
2240 09-Aug-2018, Thu
- भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर असल्याचे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) म्हटले आहे.
- भारतीय अर्थव्यवस्थेत करण्यात आलेल्या सुधारणांचे फायदे आता दिसून येत असल्याचे आयएमएफने म्हटले आहे.
- 2.6 ट्रिलियन डॉलर इतका अवाढव्य असलेला भारतीय अर्थव्यवस्थेच्या हत्तीने आता धावण्यास सुरूवात केली असल्याचे आयएमएफचे भारतीय मिशन प्रमुख रानिल साल्गादो यांनी म्हटले.
- आयएमएफच्या ताज्या अहवालानुसार, भारत मार्च 2019 पर्यंत 7.3 टक्के आणि त्यानंतर 7.5 टक्के वेगाने विकास करेल. जागतिक वाढीत भारताचा 15 टक्के हिस्सा असेल, असेही या अहवालात म्हटले आहे.
- एका वार्षिक अहवालानुसार साल्गादो म्हणाले की, परचेसिंग पॉवर पॅरिटी (पीपीपी) प्रकरणी एकूण जागतिक वाढीत भारताचा 15 टक्के हिस्सा असेल. पण ट्रेडिंग चीनप्रमाणे नसेल.
- दीर्घ काळापर्यंत जागतिक वाढीचा मुख्य स्त्रोत म्हणून भारताकडे पाहिले जाते.