In March 2019, the total expenditure of GST Revenue crossed the Rs 1 lakh crore mark

 1. मार्च 2019 मध्ये जीएसटी महसूल संकलनाने ओलांडला 1 लाख कोटी रुपयांचा टप्पा, 2018-19 आर्थिक वर्षातली सर्वाधिक संकलनाची नोंदणी झाली आहे.
 2. मार्च 2019 मध्ये जीएसटी महसूल संकलन 1,06,577 कोटी रुपये इतके झाले.
 3. यामधे:-
  1. सीजीएसटी 20,353 कोटी रुपये,
  2. एसजीएसटी 27,520 कोटी रुपये,
  3. आयजीएसटी 50,418 कोटी रुपये (आयातीवरील 23,521 कोटी रुपयांसह),
  4. उपकर 8,286 कोटी रुपये (आयातीवरील 819 कोटी रुपयांसह) समाविष्ट आहे. 
 4. 31 मार्च 2019 पर्यंत फेब्रुवारी महिन्यासाठी 75.95 लाख जीएसटीआर 3बी विवरण पत्र दाखल करण्यात आली.
 5. सरकारने सीजीएसटीला 17,261 कोटी रुपये, तर एसजीएसटीला 13,689 कोटी रुपये आयजीएसटीमधून दिले.
 6. केंद्र सरकारला 47,614 कोटी रुपये आणि राज्य सरकारला 51,209 कोटी रुपये निव्वळ महसूल मिळाला आहे.
 7. मार्च 2019 मधे जीएसटीचे संकलन हे आतापर्यंतचे सर्वाधिक संकलन आहे.
 8. मार्च 2018 मधे 92,167 कोटी रुपये महसूल होता. मार्च 2019 मधे यात 15.6 टक्के वाढ झाली आहे.


Successful launches by PSLV-C45 for EMICAT and other 28 satellites

 1. भारताच्या पीएसएलव्ही-सी45 या प्रक्षेपण यानाने आज श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून एमिसॅट आणि अन्य 28 आंतरराष्ट्रीय उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. 
 2. सकाळी 9 वाजून 27 मिनिटांनी हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले.
 3. एमिसॅट उपग्रहाचे वजन सुमारे 436 किलो असून, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मूल्य मापनासाठी त्याचा वापर होईल.
 4. अन्य 28 उपग्रहांचे वजन 220 किलो असून, अमेरिकेचे 24, लिथूआनियाचे 2, स्पेन आणि स्वित्झर्लंडचा प्रत्येकी एक उपग्रहाचा यात समावेश आहे.
 5. या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे अध्यक्ष डॉ. के.सिवन यांनी या मोहिमेत सहभागी वैज्ञानिकांचे अभिनंदन केले.
 6. पीएसएलव्हीने आतापर्यंत 46 राष्ट्रीय उपग्रह, विद्यापीठांचे 10 उपग्रह आणि 297 आंतरराष्ट्रीय उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.
 7. मे 2019 मधे पीएसएलव्ही-सी46 हे प्रक्षेपक यान रिसॅट-2व्ही उपग्रहाचे प्रक्षेपण करणार आहे.


Voters' awareness campaign started in Mumbai

 1. कमी मतदान होत असलेल्या महाराष्ट्रातील 10 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे.
 2. रिजनल आऊटरिच ब्यूरो, पुणे (महाराष्ट्र आणि गोवा प्रदेश), माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांनी मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या कार्यालयाशी समन्वय साधून हे अभियान आयोजित केले आहे.
 3. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकात  2 एप्रिल 2019 रोजी दुपारी 4 वाजता या अभियानाला सुरुवात होणार आहे.
 4. ‘#कोणीहीमतदारवंचितराहूनये’ अशी या अभियानाची संकल्पना आहे. 
 5. या प्रतिकात्मक प्रारंभानंतर दक्षिण मुंबई, पुणे, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, सातारा, औरंगाबाद, जळगाव, धुळे आणि कल्याण येथे 2 ते 28 एप्रिल 2019 दरम्यान रॅली आयोजित केल्या जातील.
 6. मतदार जागृतीसाठी 10 मोबाईल व्हॅन्स, 1200 हून अधिक ठिकाणांचा दौरा करतील.
 7. या अभियानादरम्यान गीत आणि नाटक प्रभागाचे कलाकार सादरीकरण करतील. मुंबईत 25 ते 28 एप्रिल 2019 हे चार दिवस ते कला सादर करतील.
 8. या अभियानात पुढील विषयांवर माहिती दिली जाईल:
  1. PwD (दिव्यांग व्यक्ती) ॲप
  2. cVigil ॲप
  3. EVM आणि VVPAT चा वापर
  4. मतदार ओळखपत्रासाठी 10 पर्याय, जे मतदानाच्या दिवशी मतदानासाठी वापरता येतील.

अभियानाचे वेळापत्रक पुढील प्र माणे:-

Sl. No

Constituency Name

Date of Polling

Campaign Start Date

Campaign End Date

Flag-off venue

Tentative Flag-off date and time

1

Mumbai South

29/04/2019

2/04/2019

5/04/2019

Mumbai South (CST Railway Station)

2/4/2019        4 pm

25/4/2019

28/4/2019

2

Pune

23/04/2019

3/04/2019

9/04/2019

District Collectorate

3/4/2019       10 am

3

Nagpur

11/04/2019

8/04/2019

10/04/2019

District Collectorate

8/4/2019 

 11 am

4

Chandrapur

11/04/2019

8/04/2019

10/04/2019

District Collectorate

8/4/2019 

  11 am

5

Solapur

18/04/2019

11/04/2019

17/04/2019

District Collectorate

11/4/2019     11 am

6

Satara

23/04/2019

16/04/2019

22/04/2019

District Collectorate

16/4/2019     11 am

7

Aurangabad

23/04/2019

16/04/2019

22/04/2019

District Collectorate

16/4/2019     11 am

8

Jalgaon

23/04/2019

16/04/2019

22/04/2019

District Collectorate

16/4/2019     11 am

9

Dhule

29/04/2019

22/04/2019

28/04/2019

District Collectorate

22/4/2019     11 am

10

Kalyan

29/04/2019

22/04/2019

28/04/2019

District Collectorate

22/4/2019     11 am


The Ministry of Health notified the new rules regarding medicines and medical tests

 1. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ‘औषधे व वैद्यकीय चाचण्या संदर्भात नियम-2019’ अधिसूचित केले आहे.
 2. सर्व नवी औषधे तसेच मानवी वापरासाठी व वैद्यकीय चाचण्यांसाठी अन्वेषनार्थ नवी औषधे, केला जाणारा अभ्यास आणि धोरणात्मक समित्यांना हे नियम लागू होतील.
 3. नवीन नियमांनुसार:-
  1. परवानगीचा अर्ज मंजूर करण्यासाठी लागणारा कालावधी कमी करीत तो भारतातल्या औषधांकरिता 30 दिवसांपर्यंत आणि देशाबाहेर विकसित होणार्‍या औषधांकरिता 90 दिवसांपर्यंत करण्यात आला आहे.
  2. भारताच्या ड्रग्स कंट्रोलर जनरल कडून कोणताही संपर्क न झाल्यास, अर्ज मंजूर केला जाईल असे मानले जाईल.
  3. जर ड्रग्स कंट्रोलर जनरल कडून निर्दिष्ट करण्यात आलेल्या कोणत्याही देशात (युरोपीय संघ, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका) जर एखाद्या औषधाला परवानगी मिळालेली असेल आणि त्याचे विपणन केले जात असेल तर भारतातल्या वैद्यकीय चाचणीची आवश्यकता नवीन औषधांच्या मंजूरीसाठी माफ केली जाऊ शकते.
  4. आज भारत जगातला द्वितीय क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे आणि सर्वात जास्त रोगाचा भार वाहणारा देश आहे.
  5. परंतु जागतिक वैद्यकीय चाचण्यांच्या केवळ 1.2% पेक्षा कमी भाग देशात दिसून येतो.


Justice D. Of Jain: Temporary Ethics Officer of BCCI

 1. 28 मार्चला निवृत्त न्यायमूर्ती डी. के. जैन ह्यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) इथिक्स अधिकारी (नीतीमत्ता अधिकारी) पदी तात्पुरत्या आधारावर नेमणूक करण्यात आली आहे.
 2. ही नियुक्ती नवी निवड होतपर्यंत केली गेली आहे.
 3. भारतीय क्रिकेटच्या हितार्थ उद्भवलेल्या वादांशी संबंधित मुद्दे शोधण्यासाठी आणि ठरविण्यासाठी इथिक्स अधिकारी नियुक्त केले जाते.
 4. डी. के. जैन हे सर्वोच्च न्यायालयाकडून नियुक्त करण्यात आलेले BCCIचे पहिले लोकपाल आहेत.
 5. भारतीय क्रिकेट नियामक मंडळासंदर्भात तक्रारींच्या निवारणाची जबाबदारी नव्या लोकपालाकडे दिली गेली आहे.
 6. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI):-
  1. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) याची तामिळनाडू सोसायटी नोंदणी कायद्याच्या अंतर्गत डिसेंबर 1928 मध्ये स्थापना करण्यात आली. याचे मुख्यालय महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये आहे.
  2. भारतातल्या क्रिकेटसाठी असलेली राष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे.
  3. हा राज्य क्रिकेट संघांचा एक संघ आहे.


Geographical code certificate for five varieties of Indian coffee

 1. भारतीय कॉफीच्या पाच जातींसाठी भारत सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील उद्योग चालना आणि अंतर्गत व्यापार विभागाने भौगोलिक संकेतांक जारी केले आहेत.
 2. कॉफीच्या पाच जाती:-
  1. कुर्ग अरेबिका (जि. कोडागू, कर्नाटक),
  2. वायनाड रोबस्टा (जि. वायनाड, केरळ)
  3. चिकमगळूर अरेबिका (जि. चिकमगळूर, कर्नाटक),
  4. अराकू व्हॅली अरेबिका (आंध्र व ओदिशाचा डोंगराळ भाग) 
  5. बाबाबुदनगिरीज अरेबिका (चिकमगळूर) 
 3. भारतात बहुतांश करुन दक्षिणेकडच्या राज्यात कॉफीचे उत्पादन होते.
 4. सुमारे 4.54 लाख हेक्टरवर 3.66 लाख शेतकरी कॉफीचे उत्पादन घेतात.
 5. भौगोलिक संकेतांक प्रमाणपत्रामुळे ओळख आणि संरक्षण मिळते.
 6. यामुळे विशिष्ट भागात तयार होणाऱ्या विशिष्ट जातीच्या कॉफीच्या गुणवत्ता, राखण्याकरिता कॉफी उत्पादकांना गुंतवणूक करण्यात येईल.
 7. यामुळे कॉफी उत्पादकांना जास्तीत जास्त किंमत मिळण्याबरोबरच भारतीय कॉफीला जागतिक स्तरावर अधिक मान्यता मिळेल.


Top

Whoops, looks like something went wrong.