ICC Cricket CEO

 1. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी म्हणून माध्यम व्यावसायिक मनू साहनी यांनी पदभार स्वीकारला. विद्यमान कार्यकारी डेव्ह रिचर्डसन हे त्यांच्यासमवेत जुलैतील विश्वचषकाच्या समारोपापर्यंत कार्यरत राहणार असून त्यानंतर ते निवृत्ती स्वीकारणार आहेत.

 2. ईएसपीएन स्टार स्पोर्ट्सचे माजी व्यवस्थापकीय संचालक म्हणून कामकाज केलेले साहनी हे या कालावधीच्या अंतिम सहा आठवडय़ांमध्ये रिचर्डसन यांच्यासमवेत कामकाज करून हस्तांतरणाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडण्याबाबत दक्षता घेणार आहेत.

 3. साहनी यांची नियुक्ती जानेवारी महिन्यातच करण्यात आली होती. मात्र त्याच वेळी रिचर्डसन जुलैपर्यंत कार्यरत राहणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले होते. आयसीसीच्या वतीने शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने साहनी यांची निवड केली होती.

 4.  


Bank of Baroda was the second largest public sector bank

 1. 1 एप्रिल 2019 पासून बँक ऑफ बडोदा, विजया बँक व देना बँक यांचे विलिनीकरण लागू झाले आहे. यामुळे भारतातील दुसर्‍या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक उदयास येणार आहे.

 2. तिन्ही बँकांच्या संचालक मंडळाने सप्टेंबर 2018च्या अखेरीस दिलेल्या तत्वत: मंजुरीपासून, विलिनीकरणाची पुढील प्रक्रिया विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात आली.

 3. भारतीय रिझर्व्ह बँकेने 30 मार्च 2019ला जारी केलेल्या परिपत्रकानुसार, विजया बँक व देना बँक यांच्या सर्व शाखा 1 एप्रिल 2019 पासून बँक ऑफ बडोदाच्या शाखा म्हणून काम करणार आहेत.

 4. तसेच विजया बँक व देना बँक यांच्या ठेवीदारांसह सर्व ग्राहकांना सदर तारखेपासून बँक ऑफ बडोदाचे ग्राहक असे समजले जाईल.


raja gosavi memorial

 1. निरागस आणि सहजसुंदर अभिनयातून विनोदातील राजा ने अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आजही राजा गोसावी नावाची जादू ओसरलेली नाही.

 2. आयुष्यभर प्रेक्षकांच्या चेह-यावर हसू उमटविणा-या या विनोदवीराच्या स्मृती आता कायमस्वरूपी जतन केल्या जाणार आहेतकै. राजा गोसावी प्रतिष्ठानने राजा गोसावी यांचे स्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

 3. सौजन्याची ऐशीतैशी, करायला गेलो एक, लग्नाची बेडी, डार्लिंग डार्लिंग यांसारख्या विविध व्यावसायिक नाटकांसह ह्णएकच प्याला, भावबंधन, संशयकल्लोळह यांसारखी संगीत नाटके तसेच अवघाची संसार, आंधळा मागतो एक डोळा, लाखाची गोष्ट, हा खेळ सावल्यांचा अशा अनेक चित्रपटांमध्ये राजा गोसावी यांनी अभिनयाचे दर्शन घडविले.

 4. तसेच आजही त्यांच्या कलाकृती प्रेक्षकांची गर्दी खेचण्यात यशस्वी होतात. इतकी लोकप्रियता लाभलेल्या या प्रतिभावंत कलावंताचे स्मारक साता-यापासून दहा किलोमीटरवर असलेल्या लिंब या गावी करण्याचा प्रतिष्ठानने निर्णय घेतला आहे.

 5. लिंब मधील गौरीशंकर कॉलेजच्या मागची जागा प्रतिष्ठानने शासनाकडे मागितली. यास शासनाने हिरवा कंदिल दिल्याची माहिती कै. राजा गोसावी प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश गोसावी यांनी ह्यलोकमतह्णला दिली.


ASIAN SHOOTING COMPETITION

 1. भारतीय नेमबाजांनी आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेच्या अखेरच्या दिवशीदेखील पाच पदकांची कमाई करीत स्पर्धेवरील वर्चस्व कायम राखले.

 2. या स्पर्धेत भारताने 16 सुवर्णपदकांची कमाई केली आहे. 

 3. स्पर्धेत भारताने 16 सुवर्णसह 5 रौप्य आणि 4 कांस्यपदके अशी 25 पदके मिळवली आहेत.

 4. स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी यशवर्धन आणि श्रेया अग्रवाल यांनी प्रत्येकी तीन सुवर्णपदके मिळवली आहेत. यशने 10 मीटर एअर रायफलच्या कनिष्ठ पुरुष गटात तसेच सांघिक गटात केवल प्रजापती आणि ऐश्वर्य तोमरसह सुवर्णपदक मिळवले.

 5. तसेच कनिष्ठ रायफल मिश्र सांघिक गटात यशवर्धनने श्रेयासह सुवर्णपदकावर नाव कोरत तीन सुवर्ण मिळवले. तर श्रेयाने दुसरे सुवर्ण 10 मीटर एअर रायफल कनिष्ठ महिला गटात मिळवले.

 6. तर महिलांच्या सांघिक गटात मेहुली घोष आणि कवी चक्रवर्ती यांच्याबरोबर तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली.

 7. या दमदार कामगिरीमुळे भारतीय नेमबाजांमध्ये चांगला आत्मविश्वास निर्माण झाला असून संयुक्त अरब अमिरातमध्ये 5 एप्रिलपासून होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी त्याचा फायदा होणार आहे.

 8. त्यामुळे भारताला भविष्यात अधिक पदकेदेखील मिळू शकतील.


Top