In the Czech Republic, Hima Das and Mohamed Anas won gold medals

 1. झेक प्रजासत्ताक या देशात सुरु असलेल्या मिटींक रीटर अॅथलेटिक्स स्पर्धेत 300 मीटर शर्यतीत भारताचे धावपटू हिमा दास व मोहम्मद अनास यांनी वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले आहे.
 2. 2 जुलैपासून युरोपमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धांमध्ये हिमा दासचे हे सहावे सुवर्णपदक ठरले.
 3. 17 ऑगस्टला झालेल्या 300 मीटरच्या शर्यतीत हिमाने 33.29 सेकंद अशी वेळ नोंदवताना सुवर्णपदकाला गवसणी घातली.
 4. या प्रकारात रशियाला रौप्य तर पोलंडला कांस्यपदक मिळाले.
 5. या स्पर्धेत भारताचा युवा धावपटू मोहम्मद अनासने 300 मीटरच्या शर्यतीत 32.41 सेकंद वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावले.
 6. युरोपमधील स्पर्धांमधील अनासचे हे चौथे सुवर्ण आहे.


Prime Minister Modi inaugurates the Magadechu Hydropower Project in Bhutan

 1. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुटानमध्ये उभारण्यात आलेल्या 10 हजार मेगावॉट क्षमतेच्या मांगदेछू जलविद्युत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.
 2. 4500 कोटी रूपयांचा हा जलविद्युत प्रकल्प मध्य भुटानच्या ट्रोंगासा झोंगखाग जिल्ह्यात मांगदेछू नदीवर बांधण्यात आला आहे.
 3. प्रारंभी 720 मेगावॉटच्या क्षमतेसह प्रकल्प चालवला जाणार आहे.
 4. 2020 सालापर्यंत प्रकल्पाची पूर्ण क्षमता प्राप्त करण्याची योजना आहे.
 5. मांगदेछू जलविद्युत प्रकल्प हा भुटान-भारत मैत्री प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे.
 6. हा भुटानमधल्या मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे.
 7. हा प्रकल्प उभारण्यासाठी भारत सरकारकडून तांत्रिक आणि वित्तपुरवठा करण्यात येत आहे.
 8. बांधकाम खर्चाच्या 70 टक्के कर्जस्वरुपात तर 30 टक्के अनुदान अश्या स्वरुपात भारताकडून वित्तपुरवठा केला जात आहे.
 9. भुटान:-
  1. भुटान हा हिमालयाच्या पूर्व भागात असलेला बौद्ध साम्राज्य असलेला देश आहे.
  2. थिंपू हे या देशाचे राजधानी शहर आहे.
  3. भारतीय रुपया, भुटानी नगुल्ट्रम ही चलने देशात वापरली जातात.
  4. झोंगखा ही देशाची अधिकृत भाषा आहे.


Top