वारे ‘रोहिणी’ हा उपग्रह पहिल्यांदा प्रक्षेपित करण्यात आला.
  5. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची ‘चंद्रयान-1’ मोही म यशस्वी झाली आणि चंद्रावर पोहचणारा भारत हा जगातला चौथा देश बनला.
  6. त्यानंतर ‘मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)’ ने 24 सप्टेंबर 2014 रोजी यशस्वीरित्या मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीपणे पोहोचणारा पहिला देश ठरला.


By 2050 the European Union aimed to become 'carbon emissionless'

 1. कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि 2050 सालापर्यंत संपूर्ण युरोपीय संघाला 'कार्बन उत्सर्जन विरहित' प्रदेश बनविण्यासाठी युरोपीय संघाने एक महत्वाकांक्षी योजना तयार केली आहे.
 2. EUने प्रदेशामधील सर्व सरकार, व्यवसाय, नागरिक आणि क्षेत्रांना या योजनेत सामील होण्याची विनंती केली आहे. माहितीनुसार, जर युरोपने आपले वर्तमान लक्ष्य राखले, तर ते 2015 पॅरिस कराराच्या अंतर्गत दिलेले वचन पूर्ण करू शकणार नाही.
 3. कारण ते 2050 सालाच्या अखेरीपर्यंत निव्वळ कार्बन उत्सर्जन केवळ 60% नी कमी करेल. त्यामुळे नव्या योजनेनुसार 2030 सालापूर्वी हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात 40% नी घट होण्याची अपेक्षा आहे, तसेच 2050 सालापर्यंत "हवामान तटस्थता (climate neutral) प्राप्त युरोप" बनण्याचे लक्ष्य ठेवले गेले आहे.
 4. युरोपीय संघ (EU) हा 28 सदस्य राज्यांचा राजकीय आणि आर्थिक संघ आहे, जे प्रामुख्याने युरोप खंडात आहेत.
 5. युरोपीय संघाची स्थापना 1 नोव्हेंबर 1993 रोजी झाली आणि याचे मुख्यालय बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स येथे आहे.
 6. 2015 पॅरिस हवामान करार –
  1. हा हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे, परिस्थितीशी जूळवून घेण्यासाठी आणि आर्थिक बाबी हाताळण्यासाठी युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज (UNFCCC) या संघटनेच्या कार्यचौकटीत तयार करण्यात आलेला आणि 2020 साली लागू होणारा एकमेव असा (पहिलाच) करार आहे.
  2. कराराला दि. 12 डिसेंबर 2015 रोजी पॅरिसमध्ये झालेल्या UNFCCC च्या 21 व्या पक्षीय परिषदेत 195 देशांमधील प्रतिनिधींद्वारा एकमताने अंगिकारले गेले.
  3. पूर्व-औद्योगिक पातळीच्यावर 2 अंश सेल्सियसच्या खाली जागतिक सरासरी तापमान वाढ नियंत्रित करणे आणि पूर्व-औद्योगिक पातळीच्या वर 1.5 °C पर्यंत तापमान वाढ मर्यादित करण्यासाठी प्रयत्न करणे तसेच अश्या अनेक कारकांच्या हेतूने हा करार आहे.


Top