
3033 10-Jan-2018, Wed
- देशातील एक लाखाहून अधिक ग्रामपंचायत ‘भारतनेट’ च्या पहिल्या टप्प्यात हायस्पीड ब्रॉडबँडद्वारे जोडण्यात आल्या आहेत.
- पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र हे ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’ ठरले आहे.
- त्यानुसार राज्यात 12 हजारांहून अधिक ग्रामपंचायती इंटरनेटद्वारे जोडण्यात आल्या आहेत.
- देशात ३१ डिसेंबर २०१७ अखेर २ लाख ५४ हजार ८९५ किलोमीटर ऑप्टिकल फायबरचे जाळे निर्माण केले गेले.
- याद्वारे हायस्पीड ब्रॉडबँड सेवेने देशातील १ लाख १ हजार ३७० ग्राम पंचायतींना ‘भारत नेट’ च्या पहिल्या टप्प्यात हायस्पीड ब्रॉडबँड इंटरनेट सेवेने जोडण्यात आले आहे.
- महाराष्ट्रातील १२ हजार ३७८ ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट सेवा उपलब्ध झाली आहे.
- तर १४ हजार ८७८ ग्रामपंचायतींमध्ये‘भारतनेट’ च्या कामास सुरुवात झाली आहे.
- महाराष्ट्राबरोबर उत्तर प्रदेश (पूर्व) मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, आणि झारखंड ही राज्ये सुद्धा भारत नेट च्या पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट ठरली आहेत.